Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘हिंदुस्थानचा युगपुरुष -मल्हारराव होळकर’चे प्रकाशन
लातूर, ६ जून / वार्ताहर

प्राचार्य मधुकर सलगरे लिखित पहिली ऐतिहासिक व चरित्रात्मक कादंबरी ‘हिंदुस्थानचा युगपुरुष-

 

मल्हारराव होळकर’चे प्रकाशन शिवछत्रपती ग्रंथालयात थाटात झाले.
पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, माजी ग्रामविकास मंत्री अण्णा डांगे, मल्हारराव होळकरांच्या मामांचे वंशज अमरजीतदादा बारगळ (खान्देश), प्रसिद्ध इतिहास संशोधक व रंगकर्मी डॉ. गणेश मतकर (इंदूर), लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. भातांब्रे यांच्या हस्ते झाले.
या वेळी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करताना मल्हाररावांनी अटकेपार झेंडे लावून मराठय़ांची विजयपताका सतत फडकवत ठेवल्याचे सांगितले. यावेळी अण्णा डांगे यांनी हे पुस्तक उत्कृष्ट चरित्र असल्याचे नमूद करून धनगर समाजाने संघटित होण्याचे आवाहन केले.
पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने २००८-०९ च्या राजे मल्हारराव होळकर ट्रस्टचा पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. या वेळी उत्कृष्ट पत्रकारितेचा रामशास्त्री प्रभुणे पुरस्कार प्रदीप नणंदकर यांना, यशवंतराव होळकर पुरस्कार डॉ. गणेश मतकर यांना, तर समाजसेवेबद्दलचा पुरस्कार बीडचे डॉ. गणपत काकडे यांना देण्यात आला. यावेळी शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन लातूरच्या वतीने प्राचार्य मधुकर सलगरे यांचे अभिनंदन करण्यात आले.