बाजरी हे आशिया आणि आफ्रिका खंडातील गरिबांचे महत्त्वाचे पूरक अन्न. भाकरी, रोटी, रोटली अशा नावांनी चवीने खाल्ली जाणारी बाजरीची भाकरी संक्रांतीला तीळ लावून अधिक चविष्ट बनविली जाते. आफ्रिकेत आणि आपल्या आंध्रप्रदेशात बाजरीचे दाणे उखळात कांडून, तिची साल काढून मग दळतात. त्या पिठाचे आंबवून धिरडे करतात. दक्षिणेत बाजरी शिजवून भात तयार करतात. खीर आणि खिचडी हे बाजरीचे आणखी दोन प्रकार.
मूळ उष्णकटिबंधीय आफ्रिकेतील बाजरी अरब लोकांनी भारतात आणली. तिची भारतातील एक नोंद ख्रिस्तपूर्व २००० वर्षांची आहे. भारतातून तिचा प्रवास चीनमध्ये आणि दक्षिण आशियाच्या पूर्व भागात झाला. आता जगातील २,६०,००० चौरस किलोमीटर कृषीक्षेत्र बाजरीने व्यापले आहे.
बाजरा, कुम्बू (तमीळ), रवाज्जे (कन्नड), सज्जालू (तेलगू) अशा अनेक नावांनी बाजरी परिचित आहे. अमेरिकेत तिला ‘कॅटटेल’ (कणसाचा मांजरीच्या शेपटीसारखा आकार असल्याने) किंवा ‘र्बगडी मिलेट’ या नावांनी ओळखतात. अमेरिका, कॅनडा, ब्राझील, ऑस्ट्रेलिया व युरोपातसुद्धा बाजरीची लागवड होते. गुरांचा चारा म्हणून तिचे जास्त महत्त्व आहे. बाजरीचे दाणे पाळीव पक्षी, कोंबडय़ा, डुकरे यांना खायला घालतात. बाजरीतील प्रथिनांमुळे अन्नाचा पोषक गुणधर्म वाढतो.
उसाप्रमाणे गोडवा असलेल्या बाजरीच्या वाणाची निर्मिती तमीळनाडूतील कोइम्बतूरच्या शास्त्रज्ञांनी केली आहे.  
बाजरीचे चार प्रकार आढळतात : टायफॉयडियस (भारत, आफ्रिका), नायगाटूरम (आफ्रिका), ग्लोबोसम (आफ्रिका), लिओनिस (आफ्रिकेची किनारपट्टी).
आधुनिक बाजरीचे शास्त्रीय नाव आहे ‘पेनिसेटम अमेरिकॅनम’. यापूर्वीची नावे होती ‘पेनिसेटम ग्लॉकम’, ‘पेनिसेटम टायफॉयडीयम’ आणि ‘पेनिसेटम टायफॉयडियस’.
प्राचीन यजुर्वेदीय संहितांनुसार, बाजरी गटाला ‘श्यामका’ नावाने ओळखले जाई. कदाचित तिच्या काळ्या रंगामुळे असेल. स्वित्र्झलडमध्ये इटालियन मिलेट (सेटारिया इटालिका) हा प्रकार प्राचीन काळापासून आढळतो. ख्रिस्तपूर्व २७०० साली चीनमध्ये तिची प्रथम लागवड झाली असावी. कच्छमधील सुकोटाड येथील उत्खननातून ती ख्रिस्तपूर्व १३००मध्ये भारतात होती, असे अनुमान निघते. आता मक्याच्या आगमनाने बाजरीची खूप पीछेहाट झाल्याचे दिसते. मका वस्त्रोद्योगात, औषधनिर्मितीत आणि इंधननिर्मितीत मोठय़ा प्रमाणात वापरला जातो. गरिबांच्या धान्यावर यामुळे आपत्ती ओढवली आहे.
    – डॉ. क. कृ. क्षीरसागर (पुणे)
    मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  ऋऋ्रूी@ें५्रस्र्ंे४ेुं्र.१ॠ

आजचे महाराष्ट्रसारस्वत        १३ फेब्रुवारी
१८९४ > छत्रपती संभाजी महाराज हे एक तेजस्वी, पराक्रमी पुरुष होते, असा साधार इतिहास मराठीत पहिल्यांदा मांडणारे वासुदेव सीताराम बेंद्रे यांचा जन्म. सरकारी नोकरीत राहून त्यांनी मराठा दप्तरात प्रवेश मिळवला आणि मूळ कागदपत्रांच्याच आधारे संशोधन केले. पुढे तंजावूर दप्तराची हाताळणीही त्यांनी केली. इंग्रजी व मराठीत सुमारे १८ पुस्तके त्यांनी सिद्ध केली त्यापैकी तीन, संत तुकाराम यांचा पुनशरेध घेणारी आहेत.
