गाव, राज्य किंवा देशपातळीवर कुठलाही कार्यक्रम आखण्यासाठी त्या क्षेत्राची लोकसंख्या किती, त्यात पुरुष, स्त्रिया आणि मुले यांची टक्केवारी किती, त्यांचे साक्षरता प्रमाण असे अनेक पलू कळीचे ठरतात. त्याबाबतीत मागील आकडेवारीचा कल बघता भविष्यात त्यात कसे बदल होतील याचे अंदाज बांधणे; हे एकूण नियोजनासाठी, मग ते सार्वजनिक क्षेत्रातील असो किंवा खासगी, महत्त्वाचे असते.

म्हणूनच नियमितपणे देशव्यापी शिरगणती किंवा जनगणना करणे, हे आता मूलभूत मानले जाते. त्याबाबत कौटिल्यच्या अर्थशास्त्र (इसवी सनपूर्व ३०० वर्षे) तसेच १५ व्या शतकातील आइने-ए-अकबरी या ग्रंथातही चर्चा आढळते.

According to the United Nations Population Fund UNFPA report the estimated population of India is 144 crores
भारताची लोकसंख्या १४४ कोटी, माता मृत्युदरात घट
Why Indian Muslims are banish from elections
भारतीय मुस्लीम निवडणुकीतून हद्दपार का?
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या
maharashtra, 24 40 percent families
धक्कादायक! राज्यात २४.४० टक्के कुटुंब दारिद्र्यरेषेखाली, नीती आयोगाच्या अहवालावर प्रश्नचिन्ह

भारतात १८६५-७२ दरम्यान पहिली लोकसंख्या मोजणी केली गेली; पण ती टप्प्याटप्प्याने केल्यामुळे विश्वासपूर्ण मानली जात नाही. मात्र १८८१ साली अशी मोजणी एकाच वेळी सर्व देशभर केली गेली आणि त्यानंतर दर दहा वर्षांनी ही विराट प्रक्रिया आपल्या देशात २०११ पर्यंत सतत पार पाडली गेली आहे. विकसनशील देशांत भारत हा एकमेव देश आहे, जिथे मागील १०० वर्षांहून अधिक काळ अशी जनगणना अखंडितपणे आणि बहुतांश समाधानकारकरीत्या झालेली आहे. ही एक मोठी उपलब्धीच आहे.

केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाचा भाग असलेली जनगणना (सेन्सस) संस्था हे काम आयोजित करते. रजिस्ट्रार जनरल हा तिचा प्रमुख असतो आणि प्रत्येक राज्यात या संस्थेचे कार्यालय असून सेन्सस कमिशनर हा त्याचा प्रमुख असतो.

मोजणीच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक वास्तू ते निवासी घर, कार्यालय किंवा कारखाना आहे किंवा कसे हे निरीक्षण करून त्यांना त्या गटाप्रमाणे क्रमांक दिले जातात. ग्रामीण भागात १५० तर शहरी भागात १३० निवासी कुटुंबे या प्रमाणात एक प्रशिक्षित गणना कर्मचारी सदर क्रमांकित घरी त्यांची भेट घेऊन निर्देशित प्रपत्रात सर्व कुटुंब सभासदांची आकडेवारी भरतो. हा कार्यक्रम देशभर जवळपास एका निश्चित पंधरवडय़ातच पूर्ण केला जातो.

या आकडेवारीचे संगणकाद्वारे संकलन करून विविध प्रशासकीय स्तरांसाठी अहवाल, तक्ते आणि आलेखरूपात माहिती प्रसिद्ध केली जाते. आíथक, सामाजिक आणि सुविधांचे नियोजन करण्यास तिचा वापर होतो. असा माहितीसाठा संशोधकांसाठी एक खजिनाच असतो.

डॉ. विवेक पाटकर

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

गणदेवता : गावाची गाथा!

कादंबरी कुणा एका नायकाची कहाणी नाही, तर सगळ्या गावाची गाथा आहे. बारा बलुतेदारी, जातनिहाय कामाची रीत हळूहळू बदलू पाहतेय. औद्योगिक क्रांतीने सारी समाजरचनाच ढवळून निघते आहे.

या कथेचं केंद्र शिवकालीपूर हे गाव आहे आणि त्यातील मुख्य पात्रे गावात राहणारी विभिन्न जातींची आणि व्यवसायाशी संबंधित अशी माणसे आहेत. शिवकालीपूर गावातील मयूरेश्वर शिवाच्या मंदिरातील चंडीमंडपामध्ये पंचायत जमली आहे. गावचा लोहार अनिरुद्ध आणि सुतार गिरीश- यांच्याविरुद्ध ही भरली आहे, कारण हे दोघे, मयूराक्षी नदीपार जाऊन तेथे आपला परंपरागत व्यवसाय नव्या दुकानामध्ये सुरू करणार होते. अर्थातच ते तिकडे गेल्याने गावातील औत अवजाराची कामे, दुरुस्त्या अडून राहिल्या असत्या.  याविरुद्ध दाद मागण्यासाठीच चंडीमंडपात सगळे जमले होते. पंचायतीमध्ये सुतार-लोहाराविरुद्ध तक्रार मांडली गेली. यांच्या जाण्याने शेतीची कामे ठप्प होणार म्हणून छिरू पाल आवेशाने बोलू लागला. त्यावर अनिरुद्ध म्हणाला, ‘‘तुम्हा लोकांची अडचण होणार हे खरंय्, पण आत्तापर्यंत मी तुम्हा लोकांचे फाळ पाजळून देतो, चाकावर धावा चढवतो, कुऱ्हाडी, कुदळी बनवून देतो आणि त्याबद्दल तुम्ही लोकांनी मला धान्य द्यायचं असतं, दरेक नांगरधारी शेतकऱ्याने १०० शेर शेतधान्य द्यायचं अशी पूर्वापार चालत आलेली गावकीची रीत; परंतु आम्हाला ते पूर्णपणे कधीच मिळत नाही.’’

‘‘नाव सांग बरं कोणी नाही दिलं धान्य त्यांचं, नुसती ढगात गोळी नको मारू.’’ छिरू पाल तणतणला. त्यावर ताडकन् अनिरुद्ध लोहार छिरू पालला म्हणाला, ‘‘तुमच्याकडेच बाकी आहे. दोन वर्षे तुम्ही धान्य दिलेले नाही.’’

यावर खूप वादावादी, चिडचिड झाली. तेव्हा तिथून निघून जात अनिरुद्ध म्हणाला, ‘‘छिरू पालवर नियंत्रण ठेवू न शकणाऱ्या पंचायतीची जरुरी आम्हाला नाही.’’

गावातील या विरोधाचा परिणाम एवढा भयंकर झाला की, दुसऱ्या दिवशी अनिरुद्धच्या दोन बिघ्यांतील पीकच कोणी तरी कापून नेलं.

न्याय-अन्यायाच्या, जुलमाच्या या कथा वर्षांनुवर्षे घडत आल्या आहेत आणि त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांची छिरू पालसारखी कपटी माणसं कशी वाताहत करतात- याचं सत्यदर्शनच लेखक ताराशंकर बंद्योपाध्याय यांनी अनेक उदाहरणांतून घडवलं आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com