23 October 2017

News Flash

‘गुढी प्रेमाची’

 • अनेकदा आपण आयुष्यात अश्या काही लोकांना भेटतो ज्यांच्याशी आधी कधीही संबंध आलेला नसतो. एखादी नवी व्यक्ती आपल्याला सुरुवातीला आवडत नाही, पण हळू हळू ती व्यक्ती कधी आपलीशी होते हे कळतंच नाही. आणि जेव्हा वेगळं व्हायची वेळ येते तेव्हा मात्र मनाला एक वेगळीच हुरहूर लागून जाते आणि एकमेकांच्या नकळत प्रेमाची गुढी उभी राहते. प्रेम हे ची या सोमवारी येणारी नवीन गोष्ट 'गुढी प्रेमाची' ही गोष्ट आहे पेइंग गेस्ट असलेल्या दोन व्यक्तींची.. अमृता आणि स्वप्नीलची..

  अनेकदा आपण आयुष्यात अश्या काही लोकांना भेटतो ज्यांच्याशी आधी कधीही संबंध आलेला नसतो. एखादी नवी व्यक्ती आपल्याला सुरुवातीला आवडत नाही, पण हळू हळू ती व्यक्ती कधी आपलीशी होते हे कळतंच नाही. आणि जेव्हा वेगळं व्हायची वेळ येते तेव्हा मात्र मनाला एक वेगळीच हुरहूर लागून जाते आणि एकमेकांच्या नकळत प्रेमाची गुढी उभी राहते. प्रेम हे ची या सोमवारी येणारी नवीन गोष्ट 'गुढी प्रेमाची' ही गोष्ट आहे पेइंग गेस्ट असलेल्या दोन व्यक्तींची.. अमृता आणि स्वप्नीलची..

 • इच्छा नसतानाही एकेमकांबरोबर एक रूम शेअर करत असताना कधी ते एकमेकांच्या प्रेमात पडतात त्यांनाच कळत नाही. गुढी पाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मोटे यांच्या अदाकारीने परिपूर्ण असलेली एक सुंदर निरागस प्रेमकथा झी युवावर पाहायला मिळेल.

  इच्छा नसतानाही एकेमकांबरोबर एक रूम शेअर करत असताना कधी ते एकमेकांच्या प्रेमात पडतात त्यांनाच कळत नाही. गुढी पाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मोटे यांच्या अदाकारीने परिपूर्ण असलेली एक सुंदर निरागस प्रेमकथा झी युवावर पाहायला मिळेल.

 • स्वप्नील हा एका श्रीमंत घरातील मुलगा , पण बिझिनेस मुळे वडिलांना त्याच्याकडे लक्ष देता आले नाही. लहानपणापासून तारुण्यापर्यंत अख्खा प्रवास एकट्याने केल्यामुळे त्याला आयुष्यात कोणाचीही साथ नको असते.

  स्वप्नील हा एका श्रीमंत घरातील मुलगा , पण बिझिनेस मुळे वडिलांना त्याच्याकडे लक्ष देता आले नाही. लहानपणापासून तारुण्यापर्यंत अख्खा प्रवास एकट्याने केल्यामुळे त्याला आयुष्यात कोणाचीही साथ नको असते.

 • स्वप्नील वडिलांपासून वेगळं राहण्यासाठी मुंबईत येतो आणि त्याला एका कंपनीत सेल्समनची नोकरी मिळते. पण तरीही स्वप्नीलच स्वतःचा मोठा बिझिनेस उघडायचं स्वप्न मनाशी असतं. तर अमृता सुद्धा तिचं आधीच प्रेम विसरण्यासाठी आणि स्वतःची डान्स अकादमी उघडण्याच्या उद्देशाने मुंबईला आलेली असते.

  स्वप्नील वडिलांपासून वेगळं राहण्यासाठी मुंबईत येतो आणि त्याला एका कंपनीत सेल्समनची नोकरी मिळते. पण तरीही स्वप्नीलच स्वतःचा मोठा बिझिनेस उघडायचं स्वप्न मनाशी असतं. तर अमृता सुद्धा तिचं आधीच प्रेम विसरण्यासाठी आणि स्वतःची डान्स अकादमी उघडण्याच्या उद्देशाने मुंबईला आलेली असते.

 • स्वप्नील आणि अमृताच्या गोष्टीला सुरुवात होते ती प्रॉपर्टी एजंटच्या घोळामुळे. प्रॉपर्टी एजंट या दोघांना एकच घर दाखवतो. पर्याय नसल्यामुळे दोघही एकाच घरात राहण्यास सुरुवात करतात. सर्वांपासून अलिप्त होऊन एकटे राहणाच्या विचाराने आलेले हे दोघंही आता इच्छा नसतानाही एकत्र राहतात.

  स्वप्नील आणि अमृताच्या गोष्टीला सुरुवात होते ती प्रॉपर्टी एजंटच्या घोळामुळे. प्रॉपर्टी एजंट या दोघांना एकच घर दाखवतो. पर्याय नसल्यामुळे दोघही एकाच घरात राहण्यास सुरुवात करतात. सर्वांपासून अलिप्त होऊन एकटे राहणाच्या विचाराने आलेले हे दोघंही आता इच्छा नसतानाही एकत्र राहतात.

 • सुरुवातीपासूनच दोघांमध्ये तु तू मै मै सुरु होते. आता एक मुलगा आणि मुलगी एकाच रूममध्ये कसे राहतात? त्यांच्यात नक्की काय काय होते? रूम शेअर करता करता नंतर ते आयुष्य सुद्धा शेअर करतात का की काहीतरी वेगळंच होते ? हे सर्व झी युवावरील प्रेम हे या मालिकेतील 'गुढी प्रेमाची' या कथेत पाहायला मिळेल.

  सुरुवातीपासूनच दोघांमध्ये तु तू मै मै सुरु होते. आता एक मुलगा आणि मुलगी एकाच रूममध्ये कसे राहतात? त्यांच्यात नक्की काय काय होते? रूम शेअर करता करता नंतर ते आयुष्य सुद्धा शेअर करतात का की काहीतरी वेगळंच होते ? हे सर्व झी युवावरील प्रेम हे या मालिकेतील 'गुढी प्रेमाची' या कथेत पाहायला मिळेल.

अन्य फोटो गॅलरी