१९३७ साली बगदादला लागून असलेल्या तिकरित या गावी जन्मलेले सद्दाम हुसेन अल तिक्रिती हे १९७९ ते २००३ अशा दोन दशकांहून अधिक काळ इराकच्या अध्यक्षपदी राहिले. त्यांच्या कारकीर्दीतील अखेरचा काळ अत्यंत वादळी ठरून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.

किशोरावस्थेतच विद्रोही बनून बगदादच्या तत्कालीन ब्रिटिश सत्तेविरोधी आंदोलनात सामील झालेले सद्दाम पुढे १९५६ मध्ये बाथ सोश्ॉलिस्ट पक्षात सामील झाले. पुढे ब्रिटिशसमíपत राजवट उलथवून अब्दुल कासिम याने बगदादचा कब्जा घेतला तेव्हा सद्दाम हे अब्दुलचे साहाय्यक होते. पुढे १९७९ मध्ये इराकचे तत्कालीन अध्यक्ष अल बकर यांना सत्तेवरून हटवून सद्दाम हुसेन स्वत: अध्यक्षपदी आले.

article about conspiracy to defame the judiciary constitution protection by judiciary
लेख : न्यायपालिकेच्या बदनामीचे षड्यंत्र!
Fraud with trader dhule
पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?

१९८० साली बगदादने इराणशी सुरू केलेल्या युद्धात सद्दामने अमेरिकेची मदत घेऊन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित केले. हे इराण-इराक युद्ध काहीही निर्णय न होताच संपले. १९८२ मध्ये सद्दामनी त्यांना विरोध करणाऱ्या दुलजली खेडय़ातल्या शियापंथीय १५० लोकांचे शिरकाण करून १९९० साली तेलसंपन्न कुवेतवर हल्ला करून आखाती युद्धाची सुरुवात केली. या वेळी अमेरिकेने कुवैतची बाजू घेऊन बगदादवर तीन आठवडे बॉम्बफेक करून सद्दाम हुसेनला कुवैतवरचे आक्रमण मागे घेण्यास भाग पाडले.

आखाती युद्धामध्ये पराभूत होऊनही सद्दाम हुसेनचा बगदादवरचा अंमल चालूच राहिला आणि सद्दामनी कुवैत आणि अमेरिकेला अधूनमधून आव्हाने देण्याचा प्रकार चालूच राहिला. त्यावर अमेरिका आणि ब्रिटन यांच्या संयुक्त फौजांनी २००३ साली इराकवर हवाई कारवाई करून बगदाद उद्ध्वस्त केले. त्यांनी बाथ या सत्ताधारी पक्षावर बंदी घालून सद्दाम हुसेनना अटक केली आणि निवडणूक घेऊन नवे हंगामी सरकार आणले. या हंगामी सरकारने सद्दामवर १५० शियापंथीय लोकांना ठार मारणे, रासायनिक अस्त्रे बाळगणे आणि अमानवतावादी कृत्ये करणे असे आरोप ठेवून त्यांच्यावर खटला भरला. हे आरोप सिद्ध होऊन सद्दाम हुसेन यांना बगदादमध्ये ३० डिसेंबर २००६ रोजी फाशी दिले गेले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com 

 

भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ एच. वाय. मोहनराम

प्रा. होळेनर्सीपूर योगर्सम्हिन मोहन राम यांचा जन्म कर्नाटकात झाला. दहावीपर्यंतचे शिक्षण मसूर येथे झाले. बी.एस्सी.पर्यंतचे शिक्षण सेंट फिलामेनाज कॉलेज मसूर येथे झाले. त्यांनी बी. आर. कॉलेज येथून एम.एस्सी.चे शिक्षण पूर्ण केले.

वनस्पती  भृणशास्त्र  हा त्यांचा आवडीचा विषय होता. याच विषयातील संशोधनासाठी ते आग्रा येथे गेले. प्रा. पी माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून त्यांनी पीएच.डी. मिळवली. जेव्हा प्रा. माहेश्वरी आग्रा सोडून दिल्लीला आले तेव्हा प्रा. मोहनराम यांना दिल्ली विश्वविद्यालयात व्याख्याता म्हणून नोकरी मिळाली. याच ठिकाणी त्यांनी १९६१-६८ या काळात प्रा. पाठक आणि नंतर १९६८-९५ काळात प्राध्यापक आणि विभागप्रमुख ही जबाबदारी पार पाडली,  तेथूनच ते निवृत्त झाले. प्रा. माहेश्वरींच्या सल्ल्याने फुलब्राइट आणि स्मिथ मुंडट् फेलो म्हणून त्यांनी कान्रेल युनव्हर्सिटी इथाका, अमेरिका येथे प्रा. एफ. सी. स्टेवार्ड यांच्या मार्गदर्शनाखाली १९५८-६० या काळात प्लॅन्ट फिजिओलॉजी, मारफोजिनेसिस आणि टिश्यू कल्चर या विषयाचे प्रशिक्षण घेतले.

प्रा. मोहनराम इन्साचे वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून १९९६ ते २००१पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर आजपर्यंत ते मानद प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत.

त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे (सेक्स एक्स्प्रेशन इन, कॅनाबिस) पुिल्लगी फुलाचे स्त्रीिलगी फुलामध्ये रूपांतर होणे. एक महत्त्वाचे द्रव्य जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे असा िलगबदल होऊ शकतो. दु:ख निवारण आणि निद्रानाशसारख्या व्याधींवर अशा द्रव्याचा उपयोग होऊ शकतो. प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर्सचा वापर करून वनस्पतींची वाढ घडवून आणणे यावरही त्यांनी संशोधन केले आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ विद्यार्थ्यांना पीएच.डी. ही पदवी प्राप्त झाली. त्यांना यू.जी.सी.चा जे.सी. बोस पुरस्कार १९७९ मध्ये मिळाला. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स,  बंगळुरूचे ते १९७४ साली फेलो झाले. १९८० साली पी माहेश्वरी पुरस्कार पदक त्यांना   मिळाले. प्रा. मोहनराम इंडियन सायन्स काँग्रेसचे १९८० साली अध्यक्ष होते. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स अलहाबाद यांचेही ते फेलो होते.

डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org