जमशेदजी टाटा यांचे बडोद्याचे महाराज सयाजीराव यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. त्यांच्याकडे बडोद्याला जाणे-येणे होते. जमशेटजींना टाटा आयर्न अँड स्टील कारखाना चालू करताना सयाजीरावांनी अनेक प्रकारे मदत केली. एका भारतीय कारखानदाराने घेतलेली मोठी औद्योगिक झेप इंग्लंडच्या कारखानदारांना सहन न होऊन त्यांनी टाटांना अनेक प्रकारे त्रास दिला आणि आपला उद्योग बंद करण्याची त्यांच्यावर वेळ आणली होती; परंतु सयाजीराव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
सयाजीरावांनी टाटांना वेळोवेळी आíथक मदत तर केलीच, परंतु वेळप्रसंगी ब्रिटिश सरकारदरबारी आपले वजनही खर्ची घातले. कारखानदारी वाढू लागल्याबरोबर मोठय़ा उद्योगपतींच्या वास्तव्यासाठी मुंबई, कलकत्ता वगरे शहरांमध्ये तारांकित हॉटेलची आवश्यकता आहे हे महाराजांना जाणवले. त्यांनी ही गोष्ट जमशेटजींकडे काढली आणि अशा प्रकारचे हॉटेल टाटांनीच मुंबईत सुरू करावे असे सुचविले. महाराजांच्या प्रेरणेने टाटांनी मुंबईत तत्कालीन उच्च सुखसोयींनी समृद्ध असलेले, आशियातील सर्वोत्कृष्ट हॉटेल १९०४ साली सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘ताजमहाल हॉटेल’.
गुजरातमधील कपिलराम वकील हा तरुण इंग्लंडमधून रसायनशास्त्राची पदवी घेऊन आल्यावर समुद्री पाण्यापासून रसायन उद्योग मोठय़ा प्रमाणात सुरू करता येईल असा त्याचा कयास होता; परंतु अशा प्रकारचा उद्योग सुरू करण्यासाठी आíथक क्षमता त्याच्याकडे नसल्याने महाराजांनी टाटांना असा उद्योग करण्याविषयी सुचविले. टाटांनाही ही सूचना पसंत पडून त्यांनी ओखा बंदराच्या जवळ मिठापूर येथे ‘टाटा केमिकल्स’ हा रसायन उद्योग सुरू केला. त्या उद्योगाची तांत्रिक बाजू कपिलराम यानेच सांभाळली.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल: मिश्रक यंत्रे
कापसाचे मिश्रण करण्याच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. पूर्वी म्हणजे इ. स. १९०० ते १९८० पर्यंत कापसाचे मिश्रण करण्याच्या दोन मुख्य पद्धती प्रचलित होत्या.
थर मिश्रण पद्धत (स्टॅक मििक्सग) : या पद्धतीमध्ये ज्या गाठींमधील कापसाचे मिश्रण करावयाचे आहे, त्यामधील एका गाठीतील कापूस घेऊन त्याचा जमिनीवर १० ते १५ से. मी. उंचीचा एक थर बनविला जातो. नंतर दुसऱ्यात गाठीतील कापसाचा थर या पहिल्या गाठीतील थरावर पसरवला जातो. याप्रमाणे विविध sam03गाठीतील कापसाचे थर एकमेकावर एक अशा रीतीने पसरवले जातात. थरातील हा कापूस गिरणीतील वातावरणाशी समरस होण्यासाठी हे थर २४ तास तसेच ठेवले जातात. नंतर दुसऱ्या दिवशी या थरांतील कापूस थरांचा उभा छेद घेऊन काढला जातो व तो िपजणयंत्रणेस भरविला जातो. या उभ्या छेदामध्ये सर्व गाठीतील कापूस योग्य प्रमाणात मिसळलेला असतो.
थेट पद्धत : या पद्धतीमध्ये िपजण विभागात वापरावयाच्या गाठी उघडय़ा करून मानवचलित गाठ उकलकाच्या भरवणी साटीभोवती ठेवतात. ज्याप्रमाणात विविध प्रकारच्या कापसाचे प्रमाण वापरायचे असते, त्या प्रमाणात या गाठी घेतल्या जातात. यंत्रामध्ये कापूस टाकणारा कामगार प्रत्येक गाठीतील कापूस आळीपाळीने घेऊन भरवणी साटीवर टाकतो. अशा रीतीने कापसाचे मिश्रण करता येते.
वरील दोन्ही पद्धतींच्या मुख्य मर्यादा म्हणजे या प्रकारच्या मिश्रणासाठी भरपूर जागा लागते आणि मोठय़ा प्रमाणावर मनुष्यबळ लागते. या मर्यादा टाळण्यासाठी  यांत्रिकी मिश्रणप्रक्रिया विकसित करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये कापसाचे मिश्रण हे यंत्राच्या साहाय्याने करण्यात येते. या यंत्रास मिश्रक यंत्र असे म्हणतात.
मिश्रक यंत्रामध्ये ६ ते ८ उभे कप्पे असतात. या कप्प्यांच्या खालील बाजूस एक साटी असते. या पूर्वीच्या यंत्रामधून (सौम्य स्वच्छक यंत्रामधून) येणारा कापूस हा या कप्प्यांमध्ये एकामागोमाग एक असा भरला जातो. सर्व कप्प्यांत पुरेसा कापूस भरल्यानंतर कप्प्यांच्या खालील बाजूस असलेल्या साटीच्या साहाय्याने प्रत्येक कप्प्यातील कापूस घेऊन पुढील यंत्रास पाठविला जातो. अशा रीतीने सर्व कप्प्यांतील कापसाचे योग्य प्रमाणात मिश्रण केले जाते.
– चं. द. काणे  (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

devendra fadnavis manoj jarange patil
‘ब्राह्मणी कावा’, ‘विष देण्याचा प्रयत्न’, जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
What Amit Shah Said About Uddhav Thackeray?
“उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, म्हणून…”; अमित शाह यांचा गंभीर आरोप
What Jitendra Awhad Said?
“…तर अजित पवार शरद पवारांच्या पायाशी येऊन बसतील”, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य