कपडे पिवळे पडण्याची बहुतांश कारणे आपण जाणून घेतली आहेत. आपण कापड धुतल्यावर स्वच्छ पाण्यात ते दोन-तीन वेळा खळबळून घेतो. मशीनमध्येही असे दोन फेरे होतात. त्या वेळी निर्मलकात (डिर्टजट) वापरलेली रसायने पूर्णपणे निघून जाणे अपेक्षित असते. पण मळाचे सूक्ष्म कण काही प्रमाणात जसे कपडय़ावर परत चिकटतात. तसेच काही प्रमाणात निर्मलकातील रसायने थोडय़ा प्रमाणात कपडय़ात राहतात. कपडे पिळल्यावर आणि वाळवल्यावर त्यातील पाणी पूर्णपणे निघून जाते. पण रसायनांचे मात्र तसे होत नाही.
प्रत्येक धुलाईच्या वेळी पुन्हा नव्याने निर्मलकातील रसायनांचा वापर केला जातो. प्रत्येक धुलाईच्या वेळी थोडी थोडी करत ही रसायने कपडय़ात साठत जातात. साधारणपणे ५० ते ६० धुण्यांनंतर साठलेल्या रसायनांची ही मात्रा बरीच जास्त होते. यामुळे कपडे पिवळे पडू शकतात व कडकही होऊ शकतात. याशिवाय पाणी कठीण असेल तर निर्मलकातील काही रसायने पाण्यातील कठीणपणाशी संयोग पावतात. त्यातून पिवळट चिकट पदार्थ तयार होतो. हा पदार्थ कपडय़ावर बसला की कपडा पिवळा आणि कडक होऊ शकतो. पाणी कठीण असल्यास असे होणे अटळ आहे. म्हणून कपडे धुवायला पाणी घेण्याआधी त्या पाण्याचा थोडासा नमुना घेऊन त्यामध्ये चिमूटभर धुण्याचा सोडा (सोडियम काबरेनेट) टाकावा. पाणी हलवून काही काळ जाऊ द्यावा. जर पाणी कठीण असेल तर पांढरा गाळ खाली बसलेला दिसेल. त्यावरून पाणी कठीण असल्याची खात्री पटेल. असे कठीण पाणी असल्यास, बादलीत कठीण पाणी घेऊन त्यात धुण्याचा सोडा घालावा. काही वेळाने पांढरा गाळ खाली बसल्यावर वरचे पाणी धुवायला वापरावे. मशीनमध्ये पाणी घालताना पण ते पाणी असेच मृदू करून घालावे. यामुळे कपडे स्वच्छ व्हायला मदत होईल. कपडय़ाचा पिवळेपणा कमी ठेवता येईल. मुंबईसारख्या शहरात या कृतीची गरज पडत नाही. पण अन्य ठिकाणी पाणी कठीण असते. तिथे पाणी मृदू करण्याचा असा मार्ग अनुसरावा लागेल, तरच आपली धुलाई चांगली होईल. कपडे पिवळे पडायला काही प्रमाणात तरी पायबंद घालता येईल.

संस्थानांची बखर – हैदराबाद राज्यस्थापना
इ.स. १६८७ च्या दख्खनच्या स्वारीत औरंगजेबाने गोवळकोंडा किल्ल्यास वेढा घातला त्यात मोगल सरदार चिनखालीचखानचा मृत्यू झाला. त्याचा नातू मीर ओमारुद्दीन याला बालपणीच औरंगजेबाने मनसब दिले आणि त्याचे नाव चिन फतेखान असे केले.
या फतेखानचे पूर्वज मूळचे तुर्की. ते समरकंद येथून आलेले आणि मोगल सन्यात योद्धे म्हणून नोकरीस होते. मीर ओमारुद्दीन उर्फ कमरुद्दीनखान याने फरुखसियर याला आग्ऱ्याची मोगल बादशाही मिळविताना बरीच मदत केली होती. त्यामुळे बादशाहाने कमरुद्दीनखानाला ‘निजाम उल मुल्क’ आणि नंतरच्या बादशाहने ‘असफजाह’ असे खिताब देऊन त्याला दक्षिणेतल्या मोगल राज्यप्रदेशाचा निजाम म्हणून नियुक्त केले. पुढे इ.स. १७२२ ते १७२४ या काळात निजाम हा दिल्लीच्या बादशाहाचा वजीर होता. निजाम कमरुद्दीनने प्रथम आपली राजधानी औरंगाबाद येथे ठेवली होती. दिल्लीच्या बादशाहाशी पुढे न पटल्याने कमरुद्दीनाने १७२४ साली आपले स्वतंत्र राज्य स्थापून हैदराबाद येथे राजधानी केली.
कमरुद्दीन असफजाह याची हैद्राबाद राजेपदाची कारकीर्द इ.स. १७२४ ते १७४८ अशी झाली. स्वतंत्र राज्याची स्थापना होईपर्यंत इ.स. १७२० ते १७२४ या चार वर्षांत निजाम, बाजीराव पेशव्याशी दबून, नमून वागत असे. परंतु दख्खनमध्ये स्वतंत्र राज्याचा अधिपती म्हणून जम बसताच निजामाने शाहू महाराज आणि कोल्हापूरचे संभाजी महाराज यांच्यात दुही माजविण्याचा उद्योग सुरू केला. त्यामुळे बाजीरावाने १७२८ साली निजामावर स्वारी करून पालखेड येथे त्याचा पराभव केला. पालखेड येथे झालेल्या तहान्वये निजामाने मोगलांच्या दख्खनच्या सहा सुभ्यांमधून चौथाई वसूल करण्याचा हक्क शाहूमहाराजांना देण्याचे कबूल केले. तरीही निजामाने शाहूचा सेनापती ित्रबकराव दाभाडे यास बाजीरावाविरुद्ध फूस लावण्याचे कारस्थान केले. इ.स. १७४८ मध्ये निजाम उल मुल्क असफजाह प्रथम कमरुद्दीनचा मृत्यू झाला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Occultists who do modeling work career
चौकट मोडताना: मितूचं मॉडेलिंग
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…