26 June 2017

News Flash

झी चित्र गौरव २०१७

  • नुकताच झी गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात दिमाखदार पद्धतीने पार पडला. आपल्या हळव्या प्रेमकथेने आणि झिंगाट गाण्यांनी सर्वांनाच वेड लावणा-या 'सैराट' चित्रपटाची जादू याही पुरस्कार सोहळ्यावर बघायला मिळाली. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक  यासहित आठ पुरस्कारांवर ‘सैराट’ने आपलं नाव कोरलं.

    नुकताच झी गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात दिमाखदार पद्धतीने पार पडला. आपल्या हळव्या प्रेमकथेने आणि झिंगाट गाण्यांनी सर्वांनाच वेड लावणा-या 'सैराट' चित्रपटाची जादू याही पुरस्कार सोहळ्यावर बघायला मिळाली. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यासहित आठ पुरस्कारांवर ‘सैराट’ने आपलं नाव कोरलं.

  • या रंगतदार सोहळ्याचं खुमासदार सूत्रसंचालन प्रियदर्शन जाधव आणि सुमीत राघवन यांनी केलं.

    या रंगतदार सोहळ्याचं खुमासदार सूत्रसंचालन प्रियदर्शन जाधव आणि सुमीत राघवन यांनी केलं.

  • आपल्या सोज्वळ व्यक्तिमत्वाने आणि सालस अभिनयाने मराठीच नव्हे तर हिंदी रसिकांचीही मने जिंकणा-या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.

    आपल्या सोज्वळ व्यक्तिमत्वाने आणि सालस अभिनयाने मराठीच नव्हे तर हिंदी रसिकांचीही मने जिंकणा-या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.

  • ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना सीमाताईंसह उपस्थित प्रेक्षकही भारावून गेले होते.

    ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना सीमाताईंसह उपस्थित प्रेक्षकही भारावून गेले होते.

  • रमेश देव, सीमा देव, अभिनय देव आणि अजिंक्य देव

    रमेश देव, सीमा देव, अभिनय देव आणि अजिंक्य देव

  • ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना सीमाताईंसह उपस्थित प्रेक्षकही भारावून गेले होते.

    ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना सीमाताईंसह उपस्थित प्रेक्षकही भारावून गेले होते.

  • ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते गिरीश कुलकर्णीला जाऊंद्याना बाळासाहेब चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.

    ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते गिरीश कुलकर्णीला जाऊंद्याना बाळासाहेब चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- इरावती हर्षे (कासव)

    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- इरावती हर्षे (कासव)

  • सर्वोत्कृष्ट बालकलाकार- शुभम मोरे, विनायक पोतदार (हाफ तिकीट)

    सर्वोत्कृष्ट बालकलाकार- शुभम मोरे, विनायक पोतदार (हाफ तिकीट)

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- नागराज मंजुळे (सैराट)

    सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- नागराज मंजुळे (सैराट)

  • या सोहळ्याला चार चांद लावले ते रंगतदार नृत्याविष्काराने. प्राजक्ता माळी, श्रुती मराठे, वैभव तत्त्ववादी, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे, वैदेही परशुरामी, रसिका सुनील या कलाकारांच्या देखण्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली.

    या सोहळ्याला चार चांद लावले ते रंगतदार नृत्याविष्काराने. प्राजक्ता माळी, श्रुती मराठे, वैभव तत्त्ववादी, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे, वैदेही परशुरामी, रसिका सुनील या कलाकारांच्या देखण्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली.

  • सर्वांची दाद मिळवून  गेला तो अभिनय बेर्डेचा परफॉर्मन्स. आपले वडील लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्यांच्याच गाण्यांतून अभिनयने आदरांजली दिली आणि त्याची साथ दिली ती लक्ष्यासोबत काम केलेल्या अभिनेत्रींनी म्हणजेच किशोरी शहाणे, वर्षा उसगावकर, किशोरी अंबिये आणि निवेदिता सराफ. याशिवाय ज्येष्ठ दिग्दर्शक महेश कोठारे यांनीही रंगमंचावर येत अभिनयच्या सोबतीने आपल्या नृत्याची झलक दाखवली.

    सर्वांची दाद मिळवून गेला तो अभिनय बेर्डेचा परफॉर्मन्स. आपले वडील लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्यांच्याच गाण्यांतून अभिनयने आदरांजली दिली आणि त्याची साथ दिली ती लक्ष्यासोबत काम केलेल्या अभिनेत्रींनी म्हणजेच किशोरी शहाणे, वर्षा उसगावकर, किशोरी अंबिये आणि निवेदिता सराफ. याशिवाय ज्येष्ठ दिग्दर्शक महेश कोठारे यांनीही रंगमंचावर येत अभिनयच्या सोबतीने आपल्या नृत्याची झलक दाखवली.

  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- श्रेया घोषाल (आताच बया का बावरलं- सैराट)

    सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- श्रेया घोषाल (आताच बया का बावरलं- सैराट)

  • व्हेंटिलेटर चित्रपटाचा दिग्दर्शक राजेश मापुस्कर आणि प्रियांका चोप्राच्या आई डॉ.मधू चोप्रा कॅमे-यास पोज देताना.

    व्हेंटिलेटर चित्रपटाचा दिग्दर्शक राजेश मापुस्कर आणि प्रियांका चोप्राच्या आई डॉ.मधू चोप्रा कॅमे-यास पोज देताना.

  • सोनाली कुलकर्णी

    सोनाली कुलकर्णी

  • श्रेया घोषाल

    श्रेया घोषाल

  • अमृता खानविलकर

    अमृता खानविलकर

  • इम्पेरिअल ब्लु पिपल्स चॉईस सर्वोत्कृष्ट पदार्पण हा पुरस्कार अभिनेता आकाश ठोसरने तर गार्नियर ब्लॅक नॅचरल परफॉरमन्स ऑफ द इयर हा पुरस्कार अभिनेत्री रिंकु राजगुरुने मिळविला.

    इम्पेरिअल ब्लु पिपल्स चॉईस सर्वोत्कृष्ट पदार्पण हा पुरस्कार अभिनेता आकाश ठोसरने तर गार्नियर ब्लॅक नॅचरल परफॉरमन्स ऑफ द इयर हा पुरस्कार अभिनेत्री रिंकु राजगुरुने मिळविला.

  • वैभव तत्ववादी, आकाश ठोसर

    वैभव तत्ववादी, आकाश ठोसर

  • उर्मिला कोठारे

    उर्मिला कोठारे

  • मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या रंगात रंगवून टाकणारा असा हा भव्य दिव्य सोहळा येत्या २६ मार्चला तुम्हाला पाहायला मिळेल.

    मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या रंगात रंगवून टाकणारा असा हा भव्य दिव्य सोहळा येत्या २६ मार्चला तुम्हाला पाहायला मिळेल.

अन्य फोटो गॅलरी

  1. No Comments.