Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १३ फेब्रुवारी २००९

मुंबईत सध्या सुरू असलेल्या काळाघोडा साहित्य महोत्सवात १३ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव हे कॅलिग्राफी फॅशन शो सादर करणार आहेत. अ‍ॅम्पी थिएटरमध्ये रात्री साडेआठ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात पालव यांच्या २५ वर्षांतील कारकीर्दीचा आढावा बी. डी. सोमाणी महाविद्यालयाचे विद्यार्थी ‘रोमान्सिंग कॅलिग्राफी’ या फॅशन शो मधून घेणार आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रत्येक डिझाईनवर पालव यांनी अक्षरांचा कलात्मक वापर केला आहे. या शोचे दिग्दर्शन उत्सव ढोलकिया यांचे असून फॅशन तज्ज्ञ गीता कॅसलिनो यांचे मार्गदर्शन या शोसाठी लाभले आहे. याचवेळी तन्वी पालव आणि आरती परांजपे यांच्या नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.

मध्यंतरी राम गोपाल वर्माचा ‘नाच’ हा चित्रपट आला होता. त्यातील अंतरा माळीचा वेगळ्या स्टाईलचा डान्स अनेकांच्या लक्षात राहिला होता. या चित्रपटात अंतरा माळी स्वत: एक नृत्यदिग्दर्शक असते. मात्र तिच्या या वेगळ्याप्रकारच्या डान्स स्टाईलला बॉलीवूडमध्ये कोणीही विचारत नाही.. ती खूप स्ट्रगल करते आणि अखेर यशस्वी होते, अशी साधारण चित्रपटाची कथा. फुलवाचा डान्सही याच पठडीतील आहे. परंतु चित्रपटातली अंतरा माळी आणि प्रत्यक्षातली फुलवा यांच्या कहाणीत बराच फरक आहे. फुलवाच्या डान्सची इथे कोणी अवहेलना केली नाही की चेष्टा केली नाही. उलट सगळ्यांनी फुलवाच्या वेगळ्या शैलीच्या डान्सचे स्वागत केले. फुलवाचा हा नृत्यप्रकार खऱ्र्या अर्थाने ‘हिट’ झाला. काहीतरी वेगळे पाहतोय याची अनुभुती सगळ्यांना आली आणि फुलवाचा कोरियोग्राफर होण्याचा मार्ग सुकर झाला. ‘एकापेक्षा एक’मधील फुलवाचा तेरी दिवानी, गारवा, सय्या या गाण्यांवरचा डान्स कोणी पाहिला असेल त्यांना तिच्या वेगळ्या नृत्यशैलीची चटकन खात्री होईल.

‘थम्सअप’च्या नव्या जाहिरातीमध्ये अक्षयकुमार आता दुहेरी भूमिकेत
प्रतिनिधी
: ‘अ‍ॅक्शन किंग’ अक्षयकुमार आता लवकरच ‘थम्सअप’च्या नव्या जाहिरातीमध्ये पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. सॉफ्ट ड्रिंकच्या क्षेत्रात थम्सअप हा एक मोठा ब्रण्ड समजला जातो. खास भारतातील थम्सअपच्या चाहत्यांसाठी कंपनीने ही नवी जाहिरात तयार केली असून लवकरच ती दूरचित्रवाहिन्यांवरून पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील रस्त्यावर याचे चित्रिकरण करण्यात आले आहे. ‘माझी तहान भागविण्यासाठी मी काहीही करेन’ अशा कल्पनेवर आधारित ही जाहिरात असून या जाहिरातीच्या निमित्ताने अक्षयकुमार पहिल्यांदाच दुहारी भूमिकेत थम्सअपच्या जाहिरातीत दिसणार आहे.

‘इंडियन आयडॉल’च्या सेटवर थिरकले परीक्षकांचे पाय!
प्रतिनिधी

‘इंडियन आयडॉल’ची ग्रॅण्ड फीनाले अवघ्या दोन आठवडय़ांवर येऊन ठेपली असल्याने सेटवर खूप उत्साहाचे वातावरण आहे. या पर्वातील हे शेवटचे काही दिवस अविस्मरणीय करण्याचा सर्वच जण प्रयत्न करीत आहेत. ‘रिट्रो मिट्स डिस्को’ ही यावेळच्या भागाची ‘थीम’ होती. मिथुन चक्रवर्तीच्या वेषातील हुसेनने सेटवर एकच धमाल उडवून दिली तर चॅंगने वेगवेगळ्या नटांच्या वेषातील आपली अदाकारी पेश केली. ‘इंडियन आयडॉल’च्या सेटवर अशाप्रकारची धमाल पहिल्यांदाच घडली!

अंजली काळे यांचे ‘एक्स्प्रेशन इन वूड!’
प्रतिनिधी
: अंजली काळे यांचे ‘एक्स्प्रेशन इन वूड’ हे आगळ्या कलाकृतींचे प्रदर्शन सध्या वरळी येथील नेहरू सेंटर कला दालनात भरले आहे. लाकडांची वास्तववादी उठावशिल्पे त्यांनी साकारली आहेत. लाकडाच्या माध्यमाला रंगांची जोड देऊन, त्याला विविध आवरणे चढवून, लाकडाचे कॅनव्हासमध्ये रूपांतर करून एक आगळा कलाविष्कार त्यांनी साकारला आहे. अंजली काळे यांनी लाकडावर श्रीकृष्णाचा अवतार असणाऱ्या श्रीनाथजींचे वेधक चित्र रेखाटले आहे. चित्राला धेनूंची किनार, विविध पोतकाम, श्रीनाथजींच्या गळ्यातील माळ, माळेतील मणी, आकर्षक रंगछटा यांचे चित्रण अंजली यांनी केले आहे. हे प्रदर्शन सोमवार, १६ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान सर्व चित्ररसिकांना पाहायला मिळेल.

