१८७१ साली पिसाचे राज्य संयुक्त इटली प्रजासत्ताकाचा एक भाग बनले. दुसऱ्या महायुद्धामध्ये इटलीवर मोठय़ा प्रमाणात बॉम्ब टाकण्यात आले. इतर शहरांप्रमाणे पिसालाही या हल्ल्याची झळ पोहोचली. घरांची आणि चच्रेसची बरीच पडझड झाली. पिसाच्या चमत्कारी चौकातल्या डोमो ऊर्फ सांता मारिया कॅथ्रेडलची एक िभत उद्ध्वस्त झाली. पण आश्चर्य म्हणजे घंटाघराचा कलता मनोरा यातून सहीसलामत राहिला. इटालियन सरकारने यावर बराच मोठा खर्च करून व्यवस्थित डागडुजी केलीय. पिसाचे कॅथ्रेडल डोमो आणि त्याचा कलता मनोरा या प्रसिद्ध इमारतींशिवाय पिसा शहरात मध्ययुगीन काळातील भव्य, ऐतिहासिक प्रासाद, वीस गोथिक चच्रेस अशा रोमन वास्तुशैलीत बांधलेल्या इमारती आहेत. प्रबोधन काळातील कलाकारांनी रंगविलेली फ्रेस्को शैलीतील चित्रे, त्यांनी निर्मिलेल्या शिल्पाकृती यांनी संपन्न केलेली सहा म्युझियम्स आणि दहा कलादालने पिसात आहेत. पिसाचे अर्थकारण प्रामुख्याने व्यापार आणि पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे. पिसा शहराची लोकसंख्या सध्या ९० हजार तर उपनगरीय लोकसंख्या दोन लक्ष आहे. बाराव्या शतकात स्थापन झालेले पिसा विद्यापीठ हे इटलीतील सर्वोच्च गुणवत्तेचे शिक्षण केंद्र मानले जाते. इतर अनेक शिक्षण संस्था पिसात स्थापन झाल्या आहेत. इटलीशिवाय इतर युरोपियन देशांमधूनही येथे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. सेंट अ‍ॅना स्कूल ऑफ अडव्हान्स्ड स्टडीज ही त्यापकी एक विद्यार्थिप्रिय शिक्षण संस्था. पिसा शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी बससेवेचा उपयोग अधिक केला जातो. सार्वजनिक वाहतुकीवर ‘सीपीटी’ या प्रशासकीय खात्याचे नियंत्रण आहे. दोन रेल्वे मार्ग असलेल्या सीपीटी रेल्वेसेवेची दोन स्टेशन्स आहेत. हवाई सेवेसाठी पिसा शहरापासून दोन कि.मी.वर पिसा इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. पिसाचा कलता मनोरा ही पिसाची ओळख झालीय. शहरातल्या एका बिल्डरने कलत्या मनोऱ्याच्या उंचीएवढा, ५६ मीटर्स उंच तेवढय़ाच व्यासाचा आणि तेवढाच झुकाव असलेला काचेच्या िभती असलेला मनोरा नुकताच बांधून पूर्ण केला! फक्त ऑफिसेससाठी असलेल्या काचेच्या कलत्या मनोऱ्याचे सर्व गाळे विकले गेले!

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

साग

साग हा उंच, सरळसोट वाढणारा पानगळी वृक्ष आहे. ‘व्हरबेनेसी’ म्हणजेच ‘साग’ कुळातील हा वृक्ष मूळचा भारत, ब्रह्मदेश (म्यानमार) आणि जावा येथील आहे. तसेच उत्तर कर्नाटक व डांगच्या जंगलात उत्तम प्रतीचा साग होतो.

हा वृक्ष १० ते ४० मीटपर्यंत वेगवेगळ्या आकारांत वाढतो. याची पाने रुंद, ३० ते ६० सेंमी लांब व १५ ते ३० सेंमी रुंद आणि लंबगोलाकार असतात. पानाला किंचित टोकदार अग्र. वरचा पृष्ठभाग खडबडीत, खालच्या बाजूला मऊसर केस असतात. कोवळी पाने हाताने चुरल्यास बोटे तांबूस होतात. याच्या कोवळ्या पानाचा हातात धरून चोळामोळा केल्यास नंतर पान पूर्ववत होते. फुले पांढुरकी, खूप मोठी, शंकूच्या आकाराची असतात. फुलोरे फांद्यांच्या टोकाशी येतात. त्याला मंद वास येतो. त्याचा हंगाम जून ते सप्टेंबर असतो. फळे तपकिरी झाक असलेली गोलाकार व चारखंडी असतात. वरती निदल पुंजाचे आवरण फुग्यासारखे असते. फळांत दोनच बिया असतात. याचे लाकूड अत्यंत टिकाऊ असते. सागामध्ये ‘एॅन्थ्रक्विनोन’ व ‘नॅफथॅलिन’ ही रसायने असतात. या कीटकनाशकांमुळे या झाडाला कीड लागत नाही. सागाचा उपयोग, जहाजबांधणी, इमारती, नौका, पूल, बोटीवरील धक्के, फíनचर यासाठी करतात. सागाच्या बियांवर विशिष्ट प्रक्रिया करून नंतर त्याची लागवड करतात.

साग हा एक उत्तम प्रतीचे लाकूड देणारा वृक्ष आहे. म्हणूनच ब्रिटिशांनी भारतात मोठय़ा प्रमाणात सागाची लागवड करण्यावर भर दिला आणि प्रचंड मोठे क्षेत्र सागाच्या लागवडीखाली आले. आजही साग हे वन विभागाचे उत्पन्नाचे साधन आहे.

वनस्पतिशास्त्रातील याचे नाव ‘टेक्टोना ग्रॅन्डिस (ळीू३ल्लं ॠ१ंल्ल्िर२). शरीरावर कोठेही सूज आली असेल किंवा डोके दुखत असेल तर याचे लाकूड उगाळून लेप लावतात. लाकूड उकळवून पाणी प्यायल्यामुळे जंत नाहीसे होतात, अडकलेली लघवी सुटते. अंगाला पाणी लावल्यास खरूज व कृमी नाहीसे होतात.   पावसाळ्यात फुलल्यावर हे झाड खूपच आकर्षक दिसते.ू

अनिता कुलकर्णी (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org