कुतूहल

ओरिसा राज्यातील बारगड, सोनेपूर, संबलपूर, बोध इत्यादी जिल्ह्यांत तयार होणारी ‘संबलपुरी साडी’ इसवीसनपूर्व काळापासून ज्ञात आहे. सन १९२५ पर्यंत पश्चिम ओरिसा पुरतीच सीमित असलेली ही साडी, मर्यादित नक्षीकाम तसेच नसíगक रंग वापरूनच तयार केली जात होती. स्थानिकरित्या ‘भूूलिया कप्ता’ या नावाने ही साडी ओळखली जाते. स्वातंत्र्योत्तर काळात ‘वीव्हर्स सव्‍‌र्हिस सेंटर’ने अन्य साडय़ांप्रमाणेच या साडीच्या डिझाइनबाबतही अभ्यास केला. सन १९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही साडी वापरायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्या साडीची मागणी देशभर वाढली. ही वाढीव मागणी लक्षात घेऊन संबलपुरी साडीला ‘भौगोलिक स्थान दर्शक नोंदणी प्रमाणपत्र’ मिळाले. संबलपुरी साडीमध्ये सोनेपुरी, पासापली, बोमकाई, बाटपली आणि बापटा असे प्रकार आहेत.
बोमकाई साडी मुख्यत्वे मध्यम सूतांकाच्या धाग्यांनी विणलेली असते, पण रंगसंगती मात्र आकर्षक असते. बोमकाई साडी सोनेपुरी म्हणूनही ओळखली जाते. पण सोनेपुरी साडी सुतीबरोबरच रेशीम धाग्यांनी विणली जाते. पासापल्ली साडी रेशमी असून त्याला सुंदर पदर असतो. बुद्धिबळाच्या पटासारखी चौकोनी नक्षी साडीवर केलेली असते, हे त्याचे वेगळेपण.
संबलपुरी साडीचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे या साडीचा ताणा आणि बाणा दोन्ही धागे बांधणीच्या तंत्राने ( ‘टाय अँड-डाय’ म्हणजेच धाग्याची लडी ठराविक ठिकाणी बांधून रंगाई-पद्धत) रंगवलेले असतात. बांधणी कला ही खास कला आहे. या पद्धतीने नुसत्या सूत रंगवायलाच काही आठवड्याचा कालावधी लागतो. साडीचा तजेलदारपणा सहजी दशकभर टिकून राहतो. ही या कलेची खासियत आहे. या साडीमध्ये पारंपरिकरित्या शंख, चक्र, फुल, इत्यादी नक्षीकाम विणून केले जाते. त्याचबरोबर पानाफुलांच्या नक्षीचाही समावेश असतो. तसेच नक्षीचे रूप साडीच्या दोन्ही बाजूने एकसारखेच असते, हे संबलपुरी साडीचे वैशिष्टय़ आहे. युद्धातील ठिकठिकाणच्या विजयाचे प्रसंग तसेच रासक्रीडा असे प्रसंग साडय़ांवर चितारलेले असतात. नवीन साडय़ांमध्ये वनस्पती, प्राणी, भौमितिक आकृतीबंध अशी नक्षीही समाविष्ट करण्यात आली आहे.
या साडय़ा विणणाऱ्या परंपरागत विणकरांची परिस्थिती मात्र हलाखीची आहे. ओरिसा सरकारने हस्तक्षेप करून विणकरांना दिलासा दिला आहे. त्याचबरोबर या विणकराकडून ड्रेसमटेरियल, बेडकव्हर, टॉवेल वगरे उत्पादने तयार करून घेऊन त्यांची रोजीरोटी टिकवून ठेवली आहे.

buldhana bull died due to thunderstorm
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली
in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?
Who is throwing stones at houses since a month
अद्भूत! एक महिन्यापासून घरांवर दगडफेक, कोण करतंय?
Mild earthquake tremors in Akola district
अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे

> दिलीप हेर्लेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

जैसलमेर राज्य स्थापना

जयपूरपासून पश्चिमेस ५७५ कि.मी. वर, थरच्या वाळवंटापैकी दक्षिण भागात असलेले जैसलमेर शहर एका महत्त्वाच्या संस्थानाचे प्रमुख ठाणे होते. इ.स.११५६ मध्ये रावळ जैसलने देवगढ येथे आपल्या राज्याची राजधानी करून त्या गावाचे आणि राज्याचे नाव जैसलमेर केले. त्या भागात मिळणाऱ्या चमकदार पिवळ्या सँडस्टोन दगडामुळे जैसलमेर गोल्डन सिटी म्हणूनही ओळखले जाते. मध्य आशिया आणि िहदुस्थान यांच्यातील उंटांवरून होणाऱ्या मालवाहतुकीच्या व्यापारी रस्त्यांवर जैसलमेर वसले असल्याकारणाने जैसलमेर राज्याला जकातीचे मोठे उत्पन्न मिळत असे. या उत्पन्नावर जैसलमेरची शंभर वष्रे भरभराट झाली. परंतु पुढे मुंबई बंदराचा विकास होऊन जलमार्गाने व्यापारी वाहतूक सुरू होऊन जेसलमेरचे आíथक गणित कोलमडले.
अल्लाउद्दीन खिलजीने १२९३ साली जैसलमेर किल्ल्याला वेढा घातला. परंतु फत्ते होऊन जैसलमेरवर अंमल करण्यास त्याला नऊ वष्रे लागली. जैसलमेरच्या पुढील राज्यकर्त्यांनी मोगलांचे आधिपत्य स्विकारून त्यांच्याशी सलोख्याचे संबंध टिकविले. १७ व्या शतकात हे राज्य परत वैभवसंपन्न
झाले. मोठमोठय़ा, कलाकुसरीने युक्त अशा हवेल्या, राजवाडे, छत्र्या, मंदिरांची निर्मिती याच काळात झाली. महारावळ द्वितीयने १८१८ साली ईस्ट इंडिया कंपनी सरकारशी संरक्षणात्मक करार करून त्यांचे आधिपत्य स्वीकारले.
१५ तोफ सलामींचा मान असलेल्या जैसलमेर संस्थानचे क्षेत्रफळ ४१,००० चौ.कि.मी. होते. ब्रिटिशांशी जैसलमेर राज्यकर्त्यांनी सलोख्याचे संबंध ठेवले. अँग्लो-अफगाण युद्धांमध्ये युद्धसाहित्य आणि सनिकी दळणवळणाची व्यवस्था महारावळ गजसिंहाने उत्तम केली. भौगोलिक दृष्टय़ा हे संस्थान एका बाजूला, तसे दुर्गमच असल्यामुळे जोधपूर, जयपूरप्रमाणे मोगल आणि ब्रिटिश संस्कृतीचा प्रभाव येथल्या जनमानसावर न पडल्याने जैसलमेरचे वेगळेपण आजही उठून दिसते.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com