23 October 2017

News Flash

सर्वाधिक कर भरणाऱ्यांत ‘सुलतान’ कोण?

 • चालू आर्थिक वर्षाचा शेवट जवळ आलेला असतानाच नुकतीच आगाऊ कर भरणाऱ्या सेलिब्रिटींच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत अभिनेता सलमान खानचे नाव अग्रस्थानी आहे. सुलतान या त्याच्या सिनेमाने गेल्यावर्षी जगभराचा मिळून सुमारे ५०० कोटींचा गल्ला कमवला होता. सलमानने यावर्षी तब्बल ४४.५ कोटी रुपयांचा कर दिला आहे. गेल्यावर्षी सलमानने ३२ कोटींचा कर भरला होता. यावर्षी कबीर खान दिग्दर्शित 'ट्युबलाइट' या सिनेमातून सलमान प्रेक्षकांना भेटणार आहे.

  चालू आर्थिक वर्षाचा शेवट जवळ आलेला असतानाच नुकतीच आगाऊ कर भरणाऱ्या सेलिब्रिटींच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत अभिनेता सलमान खानचे नाव अग्रस्थानी आहे. सुलतान या त्याच्या सिनेमाने गेल्यावर्षी जगभराचा मिळून सुमारे ५०० कोटींचा गल्ला कमवला होता. सलमानने यावर्षी तब्बल ४४.५ कोटी रुपयांचा कर दिला आहे. गेल्यावर्षी सलमानने ३२ कोटींचा कर भरला होता. यावर्षी कबीर खान दिग्दर्शित 'ट्युबलाइट' या सिनेमातून सलमान प्रेक्षकांना भेटणार आहे.

 • सलमाननंतर आगाऊ कर भरण्यात दुसऱ्या क्रमांकावर खिलाडी कुमारचा नंबर लागतो. 'एअरलिफ्ट', 'रुस्तम' आणि नुकताच आलेल्या 'जॉली एलएलबी २' यासिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या अक्षयने मागच्या वर्षी ३० कोटी रुपयांचा आगाऊ कर भरला होता. यावर्षी खिलाडी कुमारने यंदा २९.५ कोटी रुपयांचा कर देऊ केला.

  सलमाननंतर आगाऊ कर भरण्यात दुसऱ्या क्रमांकावर खिलाडी कुमारचा नंबर लागतो. 'एअरलिफ्ट', 'रुस्तम' आणि नुकताच आलेल्या 'जॉली एलएलबी २' यासिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या अक्षयने मागच्या वर्षी ३० कोटी रुपयांचा आगाऊ कर भरला होता. यावर्षी खिलाडी कुमारने यंदा २९.५ कोटी रुपयांचा कर देऊ केला.

 • अभिनेता हृतिक रोशनने २५.५ कोटी रुपयांचा कर भरल्या. गेल्या वर्षी त्याने १४ कोटी एवढा कर भरला होता.

  अभिनेता हृतिक रोशनने २५.५ कोटी रुपयांचा कर भरल्या. गेल्या वर्षी त्याने १४ कोटी एवढा कर भरला होता.

 • सुनील ग्रोव्हर वादामुळे चर्चेत आलेल्या कपिल शर्मा आगाऊ कर भरण्याच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. कपिलने तब्बल २३.९ कोटी रुपयांचा कर भरला. गेल्या वर्षी त्याने ७ कोटी रुपयांपर्यंत कर भरला होता.

  सुनील ग्रोव्हर वादामुळे चर्चेत आलेल्या कपिल शर्मा आगाऊ कर भरण्याच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. कपिलने तब्बल २३.९ कोटी रुपयांचा कर भरला. गेल्या वर्षी त्याने ७ कोटी रुपयांपर्यंत कर भरला होता.

 • संजय दत्तच्या बायोपिकमध्ये संजयची भूमिका साकारणाऱ्या रणबीर कपूरने १६.५ कोटी रुपयांचा कर भरला आहे. रणबीरने गेल्या वर्षी ९.६ कोटी रुपयांचा कर भरला होता.

  संजय दत्तच्या बायोपिकमध्ये संजयची भूमिका साकारणाऱ्या रणबीर कपूरने १६.५ कोटी रुपयांचा कर भरला आहे. रणबीरने गेल्या वर्षी ९.६ कोटी रुपयांचा कर भरला होता.

 • आमिर खानने 'दंगल' या ब्लॉकबस्टर सिनेमाने वर्षाची सुरुवात केली. आमिरने यावर्षी १४.८ कोटी रुपयांचा कर भरला. गेल्यावर्षी आमिरने ९.६ कोटी रुपयांचा कर भरला होता.

  आमिर खानने 'दंगल' या ब्लॉकबस्टर सिनेमाने वर्षाची सुरुवात केली. आमिरने यावर्षी १४.८ कोटी रुपयांचा कर भरला. गेल्यावर्षी आमिरने ९.६ कोटी रुपयांचा कर भरला होता.

 • दिग्दर्शक करण जोहरनेही यावर्षी दुप्पट कर भरला आहे. करणने ११.७ कोटी रुपयांचा कर भरला. गेल्यावर्षी त्याने २ कोटी रुपयांचा कर भरला होता.

  दिग्दर्शक करण जोहरनेही यावर्षी दुप्पट कर भरला आहे. करणने ११.७ कोटी रुपयांचा कर भरला. गेल्यावर्षी त्याने २ कोटी रुपयांचा कर भरला होता.

 • हॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा दबदबा बनवणाऱ्या दीपिकाने यावर्षी १०.२५ कोटी रुपयांचा कर भरला. गेल्या वर्षी तिने ९ कोटी रुपयांचा कर भरला होता.

  हॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा दबदबा बनवणाऱ्या दीपिकाने यावर्षी १०.२५ कोटी रुपयांचा कर भरला. गेल्या वर्षी तिने ९ कोटी रुपयांचा कर भरला होता.

 • 'डिअर जिंदगी', 'उडता पंजाब' या सिनेमांमध्ये हरहुन्नरी अभिनय करणाऱ्या आलिया भट्टने ४.३३ कोटी रुपयांचा कर भरला. आलियाने गेल्यावर्षी २.९ कोटी रुपयांचा कर भरला होता.

  'डिअर जिंदगी', 'उडता पंजाब' या सिनेमांमध्ये हरहुन्नरी अभिनय करणाऱ्या आलिया भट्टने ४.३३ कोटी रुपयांचा कर भरला. आलियाने गेल्यावर्षी २.९ कोटी रुपयांचा कर भरला होता.

 • करीना कपूर खानने यावर्षी ३.९ कोटी रुपयांचा कर भर. गेल्यावर्षी तिने सुमारे ७ कोटी रुपयांचा कर भरला होता.

  करीना कपूर खानने यावर्षी ३.९ कोटी रुपयांचा कर भर. गेल्यावर्षी तिने सुमारे ७ कोटी रुपयांचा कर भरला होता.

अन्य फोटो गॅलरी