१९४१ > संस्कृतचे व्यासंगी, लेखक-संपादक वामन गोपाळ ऊध्र्वरेषे यांचे निधन. ‘मराठी शुद्धलेखन’ या पुस्तिकेसह त्यांनी वामनपंडितांच्या ‘वेणुसुधे’चे सान्वय, सार्थ संपादन प्रकाशित केले.
१९५६ > वैदिक वाङ्मयाचे मराठी भाषांतरकार धुंडिराज गणेश बापट यांचे निधन. वेदविद्या शिकण्या-शिकवण्यासाठी ‘स्वाध्याय मंदिर’ या संस्थेची त्यांनी स्थापना केली. ‘वैदिक राष्ट्रधर्म’, ‘आर्याचे संस्कार’, आदी पुस्तके लिहिली. ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकरांचे ते सहकारी होते. ज्ञानकोशाच्या वेदविद्या विभागातील नोंदींच्या लिखाणात बापट यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
१९६८ > ‘धन्य ते गायनी कळा’ या नाटकाचे लेखक, संगीत समीक्षक आणि नाटय़गीतकार गोपाळकृष्ण भोबे यांचे निधन.
संजय वझरेकर

Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
eid al fitr 2024 chand raat ramadan eid 2024 know the date and timings of eid al fitr moon sighting
१० की ११ एप्रिल, भारतात कधी दिसणार ‘ईद’चा चंद्र? भारतासह परदेशात कशाप्रकारे ठरवली जाते ‘ईद’ साजरी करण्याची तारीख?
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी

वॉर अँड पीस                                         कंबर व गुडघेदुखी: भाग झ्र् १
आयुर्वेद व योगशास्त्र ही भारतीय संस्कृतीची जुळी भावंडे. या दोन्ही शास्त्रांमुळे भारताची मान जगात ताठ राहिली आहे. ही दोनही शास्त्रे एकमेकांना पूरक आहेत. अनेक विकारांचा यशस्वी सामना या दोन शास्त्रांच्या समन्वयाने होऊ शकतो. कंबर, पाठ, मान यांच्या सांध्यांच्या स्नायूंच्या व हाडांच्या विकारात औषधांबरोबरच योगासनांची फार मौलिक मदत होते हे आम्ही नेहमीच अनुभवतो.
पाठीच्या व कमरेच्या मणक्यांच्या तंदुरुस्तीकरिता वज्रासन म्हणजे मोठी वरदशक्ती आहे. पाठ व कंबर कितीही तीव्र दुखत असली, तरी चवडय़ावर ताठ वज्रासनात बसल्याबरोबर तत्क्षणी पाठ व कंबरदुखी थांबते. हाच अनुभव फळीवर शवासनात झोपल्यावर मिळतो.
कमरेच्या दुखण्यांत ‘कमान’ या व्यायामाचा फारच उपयोग होतो. रोज आपण पुढे वाकून नेहमी काम करतो. त्याकरिता काही काळ कमान टाकणे, या सोप्या व्यायामाचा उपयोग करावा. या व्यायामाने कमरेत जोर येतो, पाठीच्या स्नायूंना बळ मिळते. या उपचारांमुळे आमच्या इतर औषधी योजनेला काम करायला थोडा अवसर मिळतो.
