कढीपत्ता हा भारतीय वंशाचा, मध्यम उंचीचा, बहुवर्षीय सदाहरित वृक्ष आहे. murraya  koenigii या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वृक्षाची पाने फांदीवर एकाआड एक येतात, गर्द हिरवी आणि संयुक्त असतात. स्वयंपाकघराशी जास्त सलगी असणारा हा वृक्ष ग्रामीण भागाबरोबरच बंगलेधारकांच्या परसदारी आणि सदनिकांच्या बाल्कनीमध्ये एखाद्या कुंडीत गौरवाने विराजमान झालेला असतो. याच्या पानांना असलेला विशिष्ट प्रकारचा गंध पदार्थाची चव वाढवतो. दाक्षिणात्य करीमध्ये त्याने कायमचे घर केले आहे. म्हणूनच त्याचे करिपत्ता असे बारसे झाले आहे. महाराष्ट्रीय आणि गुजराती थाळीतील कढीचा अप्रतिम स्वाद याच पानामुळे येतो. म्हणून आपल्याकडे त्यास कढीपत्ता असे म्हणतात. गरम पदार्थात हा गंध चटकन जाणवतो. कढीपत्त्यामध्ये असलेल्या विशिष्ट तेलयुक्त घटकामुळे हा गंध असतो. या घटकात अनेक औषधी गुणधर्मसुद्धा जोडलेले आहेत. अपचन, रक्तमधली साखर आणि कोलेस्टेरॉल कमी करण्याबरोबरच अजून एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे अकाली पांढरे होत असलेले केस परत काळे होणे. कोवळ्या पानांपेक्षा जुनी पाने जास्त औषधी असतात. औषधी गुणधर्माचा फायदा होण्यासाठी पदार्थामधील कढीपत्त्याची पाने चावून खावी लागतात. आपण मात्र त्यांना सर्वप्रथम पानाबाहेर काढतो. आहारशास्त्रानुसार हे चुकीचे आहे. कढीपत्ता वृक्षाचे पुनरुत्पादन बीज किंवा फांदीने तर होतेच, पण मुळापासून फुटलेल्या सकसाद्वारे अधिक वेगाने होते. बियापासून रोप तयार होण्यास वर्षांचा कालावधी लागतो. शाखा पुनरुत्पादनसुद्धा मंद प्रक्रिया आहे. सकसा म्हणजे जमिनीलगतच्या मुळापासून पृष्ठभागावर येणारे कोंब. कढीपत्त्याचा मातृवृक्ष प्रतिवर्षी त्याच्या सावलीत शेकडो रोप बाळांना जन्म देतो. परसदारी वाढलेल्या कढीपत्त्याची रोपे फेकून दिली जातात. झाडाच्या भोवती भरपूर पाणी देऊन मुळाजवळील माती हलक्या हाताने दूर करून रोपे सहज काढता येतात. ही रोपे कोणत्याही जमिनीत सहज रुजतात. अशा पद्धतीने काढलेली कढीपत्त्याची रोपे सणवार, समारंभ अशा प्रसंगी भेट म्हणून देता येतील. अशा पद्धतीने वृक्षभेट देणे हेसुद्धा एक वृक्षारोपणच आहे.

डॉ. नागेश टेकाळे

Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ
Video Of Baby Turtles Making Their First Voyage Will Give You Goosebumps
Video : डायनासोरच्या काळापासून अस्तित्वात आहे ही कासवांची प्रजाती, चिमुकल्या कासवांचा पहिला समुद्र प्रवास एकदा बघाच
navy deployed 11 submarines in indian ocean
विश्लेषण : एकाच वेळी ११ पाणबुड्या हिंद महासागरात तैनात… भारतीय नौदलाचे चीनवर लक्ष?
west bengal politics
पश्चिम बंगालमधील जागावाटपावरून डाव्या पक्षांत मतभेद; सीपीआय (एम) आपल्याच चक्रव्यूहात अडकत असल्याची चिन्हे?

