दूरवरून वेगाने आपल्याकडे येणाऱ्या इंजिनाची शिट्टी आधी वरच्या पट्टीत ऐकू येते आणि ते दूर जाताना तोच आवाज खालच्या पट्टीत उतरतो हे आपण शाळा-कॉलेजमध्ये शिकतो. बऱ्याच जणांचा ‘डॉपलर इफेक्ट’शी तेवढाच संबंध येतो, पण त्यापलीकडे त्या परिणामाचा आपल्याशी कधी संबंध येऊ शकेल हे अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे डॉपलर हे एका शास्त्रज्ञाचं नाव आहे हेही डॉपलर इफेक्ट शिकणाऱ्या अनेकांना माहीत नसतं.

जहाजांच्या वेगांपासून हवामानातल्या बदलांपर्यंत आणि हृदयाच्या स्पंदनांपासून ते विश्वातल्या हालचालींपर्यंत कित्येक बाबींची माहिती करून घेण्यासाठी आपण डॉपलर इफेक्टचा उपयोग करून घेतो. अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांवर पोलीस याच डॉपलर इफेक्टचा वापर करून लक्ष ठेवतात आणि जगाच्या पाठीवर कुठेही आपल्याला मार्ग दाखवणारी जी.पी.एस. प्रणालीसुद्धा याच परिणामाचा उपयोग करून घेते.

foreign women prostitution, prostitution Kharghar,
वेश्याव्यवसायप्रकरणी परदेशी महिलांवर कारवाई
Babasaheb Ambedkar Research and Training Institute
बार्टीचे अधिकारी निघाले लंडनला! ग्लोबल भीमजयंतीच्या नावाखाली वंचित विद्यार्थ्यांच्या पैशाचा…
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत
ILO report
विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?

या परिणामाचा शोध ख्रिश्चन डॉपलर या एका ऑस्ट्रियन शास्त्रज्ञाने लावला. त्यांचा जन्म १८०३ साली ऑस्ट्रियामधल्या साल्झबर्ग या ठिकाणी झाला. डॉपलर यांचं कार्यक्षेत्र पदार्थविज्ञान हे असलं तरी त्यांनी तत्त्वज्ञान आणि गणित या विषयांचाही अभ्यास केला होता. १९४१ साली, वयाच्या ३८व्या वर्षी, डॉपलर यांनी रॉयल बोहेमियन सोसायटी ऑफ सायन्सेसमध्ये एका व्याख्यानाद्वारे आपला जोड-ताऱ्यांकडून येणाऱ्या रंगीत प्रकाशाबद्दलचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतालाच पुढे ‘डॉपलर इफेक्ट’ हे नाव मिळालं. यामध्ये त्यांनी लहरींची वारंवारिता ही लहरींचा स्रोत आणि निरीक्षक यांमधल्या सापेक्ष वेगावर अवलंबून असतो असे प्रतिपादन केले होते. याचाच उपयोग पुढे त्यांनी जोड-ताऱ्यांच्या रंगाबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी केला. पुढे फ्रेंच शास्त्रज्ञ फिझॉ याच्या मदतीनं प्रकाश-लहरींच्या निळ्या आणि लाल रंगातल्या स्थानांतराचे भाकीत केलं होतं.

डॉपलर यांनी ऑस्ट्रियामधल्या विविध शिक्षण संस्थांमध्ये ज्ञानदानाचे कार्य केले. ते गणित, पदार्थविज्ञान आणि खगोलशास्त्र हे विषय शिकवीत असत. त्यांनी या विषयांवर जवळपास ५० निबंध प्रकाशित केले. हंगेरीमध्ये झालेल्या क्रांतीमुळे ते व्हिएनाला गेले. तेथे त्यांची पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. १८५३ साली त्यांचा व्हेनिस येथे वयाच्या ५०व्या वर्षी फुप्फुसाच्या आजाराने मृत्यू झाला.

