23 October 2017

News Flash

‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर ‘मस्त मस्त गर्ल’ रविना टंडन

 • आपल्या अभिनयाने आणि नृत्याच्या अदाकारीने चित्रपट रसिकांची मने जिंकणारी बॉलिवूडची मस्त गर्ल अशी ओळख असणारी रविना टंडन आता हिंदी चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे. तिचा ‘मातृ’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.

  आपल्या अभिनयाने आणि नृत्याच्या अदाकारीने चित्रपट रसिकांची मने जिंकणारी बॉलिवूडची मस्त गर्ल अशी ओळख असणारी रविना टंडन आता हिंदी चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे. तिचा ‘मातृ’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.

 • ‘मातृ’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रविनाने ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर हजेरी लावली . येत्या मंगळवारी १८ एप्रिलला रात्री ९.३० वा. हा भाग प्रसारित होणार आहे. तर सोमवारच्या भागात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ मालिकेतील कलाकार सहभागी होणार आहेत.

  ‘मातृ’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रविनाने ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर हजेरी लावली . येत्या मंगळवारी १८ एप्रिलला रात्री ९.३० वा. हा भाग प्रसारित होणार आहे. तर सोमवारच्या भागात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ मालिकेतील कलाकार सहभागी होणार आहेत.

 • ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर आजवर अनेक सुप्रसिद्ध बॉलिवुड मंडळींनी हजेरी लावली आणि याच मंचावर आता मस्त मस्त गर्ल रविनासुद्धा येणार आहे. अतिशय संवेदनशील अशा विषयावर आधारित ‘मातृ’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रविनाने थुकरटवाडीची वाट धरली असून यावेळी तिच्यासोबत या चित्रपटात काम केलेली मराठमोळी अभिनेत्री दिव्या जगदाळेसुद्धा उपस्थित राहणार आहे

  ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर आजवर अनेक सुप्रसिद्ध बॉलिवुड मंडळींनी हजेरी लावली आणि याच मंचावर आता मस्त मस्त गर्ल रविनासुद्धा येणार आहे. अतिशय संवेदनशील अशा विषयावर आधारित ‘मातृ’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रविनाने थुकरटवाडीची वाट धरली असून यावेळी तिच्यासोबत या चित्रपटात काम केलेली मराठमोळी अभिनेत्री दिव्या जगदाळेसुद्धा उपस्थित राहणार आहे

 • यावेळी रविनासोबत थुकरटवाडीच्या मंडळींनी एकच धम्माल उडवून दिली आणि या सर्वाला तिने खळखळून दादही दिली. त्याचसोबत रविनाने कुशल बद्रिके आणि भाऊ कदमसह काही गा्ण्यांवर नृत्याचा ठेकाही धरला. तर पोस्टमन काका बनून आलेल्या सागर कारंडेच्या पत्राने तिच्या डोळ्याच्या कडाही ओल्या झाल्या.

  यावेळी रविनासोबत थुकरटवाडीच्या मंडळींनी एकच धम्माल उडवून दिली आणि या सर्वाला तिने खळखळून दादही दिली. त्याचसोबत रविनाने कुशल बद्रिके आणि भाऊ कदमसह काही गा्ण्यांवर नृत्याचा ठेकाही धरला. तर पोस्टमन काका बनून आलेल्या सागर कारंडेच्या पत्राने तिच्या डोळ्याच्या कडाही ओल्या झाल्या.

 • चला हवा येऊद्या च्या सोमवारच्या भागात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका चूकभूल द्यावी घ्यावी मालिकेची टीम हजर राहणार आहे.

  चला हवा येऊद्या च्या सोमवारच्या भागात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका चूकभूल द्यावी घ्यावी मालिकेची टीम हजर राहणार आहे.

 • दिलीप प्रभावळकर, नयना आपटे, सुकन्या कुलकर्णी मोने, प्रियदर्शन जाधव, सायली फाटक मालिकेच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी, निर्माती मनवा नाईक आणि दिग्दर्शक स्वप्ननील जयकर आदींचा समावेश असेल.

  दिलीप प्रभावळकर, नयना आपटे, सुकन्या कुलकर्णी मोने, प्रियदर्शन जाधव, सायली फाटक मालिकेच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी, निर्माती मनवा नाईक आणि दिग्दर्शक स्वप्ननील जयकर आदींचा समावेश असेल.

 • अतरंगी कलाकारांबरोबर थुकरटवाडीच्या मंडळींनी धम्माल केली.

  अतरंगी कलाकारांबरोबर थुकरटवाडीच्या मंडळींनी धम्माल केली.

 • अतरंगी कलाकारांबरोबर थुकरटवाडीच्या मंडळींनी धम्माल केली.

  अतरंगी कलाकारांबरोबर थुकरटवाडीच्या मंडळींनी धम्माल केली.

अन्य फोटो गॅलरी