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

वॉर्सा ज्यूंचा मृत्युतळट्रेबिलका

पोलंडची आजही राजधानी असलेल्या वॉर्सा शहरात ज्यू समाज प्रथम चौदाव्या शतकात वसतीसाठी आला. हा समाज इतर पोलिश समाजात कधीच एकरूप झाला नाही आणि पुढचे वॉर्साचे राज्यकत्रे कधी ज्यूंबद्दल सहिष्णु होते तर कधी त्यांच्या विरोधात होते. विरोधी राज्यकर्त्यांच्या काळात त्यामुळे ज्यूंची नेहमीच अवहेलना, छळवाद होत राहिला. सन १७७२  पर्यंत ज्यूंना  वॉर्सा शहराबाहेर वसती करता आली. पुढच्या रशियन राज्यकर्त्यांनी मात्र त्यांचा छळवाद केला, शेकडो ज्यूंना ठार मारले, त्यांना कपडय़ांवर ताऱ्याचे चिन्ह असलेला बिल्ला लावणे सक्तीचे केले. १७९६साली आलेल्या प्रशियन राज्यकर्त्यांनी ज्यूंवरची अनेक बंधने कमी केल्याने दहा वर्षांत ज्यूंची संख्या १२ हजार  झाली. ज्यूंमधील डॉक्टर्स, व्यापारी, सावकार, उद्योजकांना या सरकारने प्रतिष्ठित पोलिश लोकांच्या वर्तुळात राहण्यास परवानगी दिली. वॉर्सातील सामान्य ज्यू माणसाचेही पोलिश लोकांशी सलोख्याचे संबंध राहिले. परंतु एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस रशिया, लिथुआनिया, फ्रान्स, युक्रेन मध्ये ज्यूविरोधी लाट उसळून वॉर्सामध्ये मोठय़ा प्रमाणात स्थलांतर सुरू झाले. त्यामुळे १९३९ साली वार्सातील ज्यूंची संख्या चार लक्ष झाली. हिटलरच्या ज्यू द्वेषाचा परिणाम होऊन नाझी सरकारने १९४० साली ज्यूंना सार्वजनिक वाहनांतून प्रवास करण्यास बंदी घातली. १९४१ साली वॉर्सामधील ज्यू लोक निवडून निवडून एका गलिच्छ जागेत बाहेरून भिंत उभी करून त्यांना  तिथे डांबण्यात आले.  या जागेला ‘घेटो’ म्हणत. पूर्ण पोलंडमध्ये असे ६०० घेटो तयार करण्यात आले. केवळ दोन चौ.कि.मी. घेटोत चार लाख ज्यू कोंबण्यात आले. या ज्यूंची विल्हेवाट लावण्यासाठी नाझी सरकारने वॉर्सापासून जवळच ट्रेबिलका या गावात मृत्यू छावणी उभी केली. वॉर्साच्या घेटोमधून वीस रेल्वे वॅगन्समधून जनावरांप्रमाणे भरून सहा ते सात हजार ज्यूंना रोज ट्रेबिलका मधील मृत्यु छावणीत आणले जाई. तेथील गॅस चेंबरमध्ये एका वेळी साठ ज्यूंना कोंडण्यात येई. गॅस चेंबरच्या पाईपमधून कार्बन मोनाक्साईड गॅस त्यांच्यावर सोडून त्यांना मारण्यात येई. या पद्धतीने हिटलरने वॉर्सा घेटोतील चार लाख ज्यूंचे शिरकाण काही महिन्यांतच पुरे केले.

पोलंड तसेच जर्मनीत अनेक ठिकाणी हिटलरी विचारांना लोकांची साथ मिळाल्यामुळे झालेल्या  या शिरकाणाला ‘होलोकास्ट’ असे म्हटले जाते.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com