मानवनिर्मित, प्रामुख्याने संश्लेषित धागे हे नसíगक धाग्यांपेक्षा अनेक बाबतीत सरस ठरले. ह्य़ा धाग्यांची ताकद व लवचिकता नसर्गिक धाग्यांपेक्षा अनेक पटीने अधिक असते. त्यामुळे त्यांची विणण्याची प्रक्रिया सोपी पडते आणि अशा धाग्यांपासून बनविलेले कपडे जास्त काळ टिकतात. ह्य़ा धाग्यांना मूळचीच चांगली लकाकी असल्याने त्यांचे कपडे अधिक आकर्षक असतात. या सर्वामुळे अगदी थोडय़ाच काळात मानवनिर्मित धागे अत्यंत लोकप्रिय झाले.
याशिवाय मानवनिर्मित तंतू हे तयार होताना अखंड स्वरूपात असतात. नसíगक धाग्यांच्या बाबतीत फक्त  रेशीम हे अखंड तंतूंच्या स्वरूपात असते तर इतर सर्व तंतू आखूड तंतूंच्या स्वरूपात असतात. आखूड तंतूंचे सुतामध्ये रूपांतर करण्यासाठी सूतकताईची प्रक्रिया करावी लागते. ही प्रक्रिया तंतूंपासून कपडे तयार करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रियांच्या साखळीतील सर्वात खर्चीक प्रक्रिया आहे. अखंड तंतू हे एकत्र करून त्यांचा धागा बनवून थेट विणकामासाठी वापरता येऊ शकतात आणि सूतकताईची खर्चीक प्रक्रिया टाळता येते. म्हणजेच अशा तंतूंपासून कपडे बनविणे कमी खर्चाचे होते, परंतु अशा अखंड धाग्यांपासून बनवलेले कपडे हे कमी आरामदायक असतात. म्हणून कृत्रिम तंतूंचे लहान तुकडे करून आखूड तंतूसुद्धा करता येतात आणि त्यांपासून १००% कृत्रिम तंतूंचे किंवा कृत्रिम तंतू आणि नसíगक तंतू यांचे मिश्रण करून सूत बनविता येते. उदा. पॉलिस्टर-कापूस किंवा पॉलिस्टर-लोकर इ. कृत्रिम तंतूंचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांचे उत्पादन कारखान्यात होत असल्याने त्यांच्या उत्पादनावर आपले नियंत्रण असते. नसíगक तंतूंचे उत्पादन हे निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असते आणि त्यामुळे त्यांचे उत्पादन नेहमी कमी-जास्त होत असते आणि यामुळे साहजिकच त्यांची किंमतही नेहमीच अस्थिर असते. जर कच्च्या मालाची किंमत अस्थिर असेल तर उद्योगसुद्धा अस्थिर राहतो. त्यामुळेच वस्त्रोद्योगसुद्धा पूर्वी नेहमीच अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडत असे. कृत्रिम तंतू हे नसíगक तंतूंना पूरक ठरले आणि कृत्रिम तंतूंच्या शोधानंतर वस्त्रोद्योगातील अस्थिरता काही प्रमाणात कमी झाली.
– चं. द. काणे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – ब्रिटिशकाळात दतिया संस्थान
nav4बुंदेल खंडातील राज्यांपकी दुसऱ्या क्रमांकाने मोठय़ा असलेल्या दतिया राज्याच्या काही अंतर्गत समस्या असल्यास, वारसा हक्काचा प्रश्न असल्यास  ते ओच्र्छा राज्यकर्त्यांचा सल्ला घेत. दतियाचा राजा परीक्षित सिंग याची कारकीर्द इ.स. १८०१ ते १८३९ अशी झाली. मराठा आक्रमणाच्या भीतीने परीक्षितने कंपनी सरकारच्या गव्हर्नर जनरलच्या बुंदेलखंडातील एजंट कॅप्टन बायली याच्यामार्फत १८०४ साली कंपनीबरोबर संरक्षण करार करून त्यांची तनाती फौज ठेवली. परीक्षितने इंग्रजांच्या मराठय़ांबरोबरच्या प्रत्येक युद्धात इंग्रजांनाच साथ दिली. पुढे मराठा राज्याचा अस्त झाल्यावर कंपनी सरकारने दतियाला मोठय़ा जहागिऱ्या देऊन परीक्षितला व्यक्तिश: १५ तोफांच्या सलामीचा बहुमान दिला. दतियाच्या फौजेत ९४५ घोडदळ, ५००० पायदळ आणि १२५ बंदूकधारी यांचा समावेश होता. परंतु १९०७  ते १९११ मध्ये दतिया शासकाने प्रजेशी केलेल्या अमानुष, क्रूर वर्तनामुळे ब्रिटिश राजवटीने राजाची कानउघडणी करून त्याच्यावर देखरेख करण्यासाठी कॅप्टन तिंडालची नेमणूक केली. १९४६ साली दतियाचा दिवाण ऐनिद्दुनी याच्या कुशासनाला त्रासून सरकार विरुद्ध लोकांनीच बंड केले.
 राजाने दिवाणास पदच्युत केले, परंतु ब्रिटिश निवासी अधिकारी रॉबर्ट कॅम्पबेलचे दिवाणाशी संगनमत असल्याने कॅम्पबेलने राजालाही पदच्युत केले. हा तयार झालेला तिढा सोडविण्यासाठी गव्हर्नर जनरलने हस्तक्षेप करून राजाला परत स्थानापन्न करून दिवाण आणि कॅम्पबेल यांना पदच्युत केले!
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com