23 October 2017

News Flash

Gudhi Padwa 2017 : राणा-अंजली, गुरु-राधिका उभारणार आनंदाची गुढी

 • Gudhi Padwa 2017 : राणा-अंजली, गुरु-राधिका उभारणार आनंदाची गुढी

  Gudhi Padwa 2017 : राणा-अंजली, गुरु-राधिका उभारणार आनंदाची गुढी

 • तुझ्यात जीव रंगलामधील राणादा आणि अंजलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या दोघांचं नुकतंच लग्न झालं परंतु लग्नानंतर राणाने आपल्या संसाराची सुरुवात शेतातील घरात करण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्याच्या या निर्णयामागे वहिनीचं कारस्थान होतं ज्याला राणा बळी पडला होता.

  तुझ्यात जीव रंगलामधील राणादा आणि अंजलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या दोघांचं नुकतंच लग्न झालं परंतु लग्नानंतर राणाने आपल्या संसाराची सुरुवात शेतातील घरात करण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्याच्या या निर्णयामागे वहिनीचं कारस्थान होतं ज्याला राणा बळी पडला होता.

 • राणाने थोरल्या सुनबाईसह घरी परतावं यासाठी राणाचे आबा प्रतापराव आणि गोदाक्का दोघेही विविध प्रकारे प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नाला आता यश येणार असून राणा आणि अंजली गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरी परतणार आहेत.

  राणाने थोरल्या सुनबाईसह घरी परतावं यासाठी राणाचे आबा प्रतापराव आणि गोदाक्का दोघेही विविध प्रकारे प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नाला आता यश येणार असून राणा आणि अंजली गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरी परतणार आहेत.

 • माझ्या नव-याची बायको ही मालिकाही आता रंजक वळणावर आली आहे. शनायाला शह देण्यासाठी आणि गुरुनाथला परत मिळवण्यासाठी राधिका कसोशीने प्रयत्न करतेय आणि त्यात तिला यशही मिळत आहे.

  माझ्या नव-याची बायको ही मालिकाही आता रंजक वळणावर आली आहे. शनायाला शह देण्यासाठी आणि गुरुनाथला परत मिळवण्यासाठी राधिका कसोशीने प्रयत्न करतेय आणि त्यात तिला यशही मिळत आहे.

 • कोणताही सण किंवा समारंभ असो तो कुटुंबासमवेत साजरा करणे हा राधिकाचा स्वभाव. जरी शनाया राधिकाच्या हक्काच्या घरात ठाण मांडून बसली असली तरी हा गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे आपल्याच घरात साजरा करणार असा निर्णय राधिका घेते.

  कोणताही सण किंवा समारंभ असो तो कुटुंबासमवेत साजरा करणे हा राधिकाचा स्वभाव. जरी शनाया राधिकाच्या हक्काच्या घरात ठाण मांडून बसली असली तरी हा गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे आपल्याच घरात साजरा करणार असा निर्णय राधिका घेते.

 • गुढीपाडव्याच्या दिवशी छान सजून राधिका घरी पोचते आणि गुरुनाथलाही यासाठी तयार करते.

  गुढीपाडव्याच्या दिवशी छान सजून राधिका घरी पोचते आणि गुरुनाथलाही यासाठी तयार करते.

 • नेहमीप्रमाणे यावेळी शनाया राधिकाला विरोध करते. परंतु राधिका तिच्याकडे दुर्लक्ष करत गुरुसोबत ही गुढी उभारते.

  नेहमीप्रमाणे यावेळी शनाया राधिकाला विरोध करते. परंतु राधिका तिच्याकडे दुर्लक्ष करत गुरुसोबत ही गुढी उभारते.

 • महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न बघणा-या आमिर खानने पानी फाउंडेशनच्या माध्यमातून या स्वप्नाच्या दृष्टीने एक आश्वासक पाऊल टाकलं आहे. त्याच्या या कामाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी आणि या चळवळीत लोकसहभाग वाढावा यासाठी आमिर आपल्या टीमच्या सदस्यांसह चला हवा येऊ द्या मध्ये सहभागी झाला होता. याच कार्यक्रमात आमिरने आपली पत्नी किरण रावसह मराठमोळी गुढीही उभारली.

  महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न बघणा-या आमिर खानने पानी फाउंडेशनच्या माध्यमातून या स्वप्नाच्या दृष्टीने एक आश्वासक पाऊल टाकलं आहे. त्याच्या या कामाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी आणि या चळवळीत लोकसहभाग वाढावा यासाठी आमिर आपल्या टीमच्या सदस्यांसह चला हवा येऊ द्या मध्ये सहभागी झाला होता. याच कार्यक्रमात आमिरने आपली पत्नी किरण रावसह मराठमोळी गुढीही उभारली.

अन्य फोटो गॅलरी