बडोद्याचे महाराजा खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी जमनाबाईने मुलीला जन्म दिल्यामुळे खंडेरावाचा दुर्वर्तनी भाऊ मल्हाररावाचे बडोदय़ाच्या राजेपदावर शिक्का मोर्तब झाले. भावाच्या मृत्यूनंतर अचानक मिळालेल्या राजेपदामुळे मल्हाररावाने शाही खजिन्यातून वाटेल तशी उधळपट्टी सुरू केली. आपल्या मर्जीतल्या लोकांना हत्ती, घोडे, पालख्या अशा देणग्या सुरू केल्या. सोन्याची संपूर्ण भरीव तोफ तयार करून ती तोफ त्याने मोत्यांच्या गालीच्यावर आपल्या महालात ठेवली.
मल्हाररावाने कर्नल फेअरवर केलेला विषप्रयोग, त्याचा बदफैली, अनागोंदी कारभार सुधारण्यासाठी ब्रिटिशांनी दादाभाई नौरोजींना बडोद्याचे दिवाण नियुक्त केले. परंतु त्यांनाही मल्हाररावाने दाद दिली नाही. मग लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्या. म. गो. रानडे आणि दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटिश व्हाइसरॉय नॉर्थ ब्रूक यांच्याकडे, मल्हाररावास पदच्युत करून जमनाबाईस गायकवाड घराण्यातील एखाद्या मुलास दत्तक घेण्यास परवानगी देण्याची शिफारस केली. व्हाईसरॉयने ती शिफारस मान्य करून मल्हाररावास त्वरित अटक करून मद्रासमध्ये कैदेत ठेवले. बडोदा संस्थानचा कारभार पुढील व्यवस्था होईपर्यंत संस्थानाच्या रेसिडेंटकडे सोपविला.
ब्रिटिश सरकारने प्रशासनाचा अनुभव असलेले, तंजावरचे राहणारे थोर मुत्सद्दी सर टी. माधवराव यांची बडोदा शासनाच्या दिवाणपदी नियुक्ती केली. टी. माधवराव यांनी तत्पूर्वी इंदूर आणि त्रावणकोर संस्थानांचे दिवाण म्हणून उत्तम कामगिरी बजावली होती. मल्हाररावाने आपल्या उधळपट्टीने राज्याचा खजिना रिकामा करीत आणला होता. माधवरावांनी राज्याची अर्थव्यवस्था पूर्ववत होण्यासाठी कठोर उपाययोजना अंमलात आणल्या.
त्यानंतर माधवराव आणि जमनाबाई यांनी राज्यासाठी लायक वारस शोधण्यासाठी गायकवाडांच्या नात्यातल्या मुलांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल – िपजण विभागातील यंत्रे -१  
िपजण विभागातील प्रक्रियेचे उद्देश साध्य करण्यासाठी कापूस सुटा किंवा मोकळा करून त्यातील कचरा काढून टाकणे हे कार्य करावे लागते. कापूस िपजून त्यातील तंतू सल व मोकळे करण्यासाठी कापसावर आघात करणे किंवा झोडपणे, कापसाला आंदोलित करणे, करवती दातांनी कापूस िवचरणे किंवा तीक्ष्ण खिळे कापसामध्ये खुपसून कापसाचे पुंजके सल करणे अशा विविध कृती कराव्या लागतात. हे सर्व एका sam05यंत्रामध्ये साध्य करणे शक्य नसते. म्हणून या विभागात अनेक यंत्रे वापरली जातात. सर्वसाधारणपणे या यंत्रांचे वर्गीकरण खाली दिल्याप्रमाणे करण्यात येते. गाठी खोलून त्यातील कापूस िपजण विभागातील पुढील यंत्रांना पुरविणे. अशा यंत्रांना गाठी खोलणारी यंत्रे (बेल ओपनर) असे म्हणतात. िपजण विभागात सर्वात प्रथम हे यंत्र येते.   कापूस मोकळा करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्रिया या अतिशय तीव्र किंवा कठोर असतात. अशा क्रिया एकाच वेळी केल्यास कापसाच्या तंतूंना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे या क्रिया अनेक टप्प्यात केल्या जातात. हे टप्पे क्रियांच्या तीव्रतेच्या चढत्या क्रमाने आयोजित केलेले असतात. गाठ खोलून गाठीतील कापूस पुढे आल्यावर त्यावर प्रक्रिया करणारे पहिले यंत्र हे सौम्य क्रिया करणारे असते. त्यामुळे या यंत्रांना सौम्य स्वच्छक (माइल्ड ओपनर) असे म्हणतात.
सौम्य स्वच्छक यंत्रामधून कापूस काही प्रमाणात सलसर होऊन कापसाच्या पुंजक्याचे आकारमान थोडे कमी झाल्यावर कापसाचे मिश्रण करण्यास योग्य परिस्थिती तयार होते. यासाठी िपजण विभागामध्ये  सौम्य स्वच्छक यंत्रानंतर तिसऱ्या क्रमांकावर जे यंत्र येते ते कापसाचे मिश्रण करण्याचे काम करते. या यंत्राला मिश्रक (मिक्सर/ ब्लेंडर) असे म्हणतात.   मिश्रकानंतर येणाऱ्या यंत्राची प्रक्रिया अधिक तीव्रतेची असते त्यामुळे या यंत्राला तीव्र स्वच्छक (इन्टेंसिव्ह ओपनर) असे म्हणतात.
तीव्र उकलकानंतर कापसाचे पुंजके पुरेसे सल झालेले असतात. त्यामुळे या पुंजक्यांचा आकार अतिशय लहान व सूक्ष्म करून मोठय़ा प्रमाणावर त्यांच्यामधील कचरा काढणे सोपे झालेले असते. यापुढे येणारे यंत्र हे प्रामुख्याने कापसाचे सूक्ष्म आकाराचे पुंजके करून ते चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्याचे काम करते, त्यामुळे या यंत्राला सूक्ष्म स्वच्छक (फाइन ओपनर/ क्लीनर) असे म्हणतात.  िपजण विभागाच्या शेवटी येणारे यंत्र हे पुढील विभागातील यंत्रांना कापसाचा पुरवठा करण्याचे काम करते.
चं. द. काणे  (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ – office@mavipamumbai.org

MP Dhananjay Mahadik, Leads Campaign for Mahayuti, Sanjay Mandlik, Kolhapur lok sabha seat, Rajarampuri peth, Shahupuri peth, people united to campaign,
संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पदफेरीत राजारामपूरी, शाहूपूरी व्यापारी पेठ एकवटली
virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
latur lok sabha marathi news, shivraj patil chakurkar latur latest news in marathi
शिवराज पाटील यांच्या ‘देवघरा’ बाहेरील गर्दी वाढली