मिझूचा एम थ्री नोट नुकताच भारतात लाँच झाला. फोनच्या प्रत्येक फंक्शनमध्ये बरीच क्षमता असलेल्या फोनमध्ये आणखीही काही वैशिष्टय़पूर्ण फीचर्स आहेत. या फोनची किंमत ९९९९/- इतकी आहे.

वैशिष्टय़े :

अ‍ॅमबॅक होम बटन डिझाइन :

या फीचरमध्ये फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन आणि फिंगर पेमेंट असं एकत्रीकरण असल्यामुळे तुमचं आयुष्य आधीपेक्षा अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल. हे नवे फिंगरप्रिंट सेन्सर दोन सेकंदांत आयडेंटिफिकेशन करू शकते. मिझू अ‍ॅमबॅक हे अ‍ॅण्ड्रॉइड सिस्टममधली उत्तम कल्पकता आहे. एका बटणामुळे तुम्ही होम की ऑपरेशन, बॅक की ऑपरेशन, फिंगरप्रिंट ऑयडेंटिफिकेशन ऑपरेशन हाताळू शकता. एकदा तुम्हाला या नव्या फीचरची सवय लागली की तुम्हाला ती सोडणं कठीण आहे.

ऑक्टा कोअर प्रोसेसर :

मिझू एम थ्री नोटमध्ये हेलिओ पी १० प्रोसेसर आहे. इतर प्रोसेसरपेक्षा या प्रोसेसरमध्ये असलेला एनर्जी एफिशिएन्सी रेशिओ (ईईआर) उत्तम दर्जाचा आहे. १.८ गीगाहर्ट्ज सीपीयुमुळे मोबाईलच्या वापरात कोणतीच अडचण येत नाही.

मेमरी :

या फोनमध्ये थ्री जीबी रॅम, ३२ जीबी रॉम इतकी क्षमता आहे. १२८ जीबी एक्सपांडेबल मेमरी आहे.

बॅटरी + पॉवर ऑप्टिमिझेशन :

मिझू एम थ्री नोट आधीच्या जनरेशनपेक्षा पाच मिमी अधिक पातळ आहे. यामध्ये ४१०० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. ही बॅटरी आधीच्या बॅटरीपेक्षा ३२ टक्के इतकी मोठी आहे. फ्ल्येम ऑपरेटिंग सिस्टम ५.१ आणि हेलिओ पी १० प्रोसेसर या दोन गोष्टींमुळे एम थ्री नोटची बॅटरी बराच काळ टिकते.

बॉडी :

दर इंचामागे ४०३ पिक्सेल्ससह १०८० पी फुल एचडी असा मिझू एम थ्री नोटचा डिस्प्ले आहे. २.५ डी फ्रंट पॅनल आणि मेटल युनिबॉडी डिझाइनमुळे मिझू एम नोट दिसायला आकर्षक वाटतो.

कॅमेरा:

१३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा लार्ज ऋ/२.२ अ‍ॅपर्चरसह काम करतो. तर त्यात पसंतीनुसार फाइव्ह पी फिल्म लेन्सची सुविधा आहे. पीडीएएफ ऑटो फोकस टेक्नॉलॉजी आणि प्रीमिअम डय़ुअल एलईडी फ्लॅश या सोयींमुळे अधिक बारकाव्यांनिशी तुम्ही एखादा फोटो काढू शकता. पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा लार्ज ऋ/२.० अ‍ॅपर्चरसह काम करतो.

अल्काटेलचा पॉप स्टार स्मार्टफोन

अल्काटेलने त्यांच्या स्मार्टफोनच्या नवीन रेंज म्हणजे पॉप स्टार स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली. ५ इंच डिस्प्ले असलेल्या फोनचे प्रमुख आकर्षण अल्ट्रा स्लिक डिझाइन आणि बहुपर्यायी रंग हे आहे. १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटर्नल इतरी मेमरी असून याची एक्स्पाण्डेबल मेमरी ३२ जीबीपर्यंत आहे. संपूर्ण लॅमिनेटेड एचडी आईपीएस डिस्प्लेचा लाइट रिफ्लेक्शन ७५ टक्के कमी आहे. या वैशिष्टय़ामुळे लख्ख सूर्यप्रकाशातही तुम्ही या फोनच्या स्क्रीनवरचं वाचू शकता.  १६० डिग्री वाइड व्यूव्हिंग अँगलचा फायदाही आहेच. सिल्व्हर आणि गोल्ड मेटलमध्ये हा फोन तर आणखी देखणा दिसतो. आधुनिक, स्टायलिश असा हा फोन केवळ ६,९९९/- या किमतीत उपलब्ध असेल.

वैशिष्टय़े :

उपलब्ध व्हर्जन : फोरजी ’ डिस्प्ले : ५ इंच ’ ऑपरेटिंग सिस्टम : अ‍ॅण्ड्रॉइड लॉलिपॉप व्ही ५.१ ’ प्रोसेसर : क्वाड कोर ६४ बीट १.० गीगाहर्ट्झ प्रोसेसर ’ बॅटरी : २००० एमएएच बॅटरी

मेमरी : ८ जीबी इंटरनल मेमरी- ३२ जीबीपर्यंत एक्स्पाण्डेबल, १ जीबी रॅम

कॅमेरा : ८ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि

५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
response.lokprabha@expressindia.com