ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेच्या वेगात बदल घडून येतो; मात्र त्या पदार्थात कोणताच रासायनिक बदल घडून येत नाही अशा पदार्थाना ‘उत्प्रेरक’ म्हणतात. अनेक प्रकारच्या रसायनांच्या निर्मितीमध्ये उत्प्रेरकांची (कॅटालिस्ट) भूमिका महत्त्वाची असते. अवघ्या काही नॅनोमीटर व्यासाचे सूक्ष्मकण आणि पातळ आच्छादने यांच्या मूळ स्वरूपातून उत्प्रेरक तयार होतात. सध्या जशी गरज वा उपयुक्तता असेल तशी उत्प्रेरके तयार करण्याची शक्यता शास्त्रज्ञ अजमावून पाहत आहेत. काही पदार्थ मूलत: उत्प्रेरक नसतात, पण नॅनो पातळीवर पोहोचल्यावर उत्प्रेरक बनतात. सोने आणि तांब्यासारखे पदार्थ तर सिरॅमिक्सप्रमाणे कठीण होतात. मोठय़ा आकाराच्या स्वरूपात सोने हा धातू अक्रिय असल्यामुळे कोणत्याही नेहमीच्या रसायनांच्या अभिक्रियेपासून पूर्णत: वेगळा राहतो, म्हणून त्याला ‘राजधातू’ म्हणतात. मात्र अवघ्या काही नॅनोमीटर व्यासाच्या कणांच्या स्वरूपात असताना तो कार्बन मोनाक्साइडचे रूपांतर कार्बनडाय ऑक्साइडमध्ये होण्याच्या प्रक्रियेत उत्प्रेरकाची भूमिका बजावतो. हल्लीच्या तंत्रज्ञान प्रगतीमुळे नॅनोकणांची वाढ होताना त्याच वेळी त्यांच्या आकारमानाचे आणि आकाराचे निरीक्षण करता येते.
नॅनो पदार्थ इतर नेहमीच्या पदार्थापेक्षा वेगळे ठरण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे अणुपातळीवर वाढलेले सापेक्ष पृष्ठभाग क्षेत्र आणि दुसरे म्हणजे सुप्रसिद्ध पुंज परिणाम (क्वांटम इफेक्ट). यामुळे अभिक्रिया करण्याची क्षमता, मजबुती आणि विद्युतीय वैशिष्टय़े यांसारख्या गुणधर्मामध्ये बदल होतो. एखाद्या पदार्थाचे आकारमान जसजसे घटू लागते तसतशी त्याच्या पृष्ठभागावरील अणूंची संख्या अंतर्भागातील अणूंपेक्षा वाढायला लागते. उदा. ३० नॅनोमीटर आकारमानाच्या कणाच्या पृष्ठभागावर एकूण अणूंपकी ५ टक्के अणू असतात. १० नॅनोमीटर आकारमानाच्या कणात हेच प्रमाण २० टक्के असते, तर ३ नॅनोमीटर आकारमान असलेल्या कणात हेच प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत पोहोचते. म्हणजे पदार्थाच्या मोठय़ा आकारमानाच्या कणांपेक्षा नॅनोकणांमध्ये दर एकक वस्तुमानापेक्षा अधिक पृष्ठभाग क्षेत्र असते. एका विशिष्ट वस्तुमानाच्या मोठय़ा कणांच्या स्वरूपातील पदार्थापेक्षा नॅनोकणांच्या स्वरूपातील पदार्थाची अभिक्रिया घडवून आणण्याची क्षमता जास्त असते. कारण उत्प्रेरकांच्या साहाय्याने घडणाऱ्या अभिक्रियांची संख्या पृष्ठभागामुळे वाढते.
शैलेश माळोदे (नाशिक) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – सत्यम् ..सुंदरम् !
काही विचार, काही सुवचनं आपोआप सुचतात. अगदी चक्क अवेळी आणि अयोग्य ठिकाणीदेखील. (वॉशरूममध्ये किंवा कोणीतरी बाष्कळ बडबडताना इ.) ही वचनं आणि विचार त्या क्षणी स्वत:ची, इतरांची किंवा परिसराची अनोखी ओळख करून देतात. मनात काहीतरी लकाकतं आणि विरूनही जातं. नंतर आठवू म्हणता, त्यातलं सगळं आठवत नाही. असे काही स्फूर्तिदायक आत्मज्ञानाची जाणीव करणारे क्षण क्षणिक समाधी (खणिक सती) असते, असं तथागत म्हणाले होते.
इथली काही सुवचनं जे. कृष्णमूर्ती यांची; तर काही अशीच सहज.
* सूर्यास्ताचा क्षण : सत्यम्, सुंदरम्
मन स्वच्छ नि निर्मळ होतं. कसलेही विचार नव्हते, ना मागचे, ना पुढचे; फक्त मी होतो. समोर सूर्यास्त. वारा वाहत होता, रंग बदलत होते, पानं सळसळत होती, उजेड मंदावत होता, आकाशात पक्ष्यांच्या मालिका बाणासारख्या सर्रकन पुढे जात होत्या. शब्द नव्हते, आठवणी नव्हत्या, तो नव्हता, ती नव्हती, ते नव्हतं.
