‘गरज ही शोधाची जननी असते’ असे वचन आहे. मानवनिर्मित तंतूंचा ‘उगम आणि विकास’ यांचा अभ्यास करताना या वचनाची आठवण येते आणि सत्यता पटते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत वस्त्रोद्योग केवळ नैसर्गिक तंतूंवर अवलंबून होता. त्या वेळी वस्त्रोद्योगापुढे पुढील आव्हाने उभी होती.
वाढत्या लोकसंख्येची कपडय़ाची मागणी पूर्ण करणे, अन्न उत्पादनाच्या आड न येता तंतू लागवडीखालील जमिनीचे क्षेत्रफळ वाढवणे, नसíगक तंतूंच्या गुणधर्मामध्ये सुधारणा करणे आणि सातत्य आणणे, तंत्रोपयोगी वस्त्रांची वाढती मागणी पूर्ण करणे, विविध उद्योगांकडून करण्यात येणाऱ्या अपेक्षा पूर्ण करणे.
ही आव्हाने केवळ नैसर्गिक  तंतूंच्या साहाय्याने पूर्ण करणे अशक्य आहे हे संबंधितांच्या लक्षात आले. कारण नसíगक तंतूंच्या गुणधर्माना मर्यादा असतात. त्यात आपल्याला हवा तसा बदल करणे शक्य नसते. शिवाय या तंतूंच्या गुणधर्मात सातत्यही नसते. म्हणून त्यांनी आपले लक्ष कृत्रिम तंतुनिर्मितीवर केंद्रित केले.
तंतूची लांबी, तलमता, ताकद, रंग हे गुणधर्म समजायला आणि मोजायला सोपे असतात. यामुळे सर्व प्राथमिक संशोधन या गुणधर्मावरच केंद्रित होते. कृत्रिम तंतुनिर्मितीचा विचार आल्यावर संशोधकांनी तंतूच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास सुरू केला. त्यात त्यांना आढळून आले की, तंतूमध्ये अनेक अणू एकत्र जोडले जाऊन एक रेणू तयार होतो. जोडल्या गेलेल्या अणूंच्या संख्येनुसार त्या रेणूचे गुणधर्म बदलतात. नसíगक तंतूंच्या बाबतीत ही संख्या निसर्गानुसार ठरते. उलट कृत्रिम तंतूंबाबत सर्वच प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणे शक्य असल्यामुळे हव्या त्या गुणधर्माचे तंतू निर्माण करणे शक्य होईल हे त्यांच्या लक्षात आले. याच दिशेने त्यांनी आपले सर्व प्रयत्न केंद्रित केले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या प्रयत्नांना यश येऊन मानवनिर्मित तंतूंचा एक क्रांतिकारी कालखंड वस्त्रोद्योगात सुरू झाला. मानवनिर्मित तंतूमुळे कापडाची वाढती गरज भागवून त्यामध्ये अधिक विविधता आणणे शक्य झाले. पुढील काळात ही क्रांती देदीप्यमान राहील अशीच सध्याची लक्षणे आहेत.
– प्रा. सुरेश द. महाजन, इचलकरंजी, मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – ओच्र्छाचे प्रशासन
ओच्र्छाच्या वैभवशाली इतिहासास इ.स. १६२७ ते १६३६ या काळात राजा जुझारसिंग याच्या कारकीर्दीत गालबोट लागले. हा राज्यकर्ता अस्थिर मनस्थितीचा, मनोदुर्बल असल्याने कारभारात अनेक समस्या उभ्या राहिल्या. आपली पत्नी आणि सख्खा भाऊ यांच्यातील संबंधांबाबत संशय घेऊन जुझारसिंगने भावाला विषप्राशन करावयाला लावून मारले. बादशाह शाहजहान याच्या काळात जुझारने मोगलांविरुद्ध बंड केल्यावरून शाहजहानने त्याला कैद करून जंगलात नेऊन ठार मारले. त्यानंतर मोगल सेनेने ओच्र्छा घेऊन १६३६ ते १६४१ या काळात ओच्र्छा मोगलांच्या अमलाखाली ठेवले.
राजा विक्रमजीत याने आपली राजधानी १ मध्ये ओच्र्छापासून ८० कि.मी. अंतरावरील टिकमगढ येथे हलविली. टिकमगढजवळच्या टेहरी येथे त्याने किल्ला बांधला. विक्रमजीतनेच १८१२ साली कंपनी सरकारशी हमीपात्र संरक्षणाचा करार करून त्यांची तनाती फौज ठेवली. त्यापुढे ब्रिटिशांनी ओच्र्छा संस्थानाला १५ तोफांच्या सलामींचा बहुमान दिला.
ओच्र्छा राज्यात ‘हस्तभय्या’ या नावाने ओळखला जाणारा आठ जहागिऱ्यांच्या संरजामदारांचा एक गट होता. हे सर्व सरंजामदार ओच्र्छाच्या बुंदेला घराण्यातीलच वारस होते. १६९० साली ओच्र्छा राजा उदोतसिंग याने भाऊ रायसिंग याला झाशीजवळची बारागांवची मोठी जहागीर दिली. रायसिंगच्या मृत्यूनंतर ही जहागीर आठ भावांत वाटप होऊन पुढे सर्वानी ब्रिटिशांशी संरक्षणाचा करार केला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com