Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

डॉ. शैला लोहिया यांच्या पुस्तकाचे १३ जूनला प्रकाशन
अंबाजोगाई, ६ जून / वार्ताहर

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां व प्रथितयश लेखिका डॉ. शैला लोहिया यांनी ‘लोकसत्ता’च्या मराठवाडा वृत्तांतमध्ये ‘संवाद’ या सदरात या वर्षांत लिहिलेल्या लेखांचे संकलन करून ‘रुणझुणत्या पाखरा’ या पुस्तकाचे प्रकाशन १३ जूनला होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम उपस्थित राहणार आहेत.

 

डॉ. शैला लोहिया यांची ओळख एक प्रथितयश लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्यां म्हणून सर्वदूर आहे. त्या उत्तम कवियत्रीसुद्धा आहेत. त्यांनी लिहिलेल्या गीतांना वैशाली सामंतसारख्या आघाडीच्या गायिकेने आपला आवाज आणि राजेश सरकटे यांनी संगीत दिले आहे.
तसेच मानवलोकच्या माध्यमातून श्रीमती लोहिया यांनी मनस्विनी प्रकल्प उभारून अनेक सुशिक्षित, निराधार महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी सहकार्य केले आहे.
‘रुणझुणत्या पाखरा’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, १३ जूनला सायंकाळी साडेपाच वाजता मानवलोकच्या मनस्विनी प्रकल्प, पोखरी रोड या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमास साहित्य रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेने केले आहे.