इडली, डोसा, मेदुवडा, उडदाचे पापड, हे सगळं आठवले की उडीद डाळ चटकन नजरेसमोर येते. अशी ही उडीद वनस्पती भारतीय वंशाची असून वेलवर्ग व झुडूप या प्रकारात मोडते. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव विग्ना मुंगो (Vigna mungo) असे आहे.

उडीद ही द्विदल शिम्बीवर्गीय वनस्पती फॅबिअसी कुळातील असून तिच्या सोटमुळावर रायझोबियम जिवाणूयुक्त गाठी असतात. या वनस्पतीची उंची सुमारे ३० ते १०० सेमी एवढी असते. पाने संयुक्त प्रकारची असतात, फुले पिवळसर रंगाची व त्यापासून सुमारे ६ सेमी लांबीच्या निमुळत्या आकाराच्या शेंगा येतात. प्रत्येक शेंगेमध्ये ४-६ दाणे असतात. संपूर्ण वनस्पतीच्या खोडावर, पानांवर केसांसारखे आच्छादन असते.

Viral Video Woman performs Aigiri Nandini on 17th century Jal Tarang instrument Do You Know About Jal Yantra
VIDEO: ‘जलतरंग’ वाद्यावर महिलेने सादर केले स्तोत्र; ‘या’ प्राचीन वाद्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

उडिदामध्ये मोठय़ा प्रमाणावर पोषणतत्त्वे आढळतात. प्रथिने, कबरेदके, तंतुमय कबरेदके, खनिजे जसे पोटॅशिअम, सोडेअम, कॅल्शिअम, िझक, लोह, अमिनोआम्ले, जीवनसत्त्वे ब-१, बी-२, ब-३, बी-५, बी-६, बी-९ इत्यादींनी उडीद समृद्ध आहे.

उडीद डाळ भिजवल्यानंतर ती बुळबुळीत लागते, ती वाटून फुगवल्यावर त्यात तयार होणारे जिवाणू आणि यीस्ट शरीराला आरोग्यदायी ठरतात. असे किण्वन झालेले सर्व पदार्थ मेंदूसाठी खुराक ठरतात. अर्धागवायू, चेहऱ्याचा अर्धागवायू यांसारखे चेतासंस्थेचे आजार बरे करण्यासाठी उडीद गुणकारी आहे. उडिदामध्ये पोटॅशिअमची मात्रा जास्त असल्यामुळे अतिउच्च रक्तदाबात सोडिअमची मात्रा संतुलित करण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांसाठी वापरण्याचा सल्ला दिला जातो. उडीद पचण्यास जड असतात. उडदामुळे शरीरातील ऊतींचा चिकटपणा आणि ओलावा टिकून राहतो. शरीरातील वातदोष नाहीसे करण्याचे काम उडीद करतो म्हणून संधिवात आणि स्नायूंचे दुखणे यासाठी उडीद हे प्रभावी औषध आहे. यकृताचे काम सुरळीत करणे, पित्तदोष, वातदोष कमी करण्यात उडदाचे कार्य मोलाचे आहे. शिरोधारा या उपचारपद्धतीमध्ये उडदाच्या पिठाचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग करतात.

उडदामध्ये असणाऱ्या पोषणमूल्यांमुळे या डाळीचा उपयोग बलवर्धक म्हणून जास्त होतो.

उडीदडाळ भिजवल्यानंतर तयार होणार बुळबुळीत पदार्थ पूर्वीच्या काळी सिमेंट म्हणून वापरायचे. ऐतिहासिक इमारती बांधताना उडीदडाळीचा भिजवून, वाटून सिमेंटसारखा वापर केला जात असे.

डॉ. मनीषा करपे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

मंगोलियाच्या खानांचे मॉस्कोवरील वर्चस्व

मंगोलियातून अनेक टोळ्या रशियावर भुरटे हल्ले करून लूट करून परत जात. त्यांच्यापकी तातार जमातीच्या मंगोल टोळ्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. तातार टोळ्यांच्या प्रमुखाला बडाखान म्हणत. चंगेजखान या बडाखानाने इ.स. १२०६ मध्ये मंगोलियाच्या प्रदेशाचा कब्जा घेऊन स्वत:ला उत्तर चीन आणि मंगोलियाचा सम्राट घोषित केले. त्याने रशियातल्या कीव्ह, नोव्हाग्राड, मॉस्को वगरे लहान राज्यांवर हल्ला करून त्यांच्या एकत्रित फौजांचा युद्धात पराभव केला; परंतु तिथे आपला अंमल न बसवता तो मंगोलियास परत गेला.

चेंगीजखानानंतर १२४१ साली तत्कालीन बडाखानाने दक्षिण रशिया, कीव्ह, नोव्हाग्राड या राज्य प्रदेशांचा ताबा घेतला; परंतु पुढे ऑस्ट्रियन आणि चेक राजे एकत्र आले, त्यांनी तातारांना माघार घेण्यास भाग पाडले. तातार पराभूत झाले तरी त्यांनी सीमेवरच्या अस्तखान सराई येथे आपली सनिकी छावणी उभारली. त्यांचे मांडलिक असलेले सर्व रशियन राजे या मंगोल छावणीत जाऊन त्यांना खंडणी देत असत.

मागे उल्लेख केल्याप्रमाणे मॉस्कोचा राजपुत्र युरी याने १३१९ साली बडाखानाच्या बहिणीशी लग्न करून मॉस्कोला स्वतंत्र राज्याची मान्यता मिळवली. त्याने बडाखानाच्या बहिणीला म्हणजेच आपल्या पत्नीला पूर्व आर्थोडॉक्स चर्चची दीक्षा देऊन ख्रिश्चन केले. पुढे १३२८ साली युरीचा भाऊ इव्हान कलिता हा मॉस्कोच्या गादीवर आला.

या इव्हान प्रथमने बडाखानास न दुखावता सर्व रशियन राजांना एकत्र केले. बडाखानाच्या मांडलिक राज्य प्रदेशातला सर्व महसूल वसूल करून खानाला ती रक्कम देण्याचा करार केला होता. त्यातली काही रक्कम स्वत:च्या मॉस्को राज्यासाठी इव्हान प्रथम ठेवीत असे. वसुलीच्या मिळणाऱ्या या रकमांवर मॉस्कोचे राज्य श्रीमंत होऊन इव्हान प्रथम हा रशियन राजांचे नेतृत्व करू लागला. इव्हान प्रथमच्या राजघराण्याने पुढे २७० वष्रे, रशियाचे प्रमुख राज्य बनलेल्या मॉस्कोवर राज्य केले. १३६६ साली इव्हान प्रथमचा नातू दिमित्री हा मॉस्कोच्या गादीवर बसला.

या काळात तत्कालीन बडाखानाशी मॉस्कोचे संबंध दुरावले होते. दिमित्री याने रशियन राजे, उमराव आणि धर्मोपदेशकांना विश्वासात घेऊन, बडाखान ममाई याचा पराभव केला. या दिमित्रीने इ.स. १३८९ साली त्याचा मृत्यू होईपर्यंत सर्व रशियन राज्यांचे नेतृत्व केले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com