झाडावरचे फळ पक्व होते तेव्हा त्यातील काबरेहायड्रेट अन्नाचे शर्करेत रूपांतर होते व आपल्याला गोड-मधुर फळे चाखायला मिळतात. काही फळे ही विशिष्ट हंगामातच मिळतात. पक्व झालेल्या फळात इथिलिन नावाचे रासायनिक द्रव्य तयार होते व ते फळ पिकविण्यास हातभार लावते. एखादे पक्व  झालेले फळ तयार फळांच्या सान्निध्यात ठेवले की इतर फळे तुलनेत लवकर पिकतात. कारण पक्व फळातील इथिलिन वायू त्यांच्या पिकण्याच्या प्रक्रियेस हातभार लावतो. कित्येकदा एखाद्या फळाच्या हंगामाच्या आधी आपणास ती फळे बाजारात दिसू लागतात. ती दिसायला आकर्षक असतात, पण चव योग्य नसते. कारण ती कृत्रिमरित्या पिकविलेली असतात. निसर्गत: पिकलेली फळे फारशी टिकत नाहीत, पण कृत्रिमरित्या पिकविलेली फळे बराच काळ टिकतात. त्यांचे रंग आकर्षक असतात. ती टवतवीत वाटतात. ही सारी त्यांच्यावर प्रयोग केलेल्या रसायनांची किमया असते. फळे पेटीत ठेवून त्यांच्यावर इथिलिन वायूचा फवारा दिला की ती जलद पिकतात. काही वेळा असिटिलीनचा वापर करतात. केळी, आंबे ही फळे खोलीत बंद करून या रासायनिक वायूचा मारा केला की, ती अपरिपक्व फळे पिकल्यासारखी होतात. त्यांचा रंग पिवळाधमक किंवा लालभडक होतो. ती दिसायला आकर्षक होतात. त्यामुळे, गिऱ्हाईकांच्या तोंडाला पाणी सुटते खरे, पण चवीच्या बाबतीत ती निराश करतात. कारण ती चवीला गोड नसतात. फळे पिकविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाइड या रसायनाचा देखील वापर होतो. ते फळावर लावले असताना हवेतील बाष्प शोषते व रासायनिक क्रिया होऊन असिटिलीन वायू मुक्त होतो. हा वायू फळांना पिकवतो. फळे व भाज्यांना रंग देण्यासाठी सुदानरेड, मेथॅनॉल, यलो लेड क्रोमेट या रंगीत रसायनांचा सर्रास वापर होतो. फळांना त्यांची इंजेक्शने टोचली जातात. ही इंजेक्शने फळे आणि भाज्या आकर्षक दिसल्या तरी पक्व नसतात. त्यात नसíगकरित्या शर्करा तयार झालेली नसते.
जोसेफ तुस्कानो (वसई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – मनाचं अधिराज्य
आधी मानसशास्त्रामधील एका प्रयोगातली गंमत सांगतो, मग त्याचा निष्कर्ष आणि त्यावर थोडंसं बोलू..
मानसशास्त्रज्ञांनी प्रयोगादाखल दोन पूल निवडले. एक उंच आणि खळाळत्या नदीवरचा. भरपूर वारा आणि पुलाच्या मध्य (सर्वात उंच) भागावर उभं राहिल्यास नक्की पाय लटपटतील असा. तर दुसरा पूल भावगीतात असावा तसा. शांत प्रवाहावरचा नि साधारण उंचीचा. दोन्ही पुलांच्या मध्यावर एक आकर्षक तरुणी उभी, चेहऱ्यावर मोकळं स्मित आणि बोलण्यात सहजपणा. ती जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांपैकी तरुणांना थांबवून किंचित आर्जवीपणानं म्हणते, ‘हे घ्या एक छायाचित्र. दोन-पाच मिनिटांत मला एक छोटासा गोष्टीवजा मजकूर लिहून द्या.. इथेच उभं राहून.’ छायाचित्रामध्ये एक तशीच आकर्षक तरुणी, चेहरा थोडासा झाकून कुठे तरी बोट दाखवते आहे.. मग किंचित थांबून म्हणते, ‘बाय द वे आम्ही वातावरणाचा लोकांच्या सर्जनशीलतेवर कसा परिणाम होतो, हे तपासून पाहतोय..’ दोन्ही पुलांवर तीच तरुणी, तेच फोटो, तेच स्मित, तीच वाक्यं. जे तरुण या प्रयोगात सामील झाले, त्यांच्याकडून लिखित मजकूर स्वीकारून झाल्यावर तरुणी त्यांना सहजपणे, ‘ओह! तुम्हाला या प्रयोगाच्या निष्कर्षांबद्दल कुतूहल वाटलं तर हा घ्या माझा (पर्सनल) फोन नंबर.’ म्हणून कागदाच्या चिठोऱ्यावर तो नंबर लिहून देते (कार्ड नाही). प्रयोगातल्या पाहणीवरून बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. उंच पुलावरच्या अधिक तरुणांनी सहभाग घेतला. तरुणांनी लिहिलेल्या मजकुरात बराच फरक होता. उंच पुलावरच्या मजकुरात प्रणयरम्यता होती (हायली रोमँटिक), पण भावगीत पुलावरच्या तरुणांनी लिहिलेल्या मजकुरात फारशी नव्हती.
..आणि उंच पुलावरील दुप्पट तरुणांनी त्या तरुणीला फोन करून प्रयोगाच्या निष्कर्षांविषयी विचारलं, रेंगाळून स्वत:ची माहिती दिली आणि तिच्याबरोबर ‘डेटिंग’ची इच्छा व्यक्त केली.. या प्रयोगाचा उद्देश काय होता? खरोखर वातावरण आणि सर्जनशीलता असा नव्हताच. खरं उद्दिष्ट होतं वेगळंच..
