- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
इक्वेडॉरमधील कोटालो येथील तुंगुराहुआ ज्वालामुखी
दुरून डोंगर साजरे, ही म्हण सर्वांनाच माहीत आहे. पण दुरून ज्वालामुखीचा उद्रेकही एवढा साजरा दिसत असेल, अशी कल्पनाही येत नाही. अत्यंत कमी शटर स्पीड ठेवून टिपलेले हे छायाचित्र आहे इक्वेडॉरमधील कोटालो येथील तुंगुराहुआ या ज्वालामुखीचे. सोमवारी पहाटे हा ज्वालामुखी सक्रिया झाला आणि कोटालो व आसपासच्या गावांतील रहिवाशांची झोप उडाली. पर्वताच्या मुखातून उसळणाऱया या लाव्हाची उंची तब्बल एक किलोमीटर एवढी असल्याचे इक्वेडॉरच्या राष्ट्रीय जिओफिजिक्स संस्थेतर्फे सांगण्यात आले. या लाव्हामुळे आसपासच्या अनेक वस्त्यांवर राख साचू लागली आहे... (छाया - पीटीआय)














