विद्युतप्रवाह अ‍ॅम्पिअर या एककात मोजतात म्हणून विद्युतप्रवाहमापकाला अ‍ॅमीटर असे म्हणतात. अ‍ॅमीटर विद्युतप्रवाहदर्शक (Galvanometer) असून त्याचा उपयोग परिपथातील विद्युतप्रवाह मोजण्यासाठी करतात.

अ‍ॅमीटरमध्ये एक स्थिरचुंबक असतो. त्याच्या विरुद्ध ध्रुवांमध्ये एक विद्युतरोधक वेष्टित तारेचे वेटोळे नरम लोखंडाच्या भोवती गुंडाळून टांगलेले असते. वेटोळ्याची टोके केसासारख्या बारीक स्प्रिंगांना जोडलेली असतात. दर्शकसूचीचे एक टोक वेटोळ्याच्या मध्यभागी खिळवलेले असते तर दुसरे टोक मोजपट्टीवर फिरू शकेल, अशी रचना असते. वेटोळ्याच्या तारेतून विशिष्ट दिशेने विद्युतप्रवाह वाहू लागला की वेटोळ्याभोवती चुंबकक्षेत्र निर्माण होते आणि वेटोळे विचलन पावते. किती शक्तीचा विद्युतप्रवाह वाहत आहे, ते दर्शकाचे वरचे टोक मोजपट्टीवर दर्शविते. हा मीटर सूक्ष्म प्रवाह (साधारणपणे ५० मायक्रो अ‍ॅम्पिअर) मोजू शकतो. त्याहून जास्त प्रवाह मोजण्यासाठी मीटरमध्ये अगदी थोडा विरोध असलेला तारेचा तुकडा समांतर जोडणीने जोडलेला असतो. त्याला पाश्र्वपथ म्हणजे शाखावाहक (shunt) म्हणतात. यामुळे प्रवाहाचा बराचसा भाग शाखावाहकातून जातो व थोडासा भाग वेटोळ्यातून जातो. विचलन प्रमाणाबाहेर जात नाही. वेटोळ्यातील विचलन मूळ प्रवाहाच्या प्रमाणात राहील अशी काळजी घेऊन मोजपट्टी प्रमाणित केली जाते. अ‍ॅमीटरच्या साहाय्याने जास्तीत जास्त किती विद्युतप्रवाह मोजायचा आहे त्याप्रमाणे  आकडेमोड करून शाखावाहकाची किंमत ठरवितात. मीटरच्या व्याप्तीप्रमाणे (Range)  शाखावाहकाची किंमत वेगवेगळी असते.

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
Pune records highest temperature in April in eleven years
पुण्यात अकरा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद; तापमानाचा आलेख कसा चढा राहिला?
More than average rainfall this year Know the weather forecast of monsoon rains
Monsoon Season Update : यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस… जाणून घ्या मोसमी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
March 2024, March 2024 Records Hottest Temperatures, March 2024 Records Hottest in 175 Years, hottes march 2024 globally, Global Average Temperatures Up by 1.35°C, heat, summer march, summer season
यंदाचा मार्च आजवरचा सर्वांत उष्ण; पश्चिमी झंझावाताचा भारताला दिलासा

विद्युत परिपथातील कोणत्याही दोन बिंदूंमधील विद्युत विभवांतर किंवा विद्युतदाब मोजण्याच्या साधनाला व्होल्टमीटर म्हणतात. त्या दोन बिंदूंमधील भागाशी व्होल्टमीटर समांतर जोडणीने जोडतात. याची रचना अ‍ॅमीटरसारखीच असते. पण यात शाखावाहकाऐवजी एक रोधिका एकसर जोडणीत बसवलेली असते व तिच्या रोधाची किंमतही जास्त असते. यासाठी जास्त लांबीची बारीक तार वापरतात. वाढीव रोधामुळे अगदी कमी शक्तीचा प्रवाह व्होल्टमीटरमधून जातो. त्यामुळे परिपथातील ज्या भागाचे विभवांतर मोजायचे असेल त्यातील प्रवाहात फारसा फरक पडत नाही. दर्शकसूचीचे विचलन विभवांतराच्या प्रमाणात असते. याला अ‍ॅनालॉग व्होल्टमीटर म्हणतात. अ‍ॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर याचा वापर करून डिजिटल व्होल्टमीटर बनवतात. यात वाचन दर्शकसूचीने घेण्याऐवजी प्रत्यक्ष संख्येतून दर्शविले जाते म्हणून सोपे होते.

मल्टिमीटरमध्ये विद्युतप्रवाह, विभवांतर व रोध एकाच उपकरणाने मोजता येतात. तसेच त्यात वेगवेगळ्या व्याप्ती (रेंजेस) असतात.

डॉ. सुनंदा जनार्दन करंदीकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

निर्मल वर्मा  (१९९९)

१९९९ चा ज्ञानपीठ पुरस्कार, हिन्दीतील यशस्वी साहित्यकार निर्मल वर्मा यांना भारतीय साहित्यातील १९७९ ते १९९८ या काळातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान करण्यात आला. १९५० च्या दशकात हिन्दी साहित्यात नवकथेच्या आंदोलनाला ज्यांनी सुरुवात केली, त्या लेखकांपैकी ते एक आहेत. एक लेखक, तसेच विद्वान आणि विचारवंत म्हणूनही ते परिचित आहेत. हा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना पंजाबीचे प्रसिद्ध कादंबरीकार गुरुदयाल सिंह यांचेसह विभागून देण्यात आला.

निर्मल वर्मा यांचा जन्म ३ एप्रिल १९२९ रोजी हिमाचल प्रदेश सिमला येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.  त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून इतिहास विषयात एम.ए.ची पदवी संपादन केली. लेखन, वाचनाची आवड असलेले  वर्मा हे उत्तम वक्ते होते. त्यांची भाषणे ऐकण्यासाठी दूरहून लोक येत असत. काही वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले, पण पुढे मात्र मुख्यत: लेखनावरच आपला उदरनिर्वाह करणारे निर्मल वर्मा हिन्दीमध्ये स्वाभिमान, लेखकाचे स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांचा मानदंड बनलेले आहेत.

१९५९ ते १९७२ पर्यंत त्यांनी युरोपमध्ये प्रवास केला आणि तेथील विभिन्न संस्कृतीचा जवळून परिचय करून घेतला. हिन्दी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याने, तिथे अनेक चेक कथा-कादंबऱ्यांचे त्यांनी हिन्दी अनुवाद केले. त्यानंतर लंडनमधील वास्तव्यात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि ‘हिन्दुस्तान टाइम्स’साठी त्यांनी राजकीय आणि सांस्कृतिक वार्ताकन केले. १९७२ मध्ये ते भारतात परत आले . . स्वत:च्या खास आणि आगळ्या वेगळ्या लेखन शैलीत गंभीर आणि भावपूर्ण कथालेखन करणारे, निर्मल वर्मा हे आधुनिक हिन्दी कथा लेखकांमध्ये एक महत्त्वाचे कथाकार आहेत. निर्मल वर्माच्या कथांमध्ये वास्तववादी, अनुभवगम्य, समर्थ वातावरण निर्मितीचा अनुभव वाचकांना येतो. मानवी नातेसंबंधातील औदासीन्य आणि त्रयस्थपणाला हळुवारपणे ते असे चित्रित करतात, की ते लेखकाचे अनुभवकथन न राहता वाचकांचेच होऊन जाते. एक विलक्षण आरपार भेदून जाणाऱ्या पारदर्शी स्थितीचे चित्रण करणाऱ्या त्यांच्या कथा वाचकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण करतात.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com