24 October 2017

News Flash

राज ठाकरे यांच्या हस्ते ‘ये रे ये रे पैसा’ चा मुहूर्त

 • संजय जाधवचे दिग्दर्शन असणाऱ्या बहुचर्चित ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त समारंभ मुंबईत पार पडला. सोबतच चित्रपटातील कलाकारांच्या नावावरूनही पडदा उचलण्यात आला.

  संजय जाधवचे दिग्दर्शन असणाऱ्या बहुचर्चित ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त समारंभ मुंबईत पार पडला. सोबतच चित्रपटातील कलाकारांच्या नावावरूनही पडदा उचलण्यात आला.

 • संजय जाधव गँगमधील हे कलाकार नसून यावेळी एक वेगळी स्टारकास्ट संजय जाधव प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. 

  संजय जाधव गँगमधील हे कलाकार नसून यावेळी एक वेगळी स्टारकास्ट संजय जाधव प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. 

 • ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटात सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, मृणाल कुलकर्णी, आनंद इंगळे, विशाखा सुभेदार, असे अनेक नामवंत कलाकार आपल्याला पाहायला मिळतील.

  ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटात सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, मृणाल कुलकर्णी, आनंद इंगळे, विशाखा सुभेदार, असे अनेक नामवंत कलाकार आपल्याला पाहायला मिळतील.

 • मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांची उपस्थिती मुहूर्ताला लाभली. 

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांची उपस्थिती मुहूर्ताला लाभली. 

 • चित्रपटाचा विषय हा वास्तवात असलेल्या सगळ्या विषयांपेक्षा वेगळा आहे म्हणजेच कॉमेडी, लव्ह स्टोरी, थ्रिलर या विषयांमध्ये मर्यदित नसून नवीन परिभाषा असेलेला असेल. 

  चित्रपटाचा विषय हा वास्तवात असलेल्या सगळ्या विषयांपेक्षा वेगळा आहे म्हणजेच कॉमेडी, लव्ह स्टोरी, थ्रिलर या विषयांमध्ये मर्यदित नसून नवीन परिभाषा असेलेला असेल. 

 • 'ये रे ये रे पैसा’ चित्रपटाची एव्हीके फिल्म्स, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड आणि पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या बॅनरखाली निर्मिती, ओम प्रकाश भट, अमेय खोपकर आणि सुजय शंकरवार यांनी केली आहे. 

  'ये रे ये रे पैसा’ चित्रपटाची एव्हीके फिल्म्स, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड आणि पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या बॅनरखाली निर्मिती, ओम प्रकाश भट, अमेय खोपकर आणि सुजय शंकरवार यांनी केली आहे. 

 • ‘ये रे ये रे पैसा’ हा चित्रपट पुढील वर्षी ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  ‘ये रे ये रे पैसा’ हा चित्रपट पुढील वर्षी ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अन्य फोटो गॅलरी