बरीचशी वैद्यकीय व इतर महत्त्वाची रसायने किण्वन (फर्मेटेशन) क्रियेने बनवली जातात. प्रतिजीवके (एन्टीबॉडीज), संप्रेरके (हार्मोन्स) ही जीवाणूकृत किण्वन क्रियेने बनवली जाणारी महत्त्वाची रसायने. आपण जीवाणूंच्या पेशीमध्ये विकरांच्या (एन्झाइम्स) साहाय्याने कच्च्या मालाचे तयार मालात स्थित्यंतर घडवून आणत असतो. परंतु कित्येक वेळेस हे जीवाणू काही कालावधीत हे स्थित्यंतर घडवून आणण्याचे गुणधर्मही गमावून बसतात, तर कधी या जीवाणूवर काही विषाणू (व्हायरस) हल्ला करतात व त्यांना खाऊन टाकतात. यामुळे बरेच मोठे नुकसान होते.
        या सर्वावर शास्त्रज्ञांनी एक उपाय शोधला. त्यानुसार या जीवाणूंची विकरे वेगळी काढून ती प्लास्टिकच्या चाळणीवर किंवा नायलॉनच्या धाग्यावर स्थिरावून टाकतात. असे धागे कच्चा माल असलेल्या मोठमोठय़ा भांडय़ात सोडून आपल्याला अपेक्षित अशा रासायनिक प्रक्रिया घडवून आणू शकतात. तसेच हे धागे पुन्हा पुन्हा वापरता येतात. त्याहीपेक्षा अशी गटवार विभागांची प्रक्रिया करत बसण्यापेक्षा जर अशी एक नलिका तयार केली की जिच्यामध्ये विकर स्थिरावलेली चाळणी अथवा जाळे तयार असेल तर नलिकेच्या एका बाजूने कच्च्या मालाचा द्रव सोडला तर दुसऱ्या बाजूला आपल्याला हवे असलेले रसायन ताबडतोब मिळू शकेल. उदाहरणार्थ अमायालेज हे विकर पिष्टमय पदार्थाचे साखरेत रूपांतर करते.
        खादी उद्योगधंद्यात स्थर्य यावे म्हणून हातमागावर विणल्या जाणाऱ्या खादीत १० टक्के प्लास्टिकचे धागे वापरावेत, असा फतवा भारत सरकारने काढला. या मानवनिर्मित धाग्यांची किंमत कच्च्या मालाच्या तुटवडय़ाबरोबर वाढत जाणार आहे. यावर तोडगा म्हणून जर्मनीतील शास्त्रज्ञ केळीच्या सोपटय़ापासून मिळणाऱ्या धाग्यांचा उपयोग वस्त्राकरिता तसेच इतर क्षेत्रांतही करतात. केळीच्या सोपटय़ापासून मिळणाऱ्या धाग्यांपासून फरशा, चटया, दोर, कागद, पुठ्ठे तयार केले आहेत. तसेच आता ते कापूस, वेत व केळ्याच्या सोपटय़ाचे धागे यांचे मिश्रण इमारतीच्या तक्तपोशीकरिता वापरू लागले आहेत.

ल्ल अ. पां. देशपांडे  (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  ऋऋ्रूी@ें५्रस्र्ंे४ेुं्र.१ॠ

प्रबोधन पर्व
आत्मराज्य आणि हिंसक प्रतिकार
‘‘लोकसत्ता’’ या शब्दाने लोकमतानुसार चालणाऱ्या राज्यसंस्थेचा बोध होतो, ‘समाजसत्ता’ या शब्दाने समाजातील संपत्ती समाईक मालकीची समजावी हे ध्येय सूचित होते. त्याचप्रमाणे ‘आत्मसत्ता’ या शब्दाने इंद्रियसंयम आणि मनोविजय यांचा बोध होऊन आत्मराज्य या शब्दाने असा इंद्रियसंयमी व मनोविजयी मानवसमाजाची दंडहीन सामाजिक अवस्था सूचित व्हावी असे आम्हास वाटते. लोकराज्य अथवा लोकशाही आणि समाजवाद या दोहोंनाही अंतिम दृष्टीने मानव समाजातील या आध्यात्मिक संपत्तीचा आधार असला पाहिजे. हे ओळखूनच म. गांधी लोकशाही व समाजवाद या ध्येयांना मान्यता देतात. परंतु ते त्यांचे अंतिम ध्येय नसून ‘आत्मराज्य’ अथवा ‘अहिंसक अराज्यवाद’ हेच त्यांचे अंतिम ध्येय होय. म. गांधींनी भारतात या ध्येयास अनुसरून जी एक अहिंसक प्रतिकारशक्ती निर्माण केली व तिचा प्रभाव प्रचलित राजकारणावर पाडून दाखविला तशी अहिंसक प्रतिकारशक्ती टॉलस्टॉय किंवा त्यांचे अनुयायी यांना रशियामध्ये निर्माण करता आली नाही.’’ अहिंसक अराज्यवादाची संकल्पना स्पष्ट करत आचार्य जावडेकर हिंसक प्रतिकार व दंडविहीन समाज यातील फरक अधोरेखित करतात – ‘‘हिंसक प्रतिकाराचा आश्रय करून प्रत्येक राज्यसंस्थेला विरोध करीत राहिले तर समाजात एक र्सवकष हुकूमशाही प्रस्थापित होण्यासच अप्रत्यक्ष सहाय्य होते हे रशियातील अराज्यवाद्यांच्या इतिहासावरून कोणाच्याही लक्षात येण्यासारखे आहे. मानवाच्या आजच्या अवस्थेत केवळ एक अमूर्त ध्येय या रूपानेच चालू राजकीय व्यवहारांवर अराज्यवाद प्रभाव पाडू शकेल, पण तसा दंडहीन समाज आज मूर्त अवस्थेत आणता येणार नाही हे कोणाच्याही विवेचक बुद्धीस पटण्यासारखे आहे. तथापि अराज्यवादाचे अमूर्त ध्येय आपल्या जीवनात शक्य तितके मूर्त स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करणारे सत्याग्रही लोकसेवक समाजात आत्मबलाची जागृती व संघटना करून त्याचा प्रभाव प्रचलित राजकारणावर पाडू लागतील तर अनियंत्रित राज्यसत्तेचे लोकसत्तेत रूपांतर होऊ शकेल.’’

