24 October 2017

News Flash

जाणून घ्या ‘चला हवा येऊ द्या’मधील विनोदवीरांचे मानधन

  • 'काय मंडळी हसताय ना.... हसायलाच पाहिजे' म्हणत 'चला हवा येऊ द्या'मधील विनोदवीरांनी अवघ्या महाराष्ट्राला आपल्या विनोदांनी खळखळून हसायला भाग पाडले. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. या कार्यक्रमामध्ये कधी कधी भारत गणेशपुरे हे कुशल बद्रिकेला मिश्किलपणे म्हणतात, 'ओव्हरअॅक्टिंग करु नकोस. जेवढा पर डे आहे तेवढाच अभिनय कर.' पण या कलाकारांना खरोखर किती पगार मिळत असेल याचा आपण कधी विचार केलाय का? चला तर आज आपण जाणून घेऊया थुकरटवाडीतील कलाकारांचे मानधन. विविध वेबसाईट्स आणि यूट्यूब चॅनेल्सवर या कलाकारांच्या मानधनाची माहिती दिसते आहे.

    'काय मंडळी हसताय ना.... हसायलाच पाहिजे' म्हणत 'चला हवा येऊ द्या'मधील विनोदवीरांनी अवघ्या महाराष्ट्राला आपल्या विनोदांनी खळखळून हसायला भाग पाडले. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. या कार्यक्रमामध्ये कधी कधी भारत गणेशपुरे हे कुशल बद्रिकेला मिश्किलपणे म्हणतात, 'ओव्हरअॅक्टिंग करु नकोस. जेवढा पर डे आहे तेवढाच अभिनय कर.' पण या कलाकारांना खरोखर किती पगार मिळत असेल याचा आपण कधी विचार केलाय का? चला तर आज आपण जाणून घेऊया थुकरटवाडीतील कलाकारांचे मानधन. विविध वेबसाईट्स आणि यूट्यूब चॅनेल्सवर या कलाकारांच्या मानधनाची माहिती दिसते आहे.

  • 'चला हवा येऊ द्या'चा लेखक, दिग्दर्शक आणि निवेदक असणारा निलेश साबळे अंदाजे सव्वा लाख रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.

    'चला हवा येऊ द्या'चा लेखक, दिग्दर्शक आणि निवेदक असणारा निलेश साबळे अंदाजे सव्वा लाख रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.

  • पत्र घेऊन येणारे पोस्टमन काका म्हणजे सागर कारंडे अंदाजे ७० हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.

    पत्र घेऊन येणारे पोस्टमन काका म्हणजे सागर कारंडे अंदाजे ७० हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.

  • भाऊशिवाय 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम पूर्ण होणं अशक्य आहे. सर्वांचा लाडका असलेला हा अभिनेता जवळपास अंदाजे ८० हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.

    भाऊशिवाय 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम पूर्ण होणं अशक्य आहे. सर्वांचा लाडका असलेला हा अभिनेता जवळपास अंदाजे ८० हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.

  • विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे अंदाजे ७५ हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.

    विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे अंदाजे ७५ हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.

  • कोणत्याही भूमिका लिलया साकारणारा अभिनेता कुशल बद्रीके अंदाजे ७५ हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.

    कोणत्याही भूमिका लिलया साकारणारा अभिनेता कुशल बद्रीके अंदाजे ७५ हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.

  • चुलबुली अभिनेत्री श्रेया बुगडे अंदाजे ८० हजार रुपये मानधन घेते, अशी माहिती मिळते आहे.

    चुलबुली अभिनेत्री श्रेया बुगडे अंदाजे ८० हजार रुपये मानधन घेते, अशी माहिती मिळते आहे.

  • आपल्या ढोलकीच्या तालावर सर्वांना नाचवणारा ढोलकीवादक तुषार देवल अंदाजे ६५ हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे. दरम्यान, या मानधनाला कोणताही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

    आपल्या ढोलकीच्या तालावर सर्वांना नाचवणारा ढोलकीवादक तुषार देवल अंदाजे ६५ हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे. दरम्यान, या मानधनाला कोणताही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

अन्य फोटो गॅलरी