इ.स. १४२० ते १४७० हा कालखंड नौदल सामर्थ्यांमुळे आणि व्यापार-उदीम फोफावल्यामुळे व्हेनिसच्या इतिहासात सुवर्णकाळ मानला गेला; परंतु १४५३ सालापासून व्हेनिसच्या व्यापारी साम्राज्याला उतरती कळा लागली. बायंझंटाइन सत्ता अस्ताला जाऊन ती जागा ओटोमान टर्कनी घेतली. ओटोमान टर्कनी व्हेनिसच्या पूर्वेकडील राज्यप्रदेशातील बराच प्रदेश आपल्या अमलाखाली आणला. दुसरे एक अघटित घडले, वास्को डी गामाने पूर्वेकडच्या देशांशी व्यापार करण्यासाठी नवीन जलमार्ग शोधला आणि त्या व्यापारी मार्गावर व्हेनिस नसल्याने व्हेनिसचा व्यापार थंडावला. या कारणांमुळे क्षीण होत चाललेल्या व्हेनिसचे प्रजासत्ताक १७९७ साली बरखास्त झाले. त्या वर्षी नेपोलियनच्या फ्रेंच फौजांनी व्हेनिसवर आक्रमण केले. आतापर्यंत अनेक आक्रमणांमध्ये व्हेनिसच्या कालव्यांनी शत्रूला थोपविण्यास मदत केली; परंतु नेपोलियनच्या तोफांच्या धडाक्यामुळे व्हेनिसच्या आता दुबळ्या बनलेल्या नौसेनेचा टिकाव लागला नाही. पुढच्या पन्नास वर्षांत व्हेनिस कधी फ्रेंचाच्या वर्चस्वाखाली, तर कधी ऑस्ट्रियाच्या वर्चस्वाखाली राहिले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस सर्व युरोपियन देशांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण होऊन राज्यांचे एकत्रीकरण आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रयत्न सुरू झाले. मॅझिनी, कार्लो अम्रेलिनी यांच्या प्रयत्नाने १८६१ साली इटली हा अखंड देश घोषित झाला. व्हेनिसचे राज्य यापुढे इटली या नवजात देशात अंतर्भूत झाले. प्रशासकीय व्यवस्थेसाठी इटालियन प्रदेशाची ‘कम्यून्स’मध्ये विभागणी झाली. व्हेनिस हे त्यापकी एक कम्यून (प्रांत) बनले. इटलीच्या मुख्य भूभागाशी व्हेनिस एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर रेल्वेने जोडले गेले.

–  सुनीत पोतनीस

hitler swastika banned in switzerland
स्वस्तिकचा हिटलरशी संबंध कसा आला? स्वित्झर्लंडला या चिन्हावर बंदी का आणायची आहे?
Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
mexico suspends diplomatic relations with ecuador after raid on embassy
मेक्सिको, इक्वेडोरचे राजनैतिक संबंध संपुष्टात; दूतावासातील इक्वेडोरच्या कारवाईनंतर मेक्सिकोचा निर्णय

sunitpotnis@rediffmail.com

 

उद्यानकला पोमोलॉजी

उद्यानकला शास्त्रज्ञांच्या मते आपले सभोवतालचे वातावरण  सजीवांसाठी शुद्ध व आरोग्यदायी राखण्यात वनस्पतींचा मोठा वाटा आहे. हे शास्त्र शेतीविषयक अभ्यासाचीच एक वेगळी शाखा आहे. त्याचे पोमॉलॉजी, ओलेरीकल्चर आणि फ्लोरीकल्चर असे तीन विभागात वर्गीकरण केले आहे.

ह्य़ा प्रत्येक शाखेचा आपण थोडक्यात आढावा घेऊ या.

पोमोलॉजी- ह्य़ामध्ये मऊ फळांचा आणि टणक फळांचा समावेश केला आहे. पोम म्हणजे फळ आणि लॉजी म्हणजे अभ्यास करणे. फळझाडे बहुवर्षीय असून त्यांच्या झाडांचे साल जाड व लाकडी असते. आंबा, पेरू, चिकू ह्य़ासारख्या फळांमध्ये गर असल्यामुळे ती मऊ व ओलसर असतात. तर नट्समध्ये समाविष्ट केलेली काजू, आक्रोड, बदाम ही फळे सुकी असतात. बाजारात द्राक्षांपासून प्रक्रिया केलेल्या सुक्या मनुका आणि बेदाणे मिळतात. तसेच अंजिरेही ताजी वाळलेली असतात. पोमोलॉजी ह्य़ा शास्त्रामध्ये निरनिराळ्या फळांची  निर्मिती करून त्यांची चांगली वाढ करणे व व्यावसायिक तत्त्वावर त्याचे मार्केटिंग करणे त्यासाठी त्याची चांगल्या तऱ्हेने व शास्त्रशुद्ध साठवण करून व्यवस्थित पॅकिंग करून बाहेरगावी पाठवणे अपेक्षित आहे. फळे जर उत्क ष्ट दर्जाची, जास्त संख्येने व कमी किमतीत विकली तर त्याला बाजारात चांगलाच उठाव मिळतो. आंबा, केळी, संत्री, मोसंबी, पेरू, पपई, ह्य़ांसारख्या फळांची लागवड सर्वत्र केली जाते. परंतु सफरचंदाच्या झाडाची लागवड करण्यासाठी समशीतोष्ण हवामानाची गरज असते तर अननसाला जास्त पावसाची गरज असते.

आपण जर फळझाडांच्या नर्सरीत गेलो तर तर तिथे आपल्याला कलम केलेली अथवा संकरित केलेली एका मीटर उंचीची झाडे मिळू शकतील. उदा. आंबा, अंजीर, डाळिंब इत्यादी. केळी, खजूर, अननस ह्य़ामध्ये फळझाडांची वाढ खोडामार्फत केली जाते. केळीच्या झाडाला घड येऊन गेल्यावर ती उन्मळून पडते. व तिथे तिला नवीन कोंब फुटतो. हे आपण सर्वानी पाहिले असेलच. द्राक्षाचा वेल छोटे कलमांनी लावता येतो. पपई, िलबू, किलगड, डाळिंब ह्य़ाची लागवड बिया पेरून करता येते. पण कलमाद्वारे केली तर फळे चांगल्या दर्जाची येतात.

प्रा. रंजना देव

मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org