मग सूर्य नव्हता, वारा वाहत होता, पानं सळसळत होती, पक्षी उडत होते, मी नाहीसा झालो.
फक्त अस्तित्व, पूर्ण सत्य, साक्षात सौंदर्य.
– जे. कृष्णमूर्ती
* तुलना- स्पर्धा, दु:ख, असुंदरं, असत्यम्
तुलना म्हणजे कमी-जास्त, तुझं नि माझं कोणाचं? मी वरचढ, तू कनिष्ठ, मी अधिक तू उणा. ही तुलना की स्पर्धा? स्पर्धा म्हणजे जिंकणं किंवा हरणं. जिंकण्याचं सुख क्षणिक, हरण्याचं दु:ख सातत्याचं. तू मागे म्हणून मी पुढे, पुढे नि मागे दोन्ही सापेक्ष. सापेक्ष म्हणजे तुलना, म्हणजे स्पर्धा.
मी संपूर्ण, तू संपूर्ण
माझा संपूर्णाचा शोध अविरत, जिंकणं नाही की हरणं नाही, शोध हेच सत्य, शोध हेच सौंदर्य.
*अंत:स्फूर्ती : सत्यम्, सुंदरम्
लक्षात आलंय का की स्फूर्ती येण्याचा क्षण तुमचा शोध थांबतो तेव्हा आपोआप उमलतो. अपेक्षा थांबल्या की मन शांत राहतं. मन आणि बुद्धी स्थिरावते. त्या एकाग्र क्षणी स्तब्ध मनाला अंत:स्फूर्तीने कल्पना सुचतात ते सत्य असतं-
– जे. कृष्णमूर्ती
* प्रज्ञा : सचिनं, शिवम
प्रज्ञा-शहाणपण म्हणजे साचवलेल्या स्मृती नव्हे. शिस्तपालनाची दक्षिणा देऊन गुरूकडून मिळवलेलं ज्ञान नव्हे. प्रज्ञा म्हणजे सत्याची सजीव, साक्षात्कारी मंगलमय जाणीव.
-जे. कृणमूर्ती.
 डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…

प्रबोधन पर्व – शेतीसाठी पाणी आणि भूजलाचा विचार..
‘‘आपल्याकडील पिण्याच्या पाण्याबाबत वैचारिक आणि मानवी आरोग्यासंबंधीची सर्व पातळीवर आणि प्रशासकीय पातळीवर किती अनावस्था व गोंधळाची परिस्थिती आहे याची कल्पना करताना मन विषण्ण होते.. उत्तरेत गंगेच्या पाण्यात पूर्ण न जळालेली प्रेतेही फेकण्यात येतात. एवढा फरक जर सोडला तर महाराष्ट्रातील नद्यांच्या आणि गंगेच्या पाण्याच्या प्रदूषणात फारसा फरक नाही.. प्रदूषित पाणी हे ८० टक्के रोगांचे उगमस्थान असते. त्या पाण्याच्या शुद्धतेबाबत आपल्याकडे फारशी चर्चा होताना दिसत नाही.. महाराष्ट्रातील सुमारे ३५ टक्के भाग हा दुष्काळीच भाग आहे. दुष्काळी भागात पाणी तर दुर्मिळ संपत्ती आहे. म्हणून उपलब्ध जलसंपत्तीचा योग्य तऱ्हेने वापर करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.. पिकांच्या गरजेनुसार आणि पाहिजे तेव्हा पाणी देण्याच्या पद्धतीसंबंधी शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार होणे महत्त्वाचे आहे. केवळ लोकशिक्षणानेच हे काम होऊ शकेल.’’ अण्णासाहेब शिंदे यांनी ‘शेती आणि पाणी’ (१९८७) या पुस्तकात भारतातील पाण्याच्या समस्येचे परखड विवेचन करताना लिहिले आहे –
‘‘शेतकी मंत्रालयाच्या वतीने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती, उत्पादनखर्च, शेती-व्यवस्थापनाचे प्रश्न यांवर पुरेसा प्रकाश पडेल असे अभ्यास पूर्वी केले जात असत. आता हे अभ्यास बंद करण्यात आले आहेत. कृषिमंत्रालयाचा हा निर्णय अदूरदर्शीपणाचा आहे.. भारतातील जमिनीला झाडाचे आणि गवताचे संरक्षण न राहिल्यामुळे दोन प्रमुख दुष्परिणाम झाले आहेत. भारतीय जमिनीची धूप इतक्या प्रचंड प्रमाणात प्रतिवर्षी होत आहे की, लक्षावधी एकर क्षेत्रातील सुपीक जमिनीचा वरचा थर नाहीसा होत चालला आहे. प्रतिवर्षी १२ हजार दशलक्ष टन माती वाहून जात असावी असा अंदाज आहे.. याचा पर्यावरणावर अतिशय प्रतिकूल परिणाम झाला. निसर्गाचा समतोल बिघडला. कधीकाळी होणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास वाव राहिला नाही. नैसर्गिक पाण्याचे प्रवाह कोरडे पडले. भूगर्भातील पाण्याच्या उपलब्धतेवरही प्रतिकूल परिणाम झाला.’’