23 October 2017

News Flash

‘चला हवा येऊ द्या’मध्ये आमिरची ‘दंगल’..

 • “महाराष्ट्रातील जनता कोणत्याही संकटाचा सामना खंबिरपणे करते. येथील प्रत्येक गावात आणि गावकऱ्यांत कठीण परिस्थितीशी लढण्याची ताकद आहे आणि यामुळेच दुष्काळाच्या संकटावरसुद्धा हे गावकरी एकत्र येऊन मात करतील” असा विश्वास हिंदी चित्रपटसृष्टीत मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या सुपरस्टार आमिर खानने व्यक्त केला. निमित्त होतं झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचं.

  “महाराष्ट्रातील जनता कोणत्याही संकटाचा सामना खंबिरपणे करते. येथील प्रत्येक गावात आणि गावकऱ्यांत कठीण परिस्थितीशी लढण्याची ताकद आहे आणि यामुळेच दुष्काळाच्या संकटावरसुद्धा हे गावकरी एकत्र येऊन मात करतील” असा विश्वास हिंदी चित्रपटसृष्टीत मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या सुपरस्टार आमिर खानने व्यक्त केला. निमित्त होतं झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचं.

 • महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती बघता भविष्यात उद्भवणा-या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमिर खान आपल्या ‘पानी फाउंडेशन’ या संस्थेद्वारे छोट्या छोट्या गावांमध्ये काम करतो आहे.

  महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती बघता भविष्यात उद्भवणा-या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमिर खान आपल्या ‘पानी फाउंडेशन’ या संस्थेद्वारे छोट्या छोट्या गावांमध्ये काम करतो आहे.

 • गेल्यावर्षी तीन तालुक्यांमधील गावांमध्ये त्याने ‘वॉटर कप स्पर्धेचं’ आयोजन करण्यात आलं होतं.

  गेल्यावर्षी तीन तालुक्यांमधील गावांमध्ये त्याने ‘वॉटर कप स्पर्धेचं’ आयोजन करण्यात आलं होतं.

 • या स्पर्धेला गावांगावांमधून मिळालेला उत्तम प्रतिसाद बघता यावर्षी ‘पानी फाउंडेशन’ तीस तालुक्यांमधील हजारो गावांमध्ये जाऊन तेथील गावक-यांना प्रशिक्षण देणार आहे.

  या स्पर्धेला गावांगावांमधून मिळालेला उत्तम प्रतिसाद बघता यावर्षी ‘पानी फाउंडेशन’ तीस तालुक्यांमधील हजारो गावांमध्ये जाऊन तेथील गावक-यांना प्रशिक्षण देणार आहे.

 • याच प्रकल्पाविषयीची माहिती देण्यासाठी आमिर खान आपली पत्नी किरण रावसह या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्याच्यासोबत ‘पानी फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकळ आणि ज्येष्ठ पाणीतज्ञ तथा प्रकल्प संचालक डॉ. अविनाश पोळ हे देखील उपस्थित होते.

  याच प्रकल्पाविषयीची माहिती देण्यासाठी आमिर खान आपली पत्नी किरण रावसह या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्याच्यासोबत ‘पानी फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकळ आणि ज्येष्ठ पाणीतज्ञ तथा प्रकल्प संचालक डॉ. अविनाश पोळ हे देखील उपस्थित होते.

 • एक संवेदनशील अभिनेता आणि एक जागरुक नागरिक ही आमिर खानची ओळख सर्वश्रुत आहेच परंतु याही पुढे जाऊन केवळ चर्चा न करता थेट कार्य करण्यात आमिर विश्वास ठेवतो.

  एक संवेदनशील अभिनेता आणि एक जागरुक नागरिक ही आमिर खानची ओळख सर्वश्रुत आहेच परंतु याही पुढे जाऊन केवळ चर्चा न करता थेट कार्य करण्यात आमिर विश्वास ठेवतो.

 • यामुळेच महाराष्ट्रातील दुष्काळावर चर्चा किंवा काही भाष्य करुन तेवढ्यावरच न थांबता आमिर खानने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. “पाणी वाचवण्याची, ते साठवण्याची तथा जमिनीत मुरवण्याची सोपी पद्धत आम्ही लोकांना शिकवतो. या कार्यामध्ये मागील वर्षी सहभागी झालेले अनेक प्रशिक्षणार्थी गावकरी यावर्षी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत हे विशेष” अशी माहिती डॉ. पोळ आणि सत्यजीत भटकळ यांनी यावेळी दिली.

  यामुळेच महाराष्ट्रातील दुष्काळावर चर्चा किंवा काही भाष्य करुन तेवढ्यावरच न थांबता आमिर खानने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. “पाणी वाचवण्याची, ते साठवण्याची तथा जमिनीत मुरवण्याची सोपी पद्धत आम्ही लोकांना शिकवतो. या कार्यामध्ये मागील वर्षी सहभागी झालेले अनेक प्रशिक्षणार्थी गावकरी यावर्षी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत हे विशेष” अशी माहिती डॉ. पोळ आणि सत्यजीत भटकळ यांनी यावेळी दिली.

 • या कार्यक्रमात आमिरने धमालही केली. त्याच्या अनोख्या अंदाजाने त्यावेळी अनेकांची मनं जिंकली.

  या कार्यक्रमात आमिरने धमालही केली. त्याच्या अनोख्या अंदाजाने त्यावेळी अनेकांची मनं जिंकली.

 • मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. यावर्षी चला हवा येऊ द्या मध्ये गुढीपाडवा आणि आमिर खानचा सहभाग हा योग जुळून आला आणि या मंचावर आमिरने सपत्निक गुढी उभारत सर्वांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.

  मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. यावर्षी चला हवा येऊ द्या मध्ये गुढीपाडवा आणि आमिर खानचा सहभाग हा योग जुळून आला आणि या मंचावर आमिरने सपत्निक गुढी उभारत सर्वांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.

 • आमिर खानने या मंचावर त्याचा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा केला.

  आमिर खानने या मंचावर त्याचा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा केला.

 • त्यासोबतच किरणसोबत त्याने 'परफेक्ट' नृत्यही केले.

  त्यासोबतच किरणसोबत त्याने 'परफेक्ट' नृत्यही केले.

अन्य फोटो गॅलरी