24 October 2017

News Flash

तिकीटबारीवर धडकणार ‘हे’ तगडे चित्रपट

 • बॉलिवूडमध्ये विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कलाकार नेहमीच सज्ज असतातच. त्यातही २०१७ हे वर्ष सिनेरसिकांसाठी खऱ्या अर्थाने निखळ मनोरंजनाचं ठरणार आहे. 'रईस', 'बाहुबली २' या चित्रपटांनी प्रेक्षकांना पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे वळायला भाग पाडलं. येत्या काही महिन्यांमध्ये 'बरेली की बर्फी', 'भूमी', 'सिक्रेट सुपरस्टार', 'परमाणू...' हे चित्रपट तिकीटबारीवर धडकणार आहेत. त्यामुळे कलाकारांचं अभिनय कौशल्य आणि प्रेक्षकांवर असलेली त्यांची पकडही पणाला लागली आहे असं म्हणायला हरकत नाही.

  बॉलिवूडमध्ये विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कलाकार नेहमीच सज्ज असतातच. त्यातही २०१७ हे वर्ष सिनेरसिकांसाठी खऱ्या अर्थाने निखळ मनोरंजनाचं ठरणार आहे. 'रईस', 'बाहुबली २' या चित्रपटांनी प्रेक्षकांना पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे वळायला भाग पाडलं. येत्या काही महिन्यांमध्ये 'बरेली की बर्फी', 'भूमी', 'सिक्रेट सुपरस्टार', 'परमाणू...' हे चित्रपट तिकीटबारीवर धडकणार आहेत. त्यामुळे कलाकारांचं अभिनय कौशल्य आणि प्रेक्षकांवर असलेली त्यांची पकडही पणाला लागली आहे असं म्हणायला हरकत नाही.

 • देशाच्या छोट्या भागात राहणाऱ्या तरुणाईची प्रेमकथी अनुभवण्याची संधी 'बरेली की बर्फी' या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे. १८ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात आयुषमान खुराना, क्रिती सनॉन आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका आहेत.

  देशाच्या छोट्या भागात राहणाऱ्या तरुणाईची प्रेमकथी अनुभवण्याची संधी 'बरेली की बर्फी' या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे. १८ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात आयुषमान खुराना, क्रिती सनॉन आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका आहेत.

 • सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस यांची अनोखी केमिस्ट्री पाहण्याची संधी 'ए जंटलमन' या चित्रपटातून मिळणार आहे. राज आणि डीके दिग्दर्शित हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

  सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस यांची अनोखी केमिस्ट्री पाहण्याची संधी 'ए जंटलमन' या चित्रपटातून मिळणार आहे. राज आणि डीके दिग्दर्शित हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

 • 'बाबुमोशाय बंदूकबाज' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटातून नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाची आणखी एक बाजू पाहायला मिळणार आहे.

  'बाबुमोशाय बंदूकबाज' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटातून नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाची आणखी एक बाजू पाहायला मिळणार आहे.

 • भूमी पेडणेकर आणि आयुषमान खुराना पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत ते म्हणजे आगामी शुभ मंगल सावधान या चित्रपटातून. १ सप्टेंबरला त्यांची ही देसी लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  भूमी पेडणेकर आणि आयुषमान खुराना पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत ते म्हणजे आगामी शुभ मंगल सावधान या चित्रपटातून. १ सप्टेंबरला त्यांची ही देसी लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 • २२ सप्टेंबरला अभिनेता संजय दत्त 'भूमी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  २२ सप्टेंबरला अभिनेता संजय दत्त 'भूमी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 • यंदाच्या दिवाळीमध्ये अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, त्याच्या आगामी 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटात 'दंगल गर्ल' झायरा वसिम मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

  यंदाच्या दिवाळीमध्ये अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, त्याच्या आगामी 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटात 'दंगल गर्ल' झायरा वसिम मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

 • या वर्षअखेरीस अभिनेता जॉन अब्राहम 'परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  या वर्षअखेरीस अभिनेता जॉन अब्राहम 'परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अन्य फोटो गॅलरी