समृद्ध वारसास्थान असलेले मुंबईतील अनोखे वनस्पती उद्यान अर्थात राणीचा बाग. २१ हेक्टर एवढय़ा भूखंडावर विस्तारलेली हिरवीगार राणीची बाग किंवा वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजे सिमेंट-काँक्रीटचा विळखा पडलेल्या आणि धुराने कोंदटलेल्या मुंबई शहराचे हरित-फुप्फुस आहे. इथे प्रवेश केल्या केल्या हवेतील ताजेपणा तर जाणवतोच व वाहनांच्या कोलाहलाची जागा पक्ष्यांचा किलबिलाट घेतो. राणीची बाग हे १५५ वष्रे जुने, २-ब दर्जाचे वारसा (हेरिटेज) मानांकन मिळालेले, सर्वाधिक भेट दिले जाणारे व मुंबई शहराचे भूषण असलेले एकमेव, सर्वात मोठे वनस्पती उद्यान (बॉटॅनिकल गार्डन) आहे.

इ.स. १८६१ मध्ये अ‍ॅग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेने  ‘व्हिक्टोरिया गार्डन्स’ या नावाने भायखळा येथे उभारलेले हे वनस्पती उद्यान २०१० साली केलेल्या सर्वेक्षणानुसार २८६ प्रजातींचे ३००० हून अधिक वृक्ष व ८५३ जातींच्या वैविध्यपूर्ण वनस्पती यांनी समृद्ध आहे. मुंबईतील इतर कुठल्याही उद्यानात इतके विस्मयकारक वनस्पती-वैविध्य सापडत नाही. येथील कित्येक वृक्षांनी शंभरी पार केलेली आहेत. तर काही इतके दुर्मीळ आहेत की मुंबईत अन्यत्र ते क्वचितच आढळतात. मुंबईतील महाविद्यालयांतील तसेच मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वनस्पतिशास्त्राचे विद्यार्थी येथे अभ्यासासाठी आणि भेटीसाठी येतात. भारतातील सर्वात मोठय़ा वनस्पतिसंग्रहालयांपकी एक असलेल्या मुंबईतील ‘ब्लाटर हब्रेरिअम’मध्ये राणीच्या बागेतील वनस्पतींचे ४६५ नमुने जतन केलेले आहेत. या उद्यानाचा आणखी एक मानिबदू आहे तो म्हणजे हिरव्या रंगाच्या लाकडी पट्टय़ांच्या जाळीने बनलेली, पुरस्कारपात्र ठरलेली वनस्पती संरक्षिका (कॉन्झर्वेटरी) जी लंडनमध्ये ‘क्यू’ येथे असलेल्या  ‘पाम हाऊस’च्या धर्तीवर उभारलेली आहे.

Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
satpura range marathi news, bhongarya bazar marathi news
सातपुडा पायथ्याशी होळीआधी भोंगर्‍या बाजारात ढोलचा निनाद!
South Mumbai Redevelopment plans
आमचा प्रश्न दक्षिण मुंबई : नियोजनाअभावी रखडलेल्या ‘झोपु’ योजना

पण अतुलनीय वनस्पतिवैविध्याबरोबरच त्या काळी युरोपमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘पुनरुज्जीवन’ या शैलीत उभारलेल्या या अनोख्या वनस्पती उद्यानातील तिहेरी कमान व लेडी फ्रेअर टेम्पल, तसेच ससून क्लॉक टॉवर ही वारसाशिल्पे राणीच्या बागेची शोभा द्विगुणित करतात. सुरुवातीला १३ हेक्टर जागेत सुरू केलेल्या या वनस्पती उद्यानात इ.स. १८९० मध्ये ६ हेक्टर जागेची भर घालून एक प्राणिसंग्रहालय विकसित केले गेले. इ.स. १९८० पासून याच उद्यानाचे नामकरण ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय’ असे झाले.

–  शुभदा निखार्गे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

 office@mavipamumbai.org

बायबल आणि महाकाव्यांतला इस्तंबूल परिसर

इस्तंबूल येथे साधारणत दीड सहस्रकभर प्रथम बायझंटाइन आणि नंतर ओटोमान साम्राज्याचे मुख्यालय होते. या दोन साम्राज्यांच्या राज्यक्षेत्राविषयी अगदी प्राचीन काळापासूनच अनेक जगप्रसिद्ध घटना घडल्या आहेत. इस्तंबूल जवळच्या इझमीर या गावात प्राचीन महाकवी होमर याचा जन्म झाला. त्याची प्रसिद्ध महाकाव्ये इलियड आणि ओडीसी याच प्रदेशातल्या लोकांवर बेतली आहेत. या महाकाव्यातील प्रसिद्ध ट्रोजन वॉर जिथे झाले ते ट्रॉय शहर इस्तंबूल जवळच आहे. येशू ख्रिस्ताची आई मेरीने आपल्या आयुष्यातील अखेरचे दिवस इसमीर गावाजवळच्या एफेसस या गावात घालवले. येशु ख्रिस्ताला जेरूसलेममध्ये क्रूसावर मारण्यात आल्यावर त्याची आई मेरी हिला सेंट जॉन याने सुरक्षेच्या कारणासाठी एफेसस येथे आणले. येथेच तिचे स्वर्गारोहण झाले असा समज आहे. बायबलमधील जुन्या करारात सांगितलेल्या कथेनुसार सर्व सृष्टीवर जलप्रलय झाला आणि जगाचा सर्वनाश ओढवला. त्यावेळी नोहा याने त्याकाळी अस्तित्वात असलेल्या सर्व प्राण्यांचे आणि वनस्पतींचे नमुने एका नावेत भरले. ती नौका ‘नोहाज् आर्क’ म्हणून बायबलमध्ये उल्लेखली आहे. जलप्रलय झाला त्यावेळी ती नाव पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत तरंगत शेवटी एका बुडालेल्या उंच पर्वत शिखरापाशी आली. नोहाने ती नाव त्या पर्वत शिखराला बांधून ठेवली. त्यातून पुढे प्रलय ओसरल्यावर नवीन प्राणीसृष्टी निर्माण झाली. नोहाने नाव बांधली त्या पर्वताचे नाव आहे माऊंट अरारत. हा माऊंट अरारतही ओटोमान राज्यक्षेत्रात, इस्तंबूलच्या जवळपासच आहे. नाताळच्या रात्री मुलांसाठी खाऊ, खेळणी आणून गुपचूप घराबाहेर ठेवणारा सांताक्लॉज हा मूळचा इस्तंबूलच्या पश्चिमेकडील डेम्रे या गावचा बिशप. हाच पुढे ‘सेंट निकोलस’ या नावाने ओळखला गेला. गरीबांना नाताळचा सण साजरा करता येत नाही म्हणून तो रात्री गुपचूप त्यांच्या घरासमोर फळे, केक वगरे ठेवून जाई. तसेच गरिबांना नकळत त्यांच्या अडचणीत आíथक मदत करी, दुष्काळात गरिबांना धान्य वाटप करीत असे. प्रथम हे सर्व देवदूत करतो असे लोकांना वाटे, त्याच्या मृत्यूनंतर लोकांच्या लक्षात आले की, हा बिशप निकोलस हे करत होता!

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com