जिओनीने त्याच्या मॅरेथॉन सीरिजमधला एम फाइव्ह प्लस हा फोन नुकताच लाँच केला. ५०२० एमएएच बॅटरी असलेला हा एम फाइव्ह प्लस २१ तास चालू शकतो. तसंच ६१९ तासांचा स्टॅण्डबाय कालावधी आहे. या फोनची डिझाइन अ‍ॅर्गोनॉमिक असून पूर्ण अल्ट्रा स्लिम मेटल बॉडी आहे. तसंच कॅमेरा मध्यभागी आहे. थ्री जीबी रॅम असून एक्स्पाण्डेबल ६४ जीबी रॉमपर्यंत आहे. या फोनचा स्क्रीनटच आणि वेग यामुळे मोबाइलवरील कामं सोप्या पद्धतीने आणि सहजतने होतात. मॅरेथॉन एम फाइव्ह प्लसची ऑपरेटिंग सिस्टम अ‍ॅमिगो ३.१ ही आहे. जिओनी मॅरेथॉन एम फाइव्ह प्लस या फोनचा रिअर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा फाइव्ह मेगापिक्सेल असल्यामुळे फोटो काढण्याचा भन्नाट अनुभव घेता येतो. हा फोन आवाजाचा दर्जा आणि डाऊनलोडचा जलद वेग यासाठी फोर जी व्होल्टवर चालतो.

वैशिष्टय़े :

  • २.५ डी कव्ह्र्ड एज १५.२४ सेमी (६.०), एफएचडी अ‍ॅमॉल्ड डिसप्ले
  • डय़ुअल सिम, डय़ुअल स्टॅण्डबाय, फिंगरप्रिंट सेक्युरिटीसह वेगाने चार्जिग होण्यासाठी टाइप सी यूएसबी
  • चिप सेट एमटी ६७५३ (ऑक्टा कोअर १.३ गीगाहर्ट्झ अण्ड्रॉइड ५.१)
  • ६४ जीबी रॉम, थ्री जीबी रॅम
  • १३.० मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ५.० मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • अ‍ॅण्ड्रॉइड ५.१ वर आधारित अ‍ॅमिगो ३.१
  • ५०२० एमएएच ली-पीओ डय़ुअल सेटअप बॅटरी
  • श्ॉम्पेन गोल्ड, पोलर गोल्ड
  • एको मोड, पॉवर सेव्हिंग मोड, एक्स्ट्रिम मोड
  • सीडीएमए बॅण्ड्स ८०० एमएचझेड

वनप्लसचं एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटर

वनप्लस या स्टार्टअप कंपनीने नुकतीच त्यांच्या पहिल्या एक्सक्लुझिव्ह सíव्हस सेंटर सुरू करण्याबाबत घोषणा केली. बंगळुरू हे पहिल्या टप्प्यातील एक केंद्र आहे. पहिल्या टप्प्यात सहा शहरांत एक्सक्लुझिव्ह सíव्हस सेंटरची स्थापना करण्यात येणार असून यामध्ये नवी दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नई यांचा समावेश आहे. ही सव्‍‌र्हिस सेंटर ग्राहकांच्या सोयीसाठी शहरांतील महत्त्वपूर्ण ठिकाणी आणि मॉल्समध्ये सुरूकरण्यात येणार आहेत. विविध सुविधांसह तंत्रज्ञानाची विशेष माहिती नसलेल्या ग्राहकांकरिता येथे मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरापासून दूर राहणाऱ्या ग्राहकांसाठी वनप्लसने विशेष सुविधा याआधीही दिली होती. दूर राहणाऱ्या ग्राहकांच्या सोयीसाठी कॉम्प्लिमेंटरी पिकअप आणि ड्रॉप फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com