म्हणजे असं की, एखाद्या भय (धोका, जोखीम) निर्माण करणाऱ्या प्रसंगाच्या वेळी शरीरात अस्वस्थपणा जाणवतो. पाय लटपटणे, हृदयाची धडधड वाढणे, अंगावर काटा येणे, शब्द न सुचणे, शारीरिक बदलाची ही लक्षणं त्या उंच पुलावर उभं असताना तरुणांना जाणवत होती (हे सत्य मुख्य प्रयोगाआधी आजमावलेले होते.). मजकूर लिहिणाऱ्या आणि तरुणीचा फोन नंबर मिळणाऱ्या तरुणांनादेखील त्याच स्वरूपाची भयग्रस्तता अथवा मनात नि शरीरात उचंबळणाऱ्या भावना, अस्थिरता जाणवत होत्या. परंतु या तरुणांना मात्र या (भयाने) उद्दिपित झालेल्या भावना तत्कालीन (भयग्रस्त) परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आहेत हे कळलं नाही. त्या ऐवजी त्या क्षणी आपण प्रणयरंगात रंगतो आहोत, प्रेमाचे रोमांचक क्षण अनुभवतो आहोत असं वाटलं. म्हणजे शारीरिक जाणिवा (धडधडणे, अंगावर रोमांच इ.) त्याच पण मनानं त्यांचा अर्थ ‘भय’ असा न लावता ‘प्रेमात पडण्याचा रोमांचकारी क्षण’ असा लावला! मन कशाचा कसा अर्थ लावेल, यावर नेमकं भाष्य या प्रयोगानं केलं. ‘बंजी जम्पिंग’ करणाऱ्या, रोलर कोस्टरवरून धाडदिशी खाली येणाऱ्या लोकांच्या शरीरात भीतीचीच लहरी वा लाटा उमटतात, पण त्यांच्या दृष्टीने ते ‘थ्रिल’ असतं. याची अनेक उदाहरणं आणि उपयोजन लक्षात येईल. डोकं खाजवून पाहा ना..
शरीरावर मनाचं अधिराज्य! हेच खरं..
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com
संदर्भ: द आर्ट ऑफ चूजिंग; लेखक- शीना अय्यंगार.

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग

प्रबोधन पर्व – शेतीमालाचे राष्ट्रीयीकरण हाच उपाय
‘‘सहकारी संस्था व खाजगी व्यापारी व भांडवलदार यांच्या व्यवहारतील खरा फरक सरकारने ओळखून तो आपल्या धोरणात ठळक रीतीने दाखवला पाहिजे, याचीही आपण आग्रहाने मागणी केली पहिजे. या सर्वसाधारण बाबी झाल्या. यापुढे जाऊन महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्याच्या दृष्टीने सरकारी धोरणाचा मूळ पाया कसा बसवावा याबद्दलही आपण विचार केला पाहिजे. शेतीमालाच्या कीमतीत स्थर्य लाभावे व व्यापारी पध्हतीमुळे शेतकरी लुबाडला जाऊ नये हे उद्दिष्ट कोणासही पटेल. हे महाराष्ट्रपुरते साधण्याचा एकच मार्ग म्हणजे शेतिमालाचा घाऊक व्यापार, साठा, व त्यावरील प्राथमिक क्रिया यांचे राष्ट्रीयीकरण, असे माझे पूर्ण विचारांति बनले आहे. राष्ट्रीयीकरण शब्द खाजगी नफ्यासाठी होत असलेल्या व्यवहाराचे पूर्ण उच्चाटन होऊन विवक्षित क्षेत्रातील व्यवहार समाज -नियत्रणाखाली येणे या क्रियेस उद्देशून मी वापरीत आहे. .. राष्ट्रीयीकरण सर्वाशी सहकारी संस्थांच्या सहाय्याने होणे शक्य आहे,  नव्हे तर इष्ट  आहे.’’ अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ हे ‘सहकारी चळवळीचे समालोचन’ या लेखात (लेखसंग्रह खंड २ ) शेतीमालाच्या दरांबाबत उपाय सुचवताना लिहितात –  ‘‘शेतमालाच्या वारंवार अगर मोठा फेरबदल होऊ  न देणे सरकारचे आद्य कर्तव्य समजल्यास शेतीमालाची खरेदी, साठा, रूपांतर व क्रमाने शेतीमालाची कमी  – अधिक विक्री यांची जबाबदारी सरकारवर  येते. ही जबाबदारी पार पाडण्यास सहकारी संस्था हे एकच प्रभावी व समाजहितपोषक साधन आहे. सरकारने घालून दिलेल्या कीमतीच्या मर्यादित सहकारी संस्थांनी सर्व शेतमालची खरेदी करावी, सहकारी सहाय्याने बांधलेल्या कोठारांत या मालाचा आवश्यक संचय इष्ट काळापर्यंत करावा, ज्या कच्या मालाचे काही रूपांतर आवश्यक आहे ते यंत्रसहाय्याने किंवा इतर मार्गाने घडऊन आणवे आणि यथाक्रम  त्याच्या विक्रीची व्यवस्था करावी. यापकी कोणत्याच व्यवहारत खाजगी व्यापारयाचा शिरकाव होने अत्यंत अनिष्ट आहे. शेतीमालाच्या व्यापारातील खाजगी नफेबाजीचे स्थान हेच माझ्या मते मराठी शेतकरयांचे दारिद्ऱ्य व विघटना यांचे खरे कारण आहे.’’