वयाच्या ठरावीक मर्यादेनंतर कंबर दुखणे, गुडघे दुखणे, खांदे दुखणे अशा तक्रारी सामान्यपणे बऱ्याच स्त्री-पुरुषांना त्रास देतात. जसजशी माणसाची कृत्रिम राहणी वाढत जात आहे, तसतसे या विकाराचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर आढळत आहेत. स्त्रियांमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. त्यातल्या त्यात स्थूल, बुटक्या स्त्रियांना लवकर विकार जडतो. उठण्या-बसण्याची सवय मोडणे, फाजील पिष्टमय आहार; चुकीची औषधे बारीकसारीक तक्रारींकरिता घेणे असे अनेक टाळता येण्यासारखे सोपे मुद्दे लक्षात घेतले जात नाहीत. तसेच लहान-मोठय़ा हाडांमध्ये असलेल्या अतिकोमल चकत्यांवर किंवा वंगणावर फाजील ताण दिला जातो. त्यामुळे उद्भवणाऱ्या तक्रारींवर लगेच योग्य तो उपचार केला जात नाही व त्यामुळे रोग अधिकच बळावतो.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      उद्गार
साध्या बोलण्यातही बरेचसे काही विचारधन मिळते. वॉर्डमध्ये एकापाठोपाठ एक रुग्णांची माहिती देण्याचा, ते शिक्षकाने ऐकण्याचा आणि त्यावर शिक्षकाने सूचना करण्याचा एक दिवस असतो त्याला राउंड (फ४ल्ल)ि म्हणतात. एकदा अशा राउंडच्या दिवशी मी नेहमीप्रमाणे ‘खाट तेवीस शस्त्रक्रियेचा चौथा दिवस तब्येत ठीक’ असे उद्गार काढले तेव्हा माझे शिक्षक डॉ. डायस थबकले आणि म्हणाले या रुग्णाला नाव आहे आणि ते खाट तेवीस हे नाही. हा इथे सहा दिवस होता याचे नाव काय आहे ते अर्थातच मला माहीत नव्हते. त्याला झालेला हर्निया आणि त्यावर झालेली शस्त्रक्रिया एवढाच त्याचा आणि माझा संबंध. नंतर त्यांनी मला विचारले, याला शौचाला कधी झाले? तेही मला माहीत नव्हते. तेव्हा ते म्हणाले, तुला जर खाट तेवीस असे नाव ठेवले तर चालेल का? आणि एक-दोन दिवस शौचाला झाले नाही तर माणसांची बेचैनी किती वाढते याची तुला कल्पना आहे का? त्या रुग्णाबरोबर त्यांनी हात मिळविला आणि त्याला म्हणाले. तुझे नाव काय?
तो रुग्ण हरखला. त्याचे नाव कोणीतरी पहिल्यांदाच विचारीत होते. याउलट एक अनेक ओळखी असलेला रुग्ण स्वत:च्या आजारपणाचा बाऊ करीत सतत पांघरूण घेऊन झोपलेला. आम्ही कंटाळलो होतो. त्याच्या सारख्या तक्रारी असत. आमच्या डायस सरांनी हे ओळखले होते. ते त्याच्याजवळ गेले. त्याची विचारपूस केली. हा उगीच आडवा पडलेला. त्याला ते म्हणाले, ‘शक्यतोवर माणसाने पलंगावर झोपून राहू नये, कारण बहुतेक पलंगातच मरतात.’ या एका विधानाने तो ताडकन उठला आणि एकदम इकडे तिकडे फेऱ्या मारू लागला आणि एक-दोन दिवसांत म्हणाला मी घरी जातो आणि गेला.
एकदा एक रुग्ण माझे ऐकत नव्हता. त्याला फक्त विश्रांतीची गरज होती. पाय थोडय़ा उंचीवर ठेवून त्या पायातली सूज उतरविण्याची योजना होती. त्यासाठी एक लोखंडी पायरी मी मुद्दाम तयार करून घेतली होती. त्याला भरगच्च वॉर्डात अनेक रुग्ण जमिनीवर असताना मी खाट दिली होती, पण हा पठ्ठय़ा दिवसभर फेऱ्या मारीत वॉर्डात फिरत असे आणि बाहेर जाऊन विडय़ा पित असे. माझ्या डोक्यात सणक चढली. मी त्याच्यावर ओरडू लागलो की केवढा मदतगार आणि तो केवढा कृतघ्न आहे, असे मोठे भाषण सुरू केले तेव्हा मला डॉ. डायस म्हणाले, ‘‘प्रत्येकात देव लपलेला असतो, तो हे सगळे ऐकत असणार. देवाला हळू बोललेलेही ऐकू येईल.’’ हा प्रश्न देवाचा नव्हता तर सभ्यपणाचा होता.
ज्ञानेश्वरांची ओवी म्हणते जे जे भेटे भूत त्यासि मानिजे भगवंत परंतु जो जो भेटे रुग्ण त्यासि मानिजे भगवंत हेही खरेच.
रविन मायदेव थत्ते  १’३ँं३३ी@ॠें्र’.ूे