23 October 2017

News Flash

दुबईत बहरले सरस्वती–राघवचे प्रेम

 • सरस्वती या मालिकेचे कथानक आता एक नवीन वळण घेत आहे. सध्या चर्चेत असलेली सरू – राघवची दुबई वारी प्रेक्षकांना लवकरच मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. निळाशार समुद्र, वाळू, लखलखती दुबई, नवीन जागा या बरोबरच या सगळ्यांमध्ये सरस्वती आणि राघवच प्रेम फुलणार आहे.

  सरस्वती या मालिकेचे कथानक आता एक नवीन वळण घेत आहे. सध्या चर्चेत असलेली सरू – राघवची दुबई वारी प्रेक्षकांना लवकरच मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. निळाशार समुद्र, वाळू, लखलखती दुबई, नवीन जागा या बरोबरच या सगळ्यांमध्ये सरस्वती आणि राघवच प्रेम फुलणार आहे.

 • लग्नानंतर सरू आणि राघव पहिल्यांदाच एकत्र बाहेर परदेशी गेले असून ही ट्रीप नक्कीच या दोघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. एका छोट्याश्या गावामध्ये राहणारी मुलगी आज परदेशी गेली असून तिच्यासाठी हा वेगळा अनुभव आहे.

  लग्नानंतर सरू आणि राघव पहिल्यांदाच एकत्र बाहेर परदेशी गेले असून ही ट्रीप नक्कीच या दोघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. एका छोट्याश्या गावामध्ये राहणारी मुलगी आज परदेशी गेली असून तिच्यासाठी हा वेगळा अनुभव आहे.

 • दुबई ट्रीपमध्ये सरस्वती प्रेक्षकांना वेगळ्या लुक मध्ये दिसणार आहे. सरस्वती पहिल्यांदाच विमानामध्ये बसणार याबद्दल तिच्या मनात खूपच उत्सुकता आहे. विमानतळावर जाताना वा विमानामधून प्रवास करताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, कुठल्या गोष्टी करू नये हे सगळच तिच्यासाठी खूपच नवीन असल्यामुळे तिची कुठल्याप्रकारे धांदल उडणार आहे ? ती कुठला गोंधळ तर घालणार नाही ना ? या गोष्टी बघणं खूपच मजेदार असणार आहे.

  दुबई ट्रीपमध्ये सरस्वती प्रेक्षकांना वेगळ्या लुक मध्ये दिसणार आहे. सरस्वती पहिल्यांदाच विमानामध्ये बसणार याबद्दल तिच्या मनात खूपच उत्सुकता आहे. विमानतळावर जाताना वा विमानामधून प्रवास करताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, कुठल्या गोष्टी करू नये हे सगळच तिच्यासाठी खूपच नवीन असल्यामुळे तिची कुठल्याप्रकारे धांदल उडणार आहे ? ती कुठला गोंधळ तर घालणार नाही ना ? या गोष्टी बघणं खूपच मजेदार असणार आहे.

 • या भागात विमानामधील एक ड्रीम सिक्वेन्स देखील बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये सरस्वती आणि राघव एक रोमॅण्टिक डान्स करताना दिसतील.

  या भागात विमानामधील एक ड्रीम सिक्वेन्स देखील बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये सरस्वती आणि राघव एक रोमॅण्टिक डान्स करताना दिसतील.

 • दुबईला जाताना सरस्वतीने नवऱ्यासाठी लोणची, चटण्या, चिवडा अश्या बऱ्याच गोष्टी घेतल्या आहेत. यावरूनच सरस्वतीचं आपल्या नवऱ्यावरच प्रेम कळून येतं. त्यामुळे दुबई ट्रीप ही सरू आणि राघवच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय ट्रीप असणार यात शंका नाही.

  दुबईला जाताना सरस्वतीने नवऱ्यासाठी लोणची, चटण्या, चिवडा अश्या बऱ्याच गोष्टी घेतल्या आहेत. यावरूनच सरस्वतीचं आपल्या नवऱ्यावरच प्रेम कळून येतं. त्यामुळे दुबई ट्रीप ही सरू आणि राघवच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय ट्रीप असणार यात शंका नाही.

 • आपला जोडीदार आपल्यासोबत आहे, ज्यावर आपण जीवापाड प्रेम करतो. त्याच्या बरोबर आपल्याला इतका वेळ एकांतात मिळणार आहे ही भावनाच मुळी सुखावणारी असते.

  आपला जोडीदार आपल्यासोबत आहे, ज्यावर आपण जीवापाड प्रेम करतो. त्याच्या बरोबर आपल्याला इतका वेळ एकांतात मिळणार आहे ही भावनाच मुळी सुखावणारी असते.

 • दुबईमध्ये फेरफटका मारताना राघव आणि सरस्वतीची चुकामूकही होते. पण इतक्या मोठ्या शहरात राघवला शोधण्यात अखेर सरस्वतीला यश येते. पण याच ट्रीपमध्ये सरू आणि राघवबरोबर एक तिसरा व्यक्ती देखील असून तो या दोघांचा पाठलाग करतो आहे. तो तिसरा व्यक्ती म्हणजे सदाशिव, जो सरस्वतीला मारण्याच्या हेतूने दुबईमध्ये गेला आहे.

  दुबईमध्ये फेरफटका मारताना राघव आणि सरस्वतीची चुकामूकही होते. पण इतक्या मोठ्या शहरात राघवला शोधण्यात अखेर सरस्वतीला यश येते. पण याच ट्रीपमध्ये सरू आणि राघवबरोबर एक तिसरा व्यक्ती देखील असून तो या दोघांचा पाठलाग करतो आहे. तो तिसरा व्यक्ती म्हणजे सदाशिव, जो सरस्वतीला मारण्याच्या हेतूने दुबईमध्ये गेला आहे.

 • राघव-सरस्वतीची दुबई ट्रीप सुखरूप होईल का? सरुला मारण्याच्या हेतूमध्ये सदानंदला यश मिळेल का? की खरोखरच सरस्वतीचा मृत्यू होईल? राघव आणि सरू एकमेकांपासून दुरावले तर जाणार नाही ना ? हे सगळं बघण रंजक ठरणार आहे.

  राघव-सरस्वतीची दुबई ट्रीप सुखरूप होईल का? सरुला मारण्याच्या हेतूमध्ये सदानंदला यश मिळेल का? की खरोखरच सरस्वतीचा मृत्यू होईल? राघव आणि सरू एकमेकांपासून दुरावले तर जाणार नाही ना ? हे सगळं बघण रंजक ठरणार आहे.

अन्य फोटो गॅलरी