कापडाची वीण कोणत्या प्रकारची आहे. त्यानुसार ताण्याचे धागे वयामधून भरले जातात. याला ड्राफ्टिंग असे म्हणतात. ताण्याचे धागे डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे भरले जातात. या ड्राफ्टिंगमध्येही वेगवेगळे प्रकार आहेत. सरळ भरण (स्ट्रेट ड्राफ्ट) यामध्ये ताण्याची भरण पहिल्या शाफ्टपासून शेवटच्या शाफ्टपर्यंत सरळ क्रमाने होते. सॅटिन ड्राफ्ट हा ड्राफ्ट सॅटिन विणीसाठी वापरतात. या ड्राफ्टमुळे ताण्याच्या धाग्यातील घर्षण कमीत कमी होते. त्यामुळे जास्त गच्च कापडासाठी या ड्राफ्टचा वापर करतात. ज्या वेळी भरण विविध दिशेने ठरावीक अंतरावर परत येते, त्याला पॉइंटेड ड्राफ्ट म्हणतात. याचा उपयोग केल्यास आपल्याला डायमंड किंवा वेव्हड् असा दृश्य परिणाम दिसतो. ब्रोकन ड्राफ्ट किंवा हेअिरग बोन ड्राफ्टमध्ये ताण्याचा समूह एका दिशेने भरून दुसरा समूह पहिल्याच्या विरुद्ध दिशेने पण मध्यंतरी ड्राफ्ट सोडून भरतात. यामुळे डिझाइनमध्ये ब्रेक होतो. स्कीप ड्राफ्टमध्ये प्रथम विषम शाफ्टमध्ये ताण्याचे धागे भरतात. आणि त्यानंतर सम शाफ्टमध्ये ताण्याचे धागे भरले जातात.
ताण्याचे धागे वयामधून जसे भरतात, त्या पद्धतीप्रमाणेच ते फणीमधून (रीडमधून) ओवून घेतात, त्याला डेंटिंग म्हणतात. वयामधून ओवलेले धागे नंतर फणीमधून ओवले जातात. या डेंटिंगच्या वेळी धाग्याचा क्रमही महत्त्वाचा असतो. डेंटिंग जर व्यवस्थित केले नाही तर कापड एकसारखे वाटत नाही, त्याचा पोत बिघडतो. कापडाच्या रुंदीनुसार ताण्याचा फणीतला पन्हा (रीड स्पेस) ठरतो. हा फणीतला पन्हा असा ठेवावा लागतो जेणेकरून कापड विणताना काही अडचण येणार नाही. ताण्याची कापडातील घनता किती त्यानुसार फणीची निवड केली जाते.
लििफ्टग प्लान हा कापडासाठी कोणती वीण वापरायची आहे त्यानुसार ठरतो. प्रत्येक आडव्या धाग्यासाठी जी शेड करावयाची असेल त्यानुसार हा लििफ्टग प्लान असतो. म्हणजेच प्रत्येक बाण्यासाठी कोणते शाफ्ट वर घ्यायचे आणि कोणते शाफ्ट खाली ठेवायचे याची योजना असते. ती अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आपल्याला हव्या त्या डिझाइनचे कापड तयार होण्यासाठी ड्रािफ्टग, डेंटिंग आणि लििफ्टग प्लान योग्य आणि अचूक असायला हवा, तरच योग्य तो परिणाम साधता येतो. अन्यथा कापडाचा पोत आणि टिकाऊपणा दोन्हीबाबत खात्री देता येत नाही. प्रत्येक डिझाइनप्रमाणे या तिन्ही गोष्टीत बदल होतो. त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे.
सतीश भुटडा (कोल्हापूर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – पालीताणा राज्यस्थापना
गुजरातच्या काठियावाड विभागातील भावनगर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ५० कि.मी.वर असलेल्या, एकाच पर्वतावर नऊशेहून अधिक जैनमंदीरे असलेल्या पालीताणा येथे ब्रिटिशराज काळात एक महत्त्वाचे संस्थान होते. गोहिल राजपूत घराण्याचा वंशज सेजकजी याने इ.स.११९४ मध्ये पालिताणा येथे प्रथम आपले छोटे राज्य स्थापन केले. सोळाव्या शतकाच्या अखेरीस या राज्यावर मोगलांचा अंमल झाला. १६५६ साली बादशाह शाहजहानचा मुलगा आणि गुजरातचा सुभेदार मुरादबक्ष याने त्या भागातला प्रसिद्ध व्यापारी आणि सावकार शांतीदास जव्हेरी याला पालीताणाचा परगाणा जहागीर दिला. पुढे काही काळ पालीताणा हे जुनागढ राज्याचे आणि पुढे बडोद्याच्या गायकवाडांचे मांडलिक बनून राहिले व त्यांना खंडणी देत असत.
इ.स. १७३० पर्यंत पालीताणा जैनमंदिरांची व्यवस्था शांतीदास जव्हेरी यांच्या वारस राज्यकर्त्यांनी पाहिली. त्यानंतर ही व्यवस्था त्यांनी एका ट्रस्टकडे सोपविली. ठाकोर साहिब उंदाजी याने एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनी सरकारशी संरक्षणात्मक करार करून त्यांची तनाती फौज राखणे सुरू केले. पृथ्वीराजजी, उंदाजी, नानधनजी आणि बहादूरसिंह या पालिताणाच्या राजांपकी बहादूरसिंहजींची कारकीर्द इ.स. १९०५ ते १९४७ अशी झाली. या बेचाळीस वर्षांत त्याने राज्याचा विस्तार करून प्रजा कल्याणकारी, चोख प्रशासन दिल्यामुळे ब्रिटिश राजवटीने त्याला ‘महाराजा’ हा किताब देऊन पालीताणा संस्थानाला नऊ तोफ सलामींचा मान दिला. १९२१ साली राज्याची लोकसंख्या ५८,००० होती आणि क्षेत्रफळ ७८० चौ.कि.मी. होते. या काळात दोन पसे, एक आणा आणि चार आण्यांच्या रोखीच्या पावत्यांचा (कॅश कूपन्स) वापर चलन म्हणून केला जाई. स्वतंत्र भारतात विलीन झाल्यावर पालीताणा राज्याचा परिसर, गुजरात प्रांतात समाविष्ट केला गेला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com