‘स्वातंत्र्याचे स्वगत’ हा राजीव काळे लिखित लेख वाचला. जावेद अख्तरजींनी खूप स्पष्ट विचार मांडले आहेत. आम्हा नवीन पिढीला गोंधळात पाडणारी खूप माध्यमे उपलब्ध आहेत. काय खरे आणि काय खोटे हे समजून घ्यायला आम्हाला वेळ कुठे आहे? आणि आहे तो वेळ आम्ही समजून घेण्याआधी फॉरवर्ड करण्यात घालतो. ‘लोकसत्ता गप्पा’च्या माध्यमातून तरी आम्हाला जाणकारांकडून आपण खूप वेळा कसे चुकीचे वागतो हे समजायला मदत होते. जावेदजींनी सांगितलेली श्रद्धा आणि विश्वास यातला फरक खरंच मनाला भावला. जावेदजींच्या लेखामुळे खूप प्रश्नाची उत्तरे समजून घेता आली.

– शुभांगी  सिरसाट

पुन:प्रत्ययाचा आनंद

‘लोकरंग’मधील जावेद अख्तर यांच्या मुलाखतीवर आधारित ‘स्वातंत्र्याचे स्वगत’ हा राजीव काळे यांनी लिहिलेला रिपोर्ताज् वाचला. मला ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमाला उपस्थित राहून तो प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळाली. परंतु हा लेख वाचून पुन:प्रत्ययाचा आनंदही मिळाला.  कारण हा रिपोर्ताज् वाचताना प्रत्यक्ष जावेद अख्तर यांचे शब्द ऐकू येत होते.. प्रत्यक्ष ते समोर दिसत होते.

– आशा कानिटकर

अभ्यासपूर्ण मांडणी

‘लोकरंग’मधील ‘समासातून’ हे सदर वाचनीय व वेगळ्या विषयावरील अभ्यासपूर्ण मांडणी करणारे आहे. ‘जबाबदारी.. त्यांची’ आणि ‘जबाबदारी.. आपली’ हे दोन्ही लेख वाचनीय होते. वाङ्मयीन नियतकालिकांचे व्यवस्थापन करताना या सदराचा नक्कीच फायदा होईल.

– पंडित तडेगावकर, जालना</strong>

‘लोकरंग’मधील लेखांवरील आपली मते, प्रतिक्रिया lokrang@expressindia.com वर पाठवाव्यात.