सुनील सुळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

महाश्वेतादेवी : पुरस्कार, सन्मान

आपल्या लेखनाची भूमिका स्पष्ट करताना महाश्वेतादेवी म्हणतात, ‘‘केवळ भाषाशैली, आकृतिबंध हेच मानदंड न मानता, साहित्याचे मूल्यमापन इतिहासाच्या संदर्भात व्हायला हवं. सत्तास्पर्धेमुळे तळागाळातील माणसांच्या शोषणाचा इतिहास समोर येऊन उभा राहतो आणि हाच इतिहास मी वर्तमानातील माझ्या कथांमधून मांडते. एक उघडं नागडं सत्य उपरोधिक शैलीत समोर मांडते.’’

जगभरच्या निरनिराळ्या चर्चासत्रांमध्ये, पुस्तक मेळ्यांमध्ये त्यांनी मांडलेले विचार चिंतनीय ठरले आहेत. स्त्रीधर्म, समाज याविषयीचे त्यांचे वैचारिक लेखन आपल्याला ‘स्त्री-पर्व’मध्ये वाचायला मिळते. आपल्या भारतीय परंपरेत, धार्मिक परंपरांमध्ये देहदर्शनाला एका वेगळ्याच अलौकिक पातळीवर सुरुवात झालेली दिसते. देवदासी ही प्रथा तर बरीच प्राचीन आहे. अशा या देवदासी, वेश्यांच्या देह व्यापाराच्या भूलभुलैयात फसलेल्या स्त्रियांच्या दारुण स्थितीचं सजीव चित्रण त्यांनी ‘आज बाजार बंद है’मध्ये केलं आहे.

त्या म्हणतात, ‘‘माझ्या साहित्यात एखादी राजकीय विचारधारा शोधणं ही बेईमानी होईल. समाजाने अवहेलना केलेले लोकच माझ्या कथेतील मुख्य पात्रं आहेत.. जीवनाचं अंकगणित मांडता येत नाही आणि मनुष्य काही राजकारण्याच्या पटावरचे प्यादे नाही. माझ्या मते, सगळ्या राजकीय कार्यक्रमांचे व विचारधारांचे ध्येय हेच असले पाहिजे, की मनुष्याला त्याचे अस्तित्व व सामाजिक न्यायाचा खात्रीने अधिकार मिळावा. मी वर्तमान सामाजिक व्यवस्थेत समूळ परिवर्तन व्हायला हवं, या बाजूचीच आहे..’’

एवढं असूनही त्यांचे साहित्य उपदेशात्मक, प्रचारात्मक नाही. मानवी मनाला भिडणारे आहे. त्यांच्या साहित्याचे अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. त्यांच्या एका कथेवर ‘मातीमात्र’ हा मराठी चित्रपट चित्रा पालेकर यांनी तयार केला होता. .आदिवासींच्या भाषा शिकून, त्यांच्याशी एकरूप होऊन त्या ‘आदिवासींच्या माँ’ झाल्या होत्या.

याव्यतिरिक्त महाश्वेतादेवींना १९६८ मध्ये रचनात्मक जनसेवा सन्मान, भुवन मोहिनी मेडल, शरदचंद्र चट्टोपाध्याय मेडल, जगत तारिणी मेडल, अमृत पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मश्री आणि १९९६ चा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