विल स्मिथच्या अभिनयासाठी
विल स्मिथच्या चाहत्यांसाठी त्याचे ‘अ‍ॅक्शनपट’ हे सर्वाधिक महत्त्वाचे असतात.े मात्र ‘पर्सुएट ऑफ दी हॅपीनेस’ ने सवरेत्कृष्ट अभिनेत्यासाठीचे २००६ चे नामांकन मिळवून दिल्यानंतर त्याच्या गंभीर अभिनयालाही प्रेक्षकांनी आवडीने स्वीकारले. ‘सेव्हन पाऊंड’ हा ‘पर्सुएट ऑफ दी हॅपीनेस’च्या दिग्दर्शकाचा विल स्मिथबरोबरचा सिनेमा दुसरा सिनेमा असल्याने त्याबाबत फार मोठय़ा अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. मात्र अमेरिकेत प्रदर्शनाच्या पहिल्या आठवडय़ातच टीकेचे लक्ष्य बनला. काही लोकप्रिय याद्यांमध्ये चित्रपटाला वर्षांतील वाईट सिनेमा म्हणून संबोधले गेले. तरी विशेष म्हणजे विल स्मिथच्या चाहत्यांकडून नाकारला गेला नाही. उलट ‘पर्सुएट ऑफ दी हॅपीनेस’पेक्षा हा चित्रपट अप्रतिम असल्याचा प्रचार ब्लॉग्जवरून करण्यात आला आहे. एका अपघातात सात जणांचा मृत्यू होतो. त्या मृत्यूला जबाबदार ठरणारा या चित्रपटातील नायक सात जणांना जीवनदान देण्यासाठी पुढे सरसावतो यावर ‘सेव्हन पाऊंड’चे कथानक आधारले आहे. सात अनोळखी लोकांना जगण्यासाठी मदत करण्याचा प्रवास अत्यंत नाटय़पूर्ण आणि भावूकपणे उलगडण्यात आला आहे. ज्यामुळे चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळायला हरकत नव्हती. ‘आय एम लिजंड’ आणि ‘हॅनकॉक’मु़ळे भारतात स्मिथबाबत निराश झालेल्या आपल्याकडील चाहत्यांना पुन्हा एकदा या चित्रपटामुळे विल स्मिथचा सरस अभिनय या चित्रपटात नक्कीच पाहायला मिळू शकेल.

नावावरून जरा हट के फिल्म वाटते. या चित्रपटाची कथा वास्तवात घडलेली आहे. दिल्लीत लागू करण्यात आलेल्या र्निबधांमुळे एका जाहिरात कंपनी बंद करण्याची वेळ येते. त्या वेळी जाहिरात कंपनीचा सीईओ ‘जुगाड’ करू लागतो. या ‘जुगाड’मध्ये प्रॉपर्टी डीलर, राजकीय नते इत्यादी व्यक्तींचा समावेश होतो. यापूर्वीही कोणतेही नावाजलेले अभिनेते नसताना केवळ अप्रतिम कथा आणि मांडणी यामुळे ‘खोसला का घोसला’ प्रेक्षकांना भावला होता. ‘जुगाड’मध्ये मनोज वाजपेयी, गोविंद नामदेव, हृषिता भट यांनी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद कुमारने केले आहे. दिग्दर्शक ओळखीचा नसला तरी कथा इंटरेस्टिंग आहे. ‘ऑफ बीट’ कथा आवडणाऱ्यांनी हा चित्रपट पाहायला काहीच हरकत नाही.

बिल्लू
इरफान खान आणि लारा दत्तापेक्षा हा शाहरूखच्या कंपनीचा चित्रपट म्हणून जास्त चर्चिला जात आहे. निर्मिती शाहरूखची असली तरी मुख्य भूमिकेत इरफान खान आहे. ही व्यक्तिरेखा आपल्याला साकारता यावी म्हणून शाहरूखने प्रियदर्शनला विचारले होते. पण प्रियदर्शनच्या मनात इरफान खानच होता. तो म्हणाला की ‘बिल्लू’ची भूमिका करायला इरफान खान तयार झाला तरच हा चित्रपट होईल. यातील फिल्म सुपरस्टारची भूमिका शाहरूखने साकारली आहे. भिन्न राहणीमानात जगणाऱ्या दोन व्यक्तिरेखां एका समान व्यासपीठावर येतात तेव्हा काय होते, असे या चित्रपटाचे कथासूत्र आहे. चित्रपटाच्या शीर्षकाविषयी अलीकडेच वाद निर्माण झाला होता. शाहरूख खानने फारसे आढेवेढे न घेता ‘बार्बर’ हा शब्द शीर्षकातून काढून टाकला. दुसरी गोष्ट म्हणजे ‘बिल्लू’ हा चित्रपट ‘कथा परयुम पोल’ या चित्रपटाचा रिमेक आहे. शाहरूखच्या म्हणण्याप्रमाणे त्याचे ‘हिंदी’करण करण्यात आले आहे आणि प्रियदर्शनही म्हणाला होता की, हा त्याचा शेवटचा रिमेक असणार आहे. काहीही असले तरी शाहरूख आणि इरफान यांना पडद्यावर एकत्र पाहायला मजा येईल एवढे नक्की.