24 October 2017

News Flash

मलाबार नौदल सराव

 • Chennai: Ships during the sea phase of tri-Nation Malabar 2017 Exercise comprising India, Japan and US navies, in Bay of Bengal near Chennai coast on Monday. PTI Photo (PTI7_17_2017_000279B)

  भारत, जपान आणि अमेरिका या तीन देशांच्या नौदलाच्या संयुक्त कवायतींना बंगालच्या उपसागरात कालपासून सुरूवात झाली. 'मलाबार नेव्हल एक्सरसाईज' या कवायतीमध्ये सहभागी झालेल्या युद्धनौकांचे दृश्य. (छाया-पीटीआय)

 • Chennai: Ships during the sea phase of tri-Nation Malabar 2017 Exercise comprising India, Japan and US navies, in Bay of Bengal near Chennai coast on Monday. PTI Photo (PTI7_17_2017_000289B)

  मलाबार नौदल कवायतींमध्ये तिन्ही देशांची ९५ विमाने, १६ युद्धनौका, दोन पाणबुड्या सहभागी झाल्या आहेत. सागरी क्षेत्रातील वाढत चाललेल्या चीनच्या दादागिरीला शह देण्याच्यादृष्टीने ही कवायत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. (छाया-पीटीआय)

 • Chennai: Planes in action during the sea phase of tri-Nation Malabar 2017 Exercise comprising India, Japan and US navies, in Bay of Bengal near Chennai coast on Monday. PTI Photo (PTI7_17_2017_000303B)

  या कवायतीमध्ये जगातील सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका म्हणून ओळखली जाणारी युएसएस निमित्झदेखील सहभागी झाली आहे. (छाया-पीटीआय)

 • Chennai: Indian Air Force's MIG-29K Fulcrum flies over US Navy ship Nimitz as part of the tri-nation Malabar 2017 exercise in Bay of Bengal near Chennai coast on Monday. PTI Photo (PTI7_17_2017_000264B)

  याशिवाय, जपानच्या स्वसंरक्षण दलाच्या जेएस आयझुमो, जेएस साझानामी या नौका कवायतींमध्ये सहभागी झाल्या आहेत.भारताकडून जलश्व आणि आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौका 'मलाबार नेव्हल एक्सरसाईज'मध्ये सहभागी झाल्या आहेत. (छाया-पीटीआय)

 • Malabar: Soldiers in action during sea phase of MALABAR-17, the muti-lateral naval exercise of Indian Navy, Japanese Maritime Self Defence Force and US Navy in the Bay of Bengal. PTI Photo  (PTI7_17_2017_000263B)

  या कवायतींध्ये तिन्ही देशांच्या नौदलांकडून एकमेकांना सागरी युद्धाभ्यासातील डावपेच शिकवले जातील. यामध्ये सागरी मोहीमा, सागरी गस्त तसेच जमिनी आणि सागरी युद्धाभ्यासातील बारकाव्यांचा समावेश असेल. (छाया-पीटीआय)

 • Chennai: Two woman sailors gesture "Namaste" in front of the media on-board USS Princeton which arrived at the Chennai Port Trust to take part in the India, Japan and United States joint "Malabar Naval Exercise-2017" which commenced in Chennai on Monday. PTI Photo R Senthil Kumar (PTI7_10_2017_000177A)

  युएसएस प्रिंसेटकॉन युद्धनौकेवरील महिला खलाशी अभिवादन करताना. (छाया-पीटीआय)

 • Chennai: An Indian Navy commandant maintaining strict vigil at US Ship HOWARD which has come to the Port Trust to take part in the India, Japan and United States joint "Malabar Naval Exercise-2017", that commenced in Chennai on Monday. PTI Photo R Senthil Kumar(PTI7_10_2017_000199A)

  'मलाबार नेव्हल एक्सरसाईज'मध्ये सहभागी झालेल्या अमेरिकन नौदलाच्या होवार्ड युद्धनौकेभोवती पहारा देणारा भारतीय नौदलातील जवान. (छाया-पीटीआय)

 • Indian naval ship INS Vikramaditya, foreground and Japan's helicopter carrier Izumo, behind participate in the Malabar 2017 tri-lateral exercises between India, Japan and US in the Bay of Bengal, Monday, July 17, 2017. (AP Photo/Rishi Lekhi)

  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन दौऱ्यापूर्वी जपानला नौदलाच्या सराव मोहीमेतून बाहेर ठेवण्याचा भारताचा विचार होता. पण काही दिवसांपूर्वी चीनने हिंदी महासागरातून पाकिस्तान पाणबुडी पाठवली. पण आभार मानन्या ऐवजी हिंदी महासागर हा भारताचा आहे असे समजू नये, असं वक्तव्य करत चीनने भारताला सुनावलं होतं. . (छाया-पीटीआय)

अन्य फोटो गॅलरी