पूजेचं मर्म

काहीजणांना कितीक तास मोठं मन लावून पूजाअर्चा करण्याची आवड असते. काहींना अनेक तीर्थक्षेत्री जाऊन मंदिरांची दर्शने घेण्याचे वेड असते. प्रत्यक्षात पाहता देवपूजा ही शाळेत नाव टाकून हातात पाटी घेतल्याप्रमाणे आहे. नुसती पाटी हाती घेतल्यानं लिहिणं साधेल काय? आणि लिहिणं आल्याशिवाय त्याचा लाभ कसा मिळणार? त्याचप्रमाणे पूजा ही मूर्तीसाठी नाही तर मूर्तीचं पूजन आपण करतो ते त्याच्या गुणांची व त्याच्या कर्तव्याची ज्योत आपल्यात उजळली गेली पाहिजे म्हणून. या गुणांच्या अंगीकाराचं चिंतन जर पूजनात असेल तर आपल्या भावनेनेच ही बुद्धी कर्तव्यावर आरूढ होऊ  लागते. आपला स्वभावही बदलू लागतो. आपल्या वाणीतही तेज येऊ  लागते. असं झालं तरच आपण त्या पूजेची साधना उत्तम केली असं होईल ना? म्हणे रोज आखाडय़ाचं पूजन करतो, पण दंड, कुस्ती करीत नाही. रोज कवायतीला जातो, पण पाय उचलत नाही. अशानं काय लाभ होणार? म्हणून माझं सांगणं आहे की, मूर्तिपूजा ही ती मूर्ती ज्या देवाची आहे त्याचे गुण अंगात यावेत, यासाठी आहे. त्याकरिता, ते गुण अंगी बाणविण्याकरिता जी वृत्ती लागते, जो त्याग लागतो, जो स्वभाव लागतो तो आपल्यात निर्माण करण्याचं धाडस वाढवू या. पूजा जरा कामी होत जावी, पण कर्तव्य वाढीस लागावं. ध्यान मनात वाढो, पण शरीरानं कार्य वाढो. मंदिरात जरा कमी बसावं, पण दीनदु:खितांची करुणा वाढो. पोथीही वाचून काही शिकावं, नुसती पारायणं करू नयेत. शब्दांच्या अर्थाकडे लक्ष ठेवावं. ही सर्व साधना माणसानं उत्तम माणूस बनावं एवढय़ासाठी आहे. या गोष्टीची जाण ठेवून अभ्यास करावा. आपल्या मनावर ताबा ठेवा की पूजेच्या वेळी मनाला भटकू देणार नाही. आपलं शरीर नेहमी स्वच्छ, आहार अल्प व झोप कमी होईल असं करा. सत्संगाचा लाभ घेत जा म्हणजे तुमची मूर्तिपूजा सार्थकी लागेल. कुणी विचारतात की, आम्ही सर्वस्वाचा त्याग केला आहे. मग आता आम्ही भगवंताच्या पूजेशिवाय आणि नामस्मरणाशिवाय अन्य काही का करावे? पण असं बघा. पाणी थेंबाथेंबानं घटात प्रवेश करते. मग तो घेत साठलेलं पाणी बागेला देतो. एकदा पाणी देऊन झाल्यावर घटाचं काही काम राहात नाही का? थेंबाच्या संग्रहानं घट भरतो व घटाच्या मदतीनं बाग पिकते. म्हणजे पिंड पोषण होते आणि पिंडरूपी मनुष्य हा ब्रह्मांडाचं अंग बनून आपलं कार्य चालवतो व अनंत ब्रह्मांडाचा संग्रह असा जो अनंत कोटी ब्रह्मांड नायक तो आपल्या लीलेने जगाचा सांभाळ करतो. हाच तर त्याचा क्रम आहे. यातून कुणासही सुटका नाही. दर्जा बदलतो, रूप बदलते, कामे बदलतात, पण हा जीवात्मा विशाल रूप धारण करून शिवरूपाशी मिळून समाजाच्या उद्धाराला पात्र होतो ना? हेच तर देवाचं दर्शन आहे. हा क्रम चुकवून जर एखादा भक्त कर्मठ भक्तीच करीत राहिला तर तो कधीच देवाशी समरस होऊ  शकणार नाही. देवाशी समरस होणं म्हणजे कार्यरत राहणं. अनंत परीनं आपलं व्यक्तिरूप समष्टीत बदलून घेणं. देवाची स्थूल भक्ती ही देवाची पहिली पायरी आहे आणि देवाचं कार्य अंगीकारणं हेच भक्तांचं खरं काम आहे. भक्त म्हणजे देवाची सावली, देवाची इछाशक्ती. ज्याप्रमाणे चंदन सुगंधाला आणि साखर गोडीला सोडू शकत नाही त्याचप्रमाणे परमेश्वर आणि भक्त अभिन्न असतात. त्यासाठी भक्तीचं आणि पूजेचं मर्म मात्र लक्षात घेतलं पाहिजे.

संत तुकडोजी महाराज 

(‘राष्ट्रसंतांची पत्रेया श्रीगुरुदेव प्रकाशन, तिवसा यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातून संकलित).