- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
१८ वे पुष्प प्रदर्शन भायखळा, मुंबई
उटी, मुन्नार, कोडाई कनाल किंवा कोणत्याही थंड हवेच्या ठिकाणी असलेली रोपवाटिका पर्यटकांचं लक्ष नेहमीच वेधून घेते. त्या रोपवाटिकेतील विविध जातींची आणि अनेकविध रंगांची फुलं कोणालाही आकर्षित करतात. सध्या मुंबईतही थंडीचा बहर फुलला आहे. त्याचाचा परिणाम की काय, पण भायखाळ्याच्या राणीच्या बागेत ही सुंदर सुंदर फुलं मुंबईकरांच्या भेटीसाठी आतूर झाली आहेत. पालिकेतर्फे भरवण्यात येणाऱ्या १८व्या पुष्प प्रदर्शनात अनेक जातींची ही फुलं पाहण्याची अनोखी संधी मुंबईकरांना मिळणार आहे.(छाया - प्रदीप दास)















