उत्तर युरोपातील, नियोजित नगररचनेनुसार बांधलेले पहिले शहर अ‍ॅमस्टरडॅम, हॉलंडच्या राजधानीचे शहर आहे. व्हेनिसप्रमाणे अ‍ॅमस्टरडॅमसुद्धा एक कालव्यांचे शहर आहे. एका केंद्रिबदूभोवती मोठय़ा होत जाणाऱ्या वर्तुळांप्रमाणे या शहरात कालव्यांचे जाळे तयार केले गेले. व्हेनिसमध्ये आधीपासूनच्या नसíगक कालव्यांच्या किनाऱ्यांवर वस्ती झाली; परंतु अ‍ॅमस्टरडॅममध्ये आधी बांधलेल्या रस्त्यांच्या सोयीने कालवे खोदण्यात आले. तेराव्या शतकात अ‍ॅमस्टेल नदीकाठी वसलेल्या या शहरात प्रामुख्याने मच्छीमारी करणाऱ्यांनी वस्ती केली. संपूर्ण हॉलंड देश समुद्रसपाटीखाली असल्याने अ‍ॅमस्टरडॅमही समुद्रसपाटीखाली तीन ते चार मीटर पातळीवर आहे. शहरातील गजबजलेल्या डॅमस्क्वेअर या चौकाच्या जागी पूर्वी येथल्या अ‍ॅमस्टेल नदीवर धरण बांधले होते. त्यामुळे या भागात वसलेल्या या शहराला ‘अ‍ॅमस्टरडॅम’ हे नाव पडले. अ‍ॅमस्टेल नदीच्या मुखावर अ‍ॅमस्टरडॅमचे ‘डॅमरॅक’ हे नैसर्गिक बंदर युरोपातील व्यापारासाठी एक महत्त्वाचे बंदर समजले जाते.

१२७५ साली बिशप फ्लोरिस (पाचवा) याने अ‍ॅमस्टरडॅम शहर आपल्या ताब्यात घेऊन एक महत्त्वाचे पाऊल उचलले. ते म्हणजे व्यापारी, मच्छीमारी व्यावसायिक आणि खलाशी यांना असलेला शहर प्रवेश कर म्हणजे टोल रद्द केला. या सवलतीमुळे शहरातला व्यापार वाढून ते समृद्धीकडे वाटचाल करू लागले. पंधराव्या शतकात अ‍ॅमस्टरडॅम हे हॉलंडमधील सर्वाधिक महत्त्वाचे व्यापारी शहर बनले. रोमन्स, स्पॅनिश, फ्रेंच आणि ब्रिटिश लोकांच्या वेळोवेळी झालेल्या आक्रमणांमुळे अ‍ॅमस्टरडॅमचा माणूस जात्याच कणखर, कष्टाळू आणि व्यवहारी बनला. व्यापाराच्या जोडीला जहाजबांधणी, दुग्ध व्यवसाय आणि चीज उत्पादन, बीअरनिर्मिती इत्यादी व्यवसायांची जोड देऊन संपन्न झालेल्या अ‍ॅमस्टरडॅमला आपल्या अस्तित्वासाठी निसर्गाशीही नेहमीच झगडावे लागले. समुद्रसपाटीखाली असल्याने ठिकठिकाणी डाइक्स म्हणजे बंधारे बांधून नदी आणि समुद्राचं पाणी थोपवून धरले आहे. हल्रेम नावाच्या तलावात भराव टाकून इथला विमानतळ बांधला गेला आहे!

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

डाळिंब

आजकाल बाजारात मुबलक प्रमाणात आपल्याकडे दिसणारे डाळिंब झुडूप वर्गातील, काटेरी वनस्पती मूळची इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान या प्रदेशांतील आहे. प्यूनिका ग्रँनाटम (ढ४ल्ल्रूं ॠ१ंल्लं३४े) हे शास्त्रीय नाव असलेले हे झुडूप साधारणपणे ३-५ मीटर उंच वाढते. पाने साधी, समोरासमोर असतात. अत्यंत मोहक अशा गर्द केशरी रंगाच्या ५-७ डािळबाचे फळ कापायला कसब लागतं. फळ कापताना जर आतले दाणे आडवे, उभे कापले गेले तर डािळबातला रस गळून जातो. डािळब फळाचा मुख्य प्रकार बेरी व उपप्रकार बॅलॅउस्टा हा आहे. ह्य़ात फुलाचे सर्व भाग बीजांडकोशाच्या वरच्या बाजूला असतात. ह्य़ा कोशात असलेल्या पातळ आवरणांनी कोशात अनेक कप्पे तयार होतात. फळधारणा झाल्यावर ह्य़ात अनेक बिया तयार होतात. ह्य़ा बियांवरच्या आवरणावर बाहेरच्या थरातील पेशी लांबट होतात. पेशीतला आतला गाभा रसाळ होतो आणि तोच आपण खातो.

हा रस गडद, तांबडा, मरून किंवा गुलाबी असतो. यात व्हिटॅमिन ‘सी’ भरपूर प्रमाणात असते. याशिवाय इतरही अनेक घटक असतात. फळ तयार झाले तरी त्यावर असलेल्या संदलाचा मुकुट आणि आत परागण नसलेले पुंकेसर तसेच राहतात. परागकण स्त्रीकेसरावर पडल्यामुळे पराग पिशव्या रिकाम्या होतात. डाळिंब कापताना हा मुकुट आडवा कापायचा मध्यभागी पांढरा घट्ट भाग दिसतो. त्यात सुरी घालून फळाच्या तळापर्यंत सालीवर रेघा पाडून घेऊन फळ सोलावे.

भांडय़ात पाणी घालून फळाचा सोललेला भाग पाण्यात बुडवून ठेवल्यास साल लगेच सोलले जाते. दाणे सुटे होतात. सालात असलेल्या फेनॉलिक या संयुगामुळे साल सोलताना हात थोडे काळसर होतात. हातावर िलबाचा सर आणि मीठ टाकून चोळले की डाग निघून जातात. दाण्यांमध्ये आणि फळाच्या आतल्या सालीत पॉलीफेनॉल्स असतात.

डािळबाच्या दाण्यात ८५ टक्के पाणी, १० टक्के शर्करा (फ्रुक्टोज आणि ग्लुकोज) १.५% पेक्टीन अ‍ॅस्कॉरबिक अ‍ॅसिड, मॅलिक अ‍ॅसिड, सायट्रिक अ‍ॅसिड ही बायोअ‍ॅक्टिव्ह कंपाऊंड्स व इतर काही रासायनिक द्रव्ये असतात.

डॉ. कांचनगंगा गंधे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org