24 October 2017

News Flash

आयुषमान- क्रिती झाले ‘बिनबुलाये बाराती’

 • चित्रपट प्रमोशनसाठी हॉटेल, कॅफे शॉप, किंवा सोशल मिडीयाचा वापर नेहमीच होत असतो. पण 'बरेली की बर्फी' या चित्रपटातील कलाकारांनी सर्व सीमा ओलांडत चक्क एका लग्नात चित्रपटाचे प्रमोशन केले.

  चित्रपट प्रमोशनसाठी हॉटेल, कॅफे शॉप, किंवा सोशल मिडीयाचा वापर नेहमीच होत असतो. पण 'बरेली की बर्फी' या चित्रपटातील कलाकारांनी सर्व सीमा ओलांडत चक्क एका लग्नात चित्रपटाचे प्रमोशन केले.

 • या चित्रपटातील प्रमुख भुमिकेतील अभिनेत्री क्रिती सनॉन व आयुषमान खुराना यांनी चक्क एका लग्नात जाऊन नवविवाहीत जोडप्याला आश्चर्याचा धक्का दिला.

  या चित्रपटातील प्रमुख भुमिकेतील अभिनेत्री क्रिती सनॉन व आयुषमान खुराना यांनी चक्क एका लग्नात जाऊन नवविवाहीत जोडप्याला आश्चर्याचा धक्का दिला.

 • बॉलिवूडच्या या खास पाहुण्यांनी एवढ्यावरच न थांबता या चित्रपटातील 'स्वीटी तेरा ड्रामा' या गाण्यावर ठेकाही धरला.

  बॉलिवूडच्या या खास पाहुण्यांनी एवढ्यावरच न थांबता या चित्रपटातील 'स्वीटी तेरा ड्रामा' या गाण्यावर ठेकाही धरला.

 • यासंबंधी एका रेडिओ चॅनलला दिलेल्या मुलाखती क्रिती म्हणाली, 'त्या लग्नाला जाण्यापूर्वी मला खरच खुप भिती वाटत होती. कारण मी या आधी कधीच असे केले नव्हते, आम्हाला बघून लोक आश्चर्यचकित न होता आनंदीत व्हावेत... इतकीच माझी अपेक्षा होती.'

  यासंबंधी एका रेडिओ चॅनलला दिलेल्या मुलाखती क्रिती म्हणाली, 'त्या लग्नाला जाण्यापूर्वी मला खरच खुप भिती वाटत होती. कारण मी या आधी कधीच असे केले नव्हते, आम्हाला बघून लोक आश्चर्यचकित न होता आनंदीत व्हावेत... इतकीच माझी अपेक्षा होती.'

 • या बाबतीत आयुषमानचा अनुभव बराच वेगळा होता. याविषयी सांगताना तो म्हणाला, 'मला माझ्या बालपणीचे दिवस आठवतात, लहान असताना मी बऱ्याच लग्नसभारंभांना जायचो, किंबहुना मला तिकडे जायला खूप आवडायचे. आता तर आम्ही फक्त तिथे माणसांची भेट घेण्यासाठी जात आहोत इतकाच काय तो फरक आहे.'

  या बाबतीत आयुषमानचा अनुभव बराच वेगळा होता. याविषयी सांगताना तो म्हणाला, 'मला माझ्या बालपणीचे दिवस आठवतात, लहान असताना मी बऱ्याच लग्नसभारंभांना जायचो, किंबहुना मला तिकडे जायला खूप आवडायचे. आता तर आम्ही फक्त तिथे माणसांची भेट घेण्यासाठी जात आहोत इतकाच काय तो फरक आहे.'

 • चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने का असेना पण, या दोन्ही कलाकारांनी एकच कल्ला केल्याचं त्यांचे फोटो पाहून लक्षात येत आहे.

  चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने का असेना पण, या दोन्ही कलाकारांनी एकच कल्ला केल्याचं त्यांचे फोटो पाहून लक्षात येत आहे.

 • यामध्ये दोघेही पारंपारिक वेशात दिसत आहेत. यात आयुषमानने शेरवानी तर क्रिती सनॉनने गुलाबी रंगाचा लेहंगा घातल्याचं दिसतंय.

  यामध्ये दोघेही पारंपारिक वेशात दिसत आहेत. यात आयुषमानने शेरवानी तर क्रिती सनॉनने गुलाबी रंगाचा लेहंगा घातल्याचं दिसतंय.

 • या सर्व धामधुमीनंतर तर क्रितीने ट्वीट करत हा संपूर्ण अनुभव शेअर केला. 'मी तरुण असताना असेही कधीच केले नव्हते, पण आज मला हे करताना खरच खूप मजा आली.'

  या सर्व धामधुमीनंतर तर क्रितीने ट्वीट करत हा संपूर्ण अनुभव शेअर केला. 'मी तरुण असताना असेही कधीच केले नव्हते, पण आज मला हे करताना खरच खूप मजा आली.'

 • हटके पद्धतीने प्रमोशन करण्यात येत असलेला आणि अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित 'बरेली की बर्फी' हा चित्रपट १८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  हटके पद्धतीने प्रमोशन करण्यात येत असलेला आणि अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित 'बरेली की बर्फी' हा चित्रपट १८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 • चित्रपटातील गाण्यावर ठेका धरताना क्रिती सनॉन आणि आयुषमान खुराना.

  चित्रपटातील गाण्यावर ठेका धरताना क्रिती सनॉन आणि आयुषमान खुराना.

अन्य फोटो गॅलरी