प्रा. त्र्यंबक शंकर महाबळे यांचा जन्म १९०९ सालातला. अहमदनगर, नाशिक, हैदराबाद व मुंबई येथे त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून वनस्पतिशास्त्रात पीएच.डी. केली. त्यांनी पुण्याच्या बी.जे. मेडिकल महाविद्यालय, फग्र्युसन महाविद्यालय व नंतर अहमदाबाद आणि मुंबईच्या सरकारी महाविद्यालयातून अध्यापन केले. १९४९ साली पुणे विद्यापीठाची स्थापना झाल्यावर प्रा. महाबळे तेथे गेले. तेथे प्रथम प्राध्यापक आणि नंतर विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. अध्यापन आणि संशोधनकार्यात शिस्त, अचूकता, नियमितपणा, सूक्ष्म दृष्टी आणि अचाट स्मरणशक्ती ही त्यांची वैशिष्टय़े होती. उत्तम शिक्षणपद्धती, चांगली उपकरणे यामुळे पुणे विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाला लवकरच आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. त्यामुळे प्रा. महाबळे यांना अमेरिका, रशिया, इजिप्त इत्यादी देशांतून भाषणाची आमंत्रणे येत असत. पुणे विद्यापीठातील वनस्पतिशास्त्राचे उद्यान हे भारतातील विद्यापीठांच्या उद्यानातील एक आदर्श उद्यान म्हणून त्याला मान्यता मिळाली होती. तेथील वनस्पती जातींचा संग्रह, जिम्नोस्पर्म व पाम जातींच्या झाडांचा संग्रह हे समृद्ध तर आहेतच, पण संशोधनासाठी लागणारी दोन काचगृहे ही प्रा. महाबळे यांची दूरदृष्टी दाखवते. महाबळे यांना फग्र्युसन महाविद्यालयाचे प्रा. दीक्षित, बंगळुरूचे प्रा. संपतकुमार, लखनौचे प्रा. बिरबल सहानी अशांचे मार्गदर्शन लाभल्याने त्यांच्या संशोधन विषयात विविधता आली. टर्शरी काळातील वनसंपदा हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय होता. १९६९ सालच्या चंदिगड येथे भरलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे ते अध्यक्ष होते. नारळाच्या जातीच्या झाडांचे प्रकार आणि अश्मीभूत अवशेष यावर त्यांचा विशेष अभ्यास होता. दिल्लीच्या सीएसआयआर संस्थेने छापलेल्या वेल्थ ऑफ इंडिया या १० खंडांतील ग्रंथांचे ते उपसंपादक होते. वनस्पतिशास्त्रातील अनेक संस्थांचे ते अध्यक्ष होते. १९७१ सालच्या मराठी विज्ञान परिषदेच्या मुंबई येथे भरलेल्या सहाव्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. उद्योगधंद्यांनी संशोधन कक्ष सुरू करणे, कोकणपट्टीतील खार जमिनींच्या समस्या, देशात येऊ घातलेले पाण्याचे दुíभक्ष, जंगलतोड, सह्याद्री पर्वतराजीतील औषधी वनस्पतींची जोपासना इत्यादी विषयांत त्यांचा अभ्यास होता. वनस्पतींच्या विविध शाखांमध्ये त्यांनी संशोधन केले. हे संशोधन सुमारे १४० लेखांमधून प्रसिद्ध झाले आहे. अनेक एम.एस्सी. आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना महाबळेसरांच्या
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org

 
गॉथिक वास्तुशैलीची जननी
जुन्या वैभवाची साक्ष देणाऱ्या वास्तूंना आणि मूल्यांना जीवापाड जपणारे शहर अशी पॅरिसची ख्याती आहे. पॅरिसच्या बहुतेक राज्यकर्त्यांनी मध्ययुगीन काळापासून आपली राजधानी उत्तमोत्तम, आधुनिक आणि पारंपरिक शैलीने संपन्न, अशा वास्तूंनी सुशोभित करण्याचा प्रयत्न केला आहे. चर्च आणि इतर धार्मिक वास्तूरचनेत सहावा लुई आणि सातवा लुई यांचा सल्लागार असलेल्या सुजेर याने सन ११२२ ते ११५१ या काळात प्रथमच क्रांतिकारी बदल केला. त्याने सेंट डेनिस बॅसिलिकाच्या पुनर्रचनेत ख्रिस्ती धर्माच्या पवित्र ट्रिनिटीच्या आकारात त्याची प्रतीकात्मक वास्तू बांधली. चर्चच्या मागच्या िभतीत खिडक्यांना रंगीत चित्रे असलेल्या काचा लावल्या. त्यामुळे चर्चमधील वातावरणात जादुई फरक पडला. खिडक्यांमधून भरपूर प्रकाश येऊन चर्चचा गाभारा उजळून निघाला. ही ट्रिनिटीच्या प्रतीकात्मक आकाराची आणि स्टेन्ड ग्लास खिडक्यांची पद्धत पुढे पॅरिसमधील सर्व चच्रेसनी स्वीकारली. या वास्तूशैलीचे नाव पुढे ‘गॉथिक वास्तू शैली’ असे होऊन इंग्लंड, जर्मनी आणि इतर युरोपियन देशांमध्ये तिचा प्रसार झाला.
बिशप मॉरिस सुलीने ११६० साली एका महत्त्वाकांक्षी, भव्य चर्च प्रकल्प बांधणीला सुरुवात केली. हे बांधकाम पुढे दोन शतके चालले. त्यातून उभी राहिली आजच्या ‘नोत्रदाम ऑफ पॅरिस’ या कॅथ्रेडलची प्रसिद्ध वास्तू. १२५ मीटर्स लांबीच्या या वास्तूचे दोन मनोरे ६३ मीटर उंच आहेत. १३०० लोक एकावेळी प्रार्थनेसाठी बसू शकणारे हे चर्च जगातील प्रसिद्ध चच्रेसपकी आहे. पुढे फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये अशा प्रकारची नोत्रदाम (अवर लेडी) चच्रेस उभी राहिली.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com