मनमोराचा पिसारा
‘तो बुरा मान गये.’
रंगीत पडद्यावर शेलाटय़ा बांध्याची नाकेली सायरा बानू लटक्या घुश्शात उभी आहे आणि तिच्या भोवती राजेंद्रकुमार आता ज्याला रेट्रो म्हणतात तसं जाकीट घालून गोंडा घोळतो. महम्मद रफी आपल्या मधुर किंचित लाळघोटय़ा सुरात तिची आर्जव करीत ‘तो बुरा मान गये.’ हे गाणं शंकर जयकिशन यांच्या दिग्दर्शनासमवेत म्हणतो.
६०व्या दशकातल्या लोकप्रिय नेमस्त शंृगारानुसार थोडी पळापळी, झाडाभोवती फेरे, कपडय़ांचे जोड न बदलता गाणं पेश होतं. अखेरच्या क्षणी नायकाला नायिका पटते आणि गाणं संपतं. त्या काळी गाणं लागलं की हमखास बाहेर जाऊन बिडीचे चार झुरके मारणारे लोक होते, यावर विश्वास बसणार नाही! मन लावून गाणं ऐकलं तेव्हा अचानक लक्षात आलं की हे गाणं एक झटय़ाक गझल आहे.
गझल कशी असावी (असावा) याच्या तांत्रिक बाबी पूर्ण करणाऱ्या गाण्यानं फसवलंच म्हणायचं.
गझलची पेशकशी जरा गंभीर आणि एखाद्या मजलिसमध्ये रसिकांची परवानगी घेऊन ‘ईर्षांद’ म्हटल्यावर पेश करायचे. चार शेरांची गुंफण. अर्थात ही पठडी झाली. पेशकशीमध्ये चित्रपटातल्या गझला फारशा अडकल्याही नाहीत.
आता ‘तो बुरा मान गये’ या ‘रदिफ’ वरून प्रसिद्ध पावलेला हा गझलचा मतला अगदी पर्फेक्ट आहे.
प्यार आँखोसे जताया तो बुरा मान गये
हाले दिल हमने सुनाया तो बुरा मान गये
तो बुरा मान गयेचा रदिफ पुढच्या पाचही दोन चरणांच्या शेरमधल्या दुसऱ्या ओळीत रिपीट झालाय. पैकी पोथीनिष्ठ गझलमध्ये बहुधा चार शेर असतात. इथे पाच आहेत. असो.
मतल्यामध्ये नायक आपली कैफियत नजाकतीने आणि खटय़ाळपणे मांडतो. तू खूबसुरत आहेस म्हणून केवळ तुझं सगळं खपतं आणि मी आशिक असल्यानं, मात्र मी वाईट ठरतो.
हा लटक्या त्राग्याचा सूर हसरत जयपुरीनं मस्त खुलवलाय.
वो तो हर रोज रुलाते हे घटाओंकी तऱ्हा
हमने इक रोज रुलाया तो बुरा मान गये.
क्या बात है!
या गझलमधून काफियाची लज्जतही खुशीनं सांभाळली आहे. रदिफपूर्वीच्या शब्दातली यमकात्मक संरचना जताया, सुनाया, दिखाया, रुलाया, आया, झुकाया या शब्दांमधून खुलते.
गाण्यातला खेळकर मूड लक्षात घेऊन गझलचा वेहेर (छंद / मिटर) आटोपता ठेवलाय त्यामुळे रफीच्या दमसांसमधून सुरांची उछलकुद आपल्याला खेळवते.
गझलमधलं प्रत्येक कडवं ही स्वतंत्र काव्यरचना होऊ शकते. उदा.
बेखुदी पर मेरी हसते रहे, शर्माते रहे.
अब जरा होशमें आया, तो बुरा मान गये.
म्हणजे, इथला माषुक अगदीच ‘हा’ झालाय. आता करू तरी काय? होशोहवा हरवून पागल झालो तर हसं होतं आणि होश ठिकाने आये, तर त्याबद्दल बुरा मान गये.
सर्व गझलमध्ये कवीच्या नावाची गुंफण करणारा ‘मक्ता असायला हवा, असं नाही.’ माझ्या लहानशा चुकीबद्दल मला दुष्मन मानतेस.
तुझ्या पायावर डोकं ठेवलं तरी .. तो बुरा मान गये.
मेरी इतनी तो हसरत मानो,
कि हमे ये ना कहना पडे, तो बुरा मान गये..

ल्ल   डॉ.राजेंद्र बर्वे