ब्राझीलच्या वसाहतीत सापडलेल्या सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या साठय़ांमुळे धनसंपन्न झालेल्या लिस्बनवर अठराव्या शतकाच्या मध्यावर आलेल्या अस्मानी संकटाने, लिस्बनकरांचे वैभव उद्ध्वस्त करून टाकले! १ नोव्हेंबर १७५५ रोजी बहुतेक नागरिक चच्रेसमध्ये माससाठी सहभागी होण्यासाठी जमले होते. एकापाठोपाठ तीन मोठय़ा भूकंपांनी संपूर्ण लिस्बन शहर हादरवून टाकले. भूकंपाच्या धक्क्यापाठोपाठ शहरात ठिकठिकाणी आगी लागल्या आणि समुद्रात प्रचंड मोठी त्सुनामी उसळली. शहरातल्या बहुतेक सर्व इमारती उद्ध्वस्त झाल्या, लिस्बनच्या तत्कालीन २,७०,००० लोकसंख्येपकी ९० हजार लोक केवळ काही तासांमध्ये मारले गेले. त्या वेळच्या लिस्बनचे मेयर डॉमजो याने मात्र दुसऱ्या दिवसापासून भूकंपाने विस्थापित लोकांचे पुनर्वसन हाती घेऊन त्यांना स्वस्तातली घरे बांधून दिली. त्या दिवसानंतर लिस्बनचे गतवैभव काही परत आले नाही! १८०७ साली लिस्बनचा ताबा नेपोलियनने घेऊन पुढची चार वष्रे आपला अंमल बसवला. त्यानंतर उसळलेल्या दंगली आणि यादवींनी १९०८ साली कळस गाठला. राजा डोम कार्लोस आणि त्याचा मुलगा यांची भर चौकात हत्या झाली. पुढच्या सोळा वर्षांत लिस्बनमध्ये पंचेचाळीस सरकारे बदलली! पहिल्या महायुद्धात लिस्बन तटस्थ राहिले परंतु इतर देशांच्या गुप्तहेरांचा ते एक महत्त्वाचा अड्डाच बनले. १९७४ आणि १९७५ या वर्षांमध्ये लिस्बनच्या आफ्रिकेतील वसाहतींमधून आलेल्या निर्वासितांच्या लोंढय़ांनी लिस्बन गजबजून गेले आणि शहराचे स्वरूप बदलले. पुढे १९८६ साली पोर्तुगाल युरोपीय समुदायात सहभागी झाल्यावर मिळालेल्या आर्थिक मदतींच्या जोरावर लिस्बनचा उत्कर्ष झाला. ‘एक्स्पो ९८’ आणि २००४ सालचे युरोपियन चॅम्पियनशिपचे फुटबॉल सामने लिस्बनने भरवून आपल्या झालेल्या सांस्कृतिक विकासाची चुणूक दाखवली. सध्या स्पेनमध्ये असलेल्या सांविधानिक राजेशाही सरकारचे पार्लमेंट लिस्बनमध्ये आहे.

सुनीत पोतनीस

australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
Iran attacks Israel four key questions
इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आता पुढे काय होणार? अमेरिकेची भूमिका काय?
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?

sunitpotnis@rediffmail.com  

 ‘अभारतीयचिकू

काही वर्षांपूर्वी डहाणू तालुक्यात औद्योगिकीकरण करण्याचे ठरल्यावर तेथील कृषि-उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या चिकूच्या बागांवर प्रदूषणामुळे दुष्परिणाम होण्याची भीती बोलली गेली. दिल्लीच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने डहाणू तालुका पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील ठरवून प्रदूषण होऊ नये म्हणून अनेक नियम केले, चिकूच्या बागांना संरक्षण दिले. स्थानिक वनस्पती-प्रकारांच्या रक्षणासाठी उपाय योजले.

दक्षिण गुजरात आणि किनारी महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर चिकूच्या बागा आहेत. भारतीय समजल्या गेलेल्या या वृक्षाचे मूळ मेक्सिकोमध्ये असावे. व्यापारानिमित्त जगभर फिरणाऱ्या एका गुजराती प्रवाशाने डहाणू तालुक्यातील घोलवड येथे चिकूचे पहिले रोप सन १८९८ साली लावले. तेथून या फळाचा प्रसार गुजरात, महाराष्ट्र आणि नंतर देशभर झाला. गुजरातमधील नवसारी येथे चिकू संशोधन केंद्र असून आज देशांतील चाळीस हजार हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर चिकू बागा अस्तित्वात आहेत.

चिकूचे पीक अनेक प्रकारच्या हवामानात आणि जमिनीवर वाढू शकते, त्यामुळे कित्येक बागाईतदार संवेदनशील आंब्यापेक्षा सहनशील चिकूच्या बागा पसंत करतात.

देशातील चिकूचे उत्पादन जगात सर्वात जास्त असले तरी इथे ते पीक दुय्यमच समजले जाते.

सुरुवातीला उत्कृष्ट जातीच्या झाडांच्या बियांपासून बागायती केली जात असे, त्यामुळे फळांमध्ये विविध प्रकार दिसून येत. अलीकडे मोठा बाजार असलेल्या ‘काळी-पट्टी’ आणि ‘क्रिकेट बॉल’ असे थोडेच प्रकार दिसून येतात, त्यांची लागवड खिर्णीवर कलम करून किंवा गुटी बांधून केली जाते. तयार फळे झाडावरून योग्य वेळी उतरवणे हे दीर्घ अनुभवानेच जमते. फार लवकर उतरवली गेली तर फळे नरम-पक्व होण्यास फार दिवस लागतात, फळाचा गोडवा कमी होतो. उतरवण्यास उशीर झाला तर फळे लवकर मऊ होऊन नासू लागतात. जास्त पक्व फळांना मागणी नसते.

फळांवर प्रक्रिया करून चिकूपासून तयार केलेली उत्पादने बाजारात आणणे वा निर्यात करणे अजून फारसे जमलेले नाही, त्यामुळे चिकू फक्त ताजे फळ म्हणूनच बाजारात उपलब्ध असते.

प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

 office@mavipamumbai.org