अमेरिकन संयुक्त संस्थानांची राजधानी वॉिशग्टन डी.सी. म्हणजेच ‘वॉिशग्टन डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया’. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धकाळातील अमेरिकन लष्कराचे सेनापती आणि अमेरिकेचे लोकप्रिय अध्यक्ष जॉर्ज वॉिशग्टन यांचे नाव या राजधानीच्या शहराला दिलेले आहे. केवळ १७९ चौ.कि.मी. क्षेत्र असलेल्या वॉिशग्टन डी.सी.च्या उत्तरेस, पूर्वेस आणि दक्षिणेस मेरीलँड या संस्थानांची हद्द भिडलेली, तर पश्चिमेस पोटोमॅक नदी आणि नदीपलीकडे व्हर्जििनया संस्थान अशा चतु:सीमा आहेत. सध्याचे ‘डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया’ हे मेरीलँड आणि व्हर्जििनया या दोन अमेरिकन संस्थानांमधील काही प्रदेशांवर वसले आहे.
१६०८ साली कॅप्टन जॉन स्मिथने या प्रदेशात केलेल्या उत्खननावरून येथे ४००० वर्षांपूर्वीपासून मानवी अस्तित्व असल्याचे पुरावे सापडलेत. चौदाव्या शतकात व्हर्जििनयातील पोटोमॅक नदीकाठी पॅटवोमेक आणि डोएग या (रेड इंडियन) जमातींची वस्ती होती. अलग्वांकियन भाषा बोलणारे हे लोक प्रगतिशील होते. १६२२ साली हेन्री फ्लीट हा फरचा इंग्लिश व्यापारी येथे आला असता तिथल्या रेड इंडियन लोकांनी त्याला पकडून अटकेत ठेवले होते. सध्याच्या डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियातील पहिले जमीनदार होते जॉर्ज थाम्सन आणि थॉमस गेरार्ड. १६६२ साली त्यांनी पोटोमॅक नदीतीराजवळची अ‍ॅॅनाकोस्टा भागातली जमीन घेतली. त्यामध्ये सध्याचे कायदेमंडळ असलेली ‘कॅपिटॉल हिल’ची जागा होती. युरोपियनांच्या वसाहती जसजशा वाढू लागल्या तसतसे मूळच्या रेड इंडियनांशी त्यांचे खटके उडू लागले. १६९७ मध्ये मेरीलँड वसाहतीच्या अधिकाऱ्यांनी तिथे किल्ला बांधला. १७५१ मध्ये मेरीलँड वसाहतीने जॉर्ज गॉर्डनकडून २८० पौंडांना काही जमीन विकत घेऊन त्या जागेवर जॉर्ज टाऊन हे गाव वसवले. याच लोकांची वस्ती व्हर्जििनयाकडेही वाढली. इथे येणाऱ्या तंबाखूच्या मुबलक पिकामुळे जॉर्जटाऊन बंदरातून पोटोमॅक नदीमाग्रे तंबाखूचा व्यापार फोफावला. जॉर्ज टाऊन गजबजून गेले.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
Gukesh vs Ian Nepo ends in a draw
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश-नेपोम्नियाशी लढत बरोबरीत, संयुक्त आघाडी कायम; विदितने प्रज्ञानंदला रोखले; कारुआना, नाकामुरा विजयी
what is nato and its purpose
नाटोची ७५ वर्ष; ही संघटना का स्थापन करण्यात आली? तिला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतोय?
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?

Untitled-3

दुर्वामधील विविधता
आजकाल जीववैविध्यावर बरंच काही लिहिले जाते, बोलले जाते. जीववैविध्य टिकवणे, त्यासाठी संरक्षणाचे उपाय योजणे, यावर चर्चा चालूच असते. वनस्पती-प्राणी यांचे वेगवेगळे प्रकार जपण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. पण एकाच प्रकारच्या वनस्पतींचे अनेक आकार असल्यास त्यांचे संरक्षण कसे करणार, हा एक प्रश्न पडतो. रोजच्या दुर्वाचेच उदाहरण घेऊ. गणपतीला वाहायच्या दुर्वा त्रिदल दुर्वा, पंचदल दुर्वा, पाती लांबलचक असलेल्या दुर्वा, क्रिकेट ‘पिच’वरच्या आखूड जाडसर, लंबत्रिकोणासारख्या पानाच्या दुर्वा, मदानावर हिरवळीचा गालिचा करणाऱ्या दुर्वा आणखी वेगळ्या आकाराच्या, बंगल्यासमोरच्या सुंदर बागेतली हिरवळही दुर्वाचीच, तर फुटपाथवरील दगड सांधणाऱ्या सिमेंटच्या खबदाडात वाढणाऱ्या दुर्वा आणखीच वेगळ्या. आकाराने आणि रंगानेही.
या सगळ्या दुर्वाचे वैज्ञानिक नाव एकच ‘सायनोडॉन ड्क्टालॉन’. मुंबईतील एका सर्वेक्षणात दुर्वाची नऊ रूपे सापडली. २५ ते ३० सेंटीमीटर उभे वाढणारे नाजूक पोपटी खोड त्यावर १ सेंटीमीटर अंतरावर वाढणारी लांब, अरुंद आणि टोकाकडे वाकणारी हिरवी पानं अशा आकारापासून ते कडक आडव्या पसरणाऱ्या जाड, आखूड, तांबडसर खोडावर अर्धा पाव सेंटीमीटर अंतरावर असलेली त्रिकोणी पानं असलेला प्रकार, हिरव्या पिवळ्या खोडापासून ते राखाडी तांबडसर खोड असणारे प्रकार.
वनस्पतींच्या रंगरूपातही वैविध्य दिसते. वैविध्यनिर्मितीची कारणेही अनेक. दुर्वामध्ये हे वैविध्य आले ते जमिनीच्या खता-पोताप्रमाणे. जमिनीवरच्या आघातांना झेलत शरीराचे आकार बदलून टिकून राहण्याच्या कुवतीमुळे. दुर्वामध्ये ही कुवत मोठय़ा प्रमाणावर आहे म्हणून तर आपल्याला दुर्वा अनेक प्रकारच्या परिस्थितीत वाढताना दिसतात. दुर्वाच्या वाढीच्या संदर्भात एक सोपा प्रयोग केला.
एकाच ठिकाणच्या दुर्वा घेऊन बागेत दोन ठिकाणी पेरल्या. एक आठवडय़ानंतर एका लाकडी ठोकळ्याने दररोज दहा ते पंधरा मिनिटे जमीन ठोकली. दोन आठवडय़ांनंतर दुर्वाचे निरीक्षण केल्यावर जाणवले की, ठोकलेल्या जमिनीवरच्या दुर्वा पसरट वाढल्या. त्या आखूड पानाच्या होत्या. तर न ठोकलेल्या जमिनीवरच्या दुर्वा उंच, लांबलचक, नाजूक दिसणाऱ्या होत्या. या प्रयोगामुळे फुटबॉलच्या मदानावर दोन प्रकारचे गवत का दिसते, याचा उलगडा होतो. कठीण परिस्थितीत जगण्याची अशी दुर्दम्य क्षमता बऱ्याच वनस्पतींत दिसून येते.

– प्रा शरद चाफेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org