23 October 2017

News Flash

… या प्रसिद्ध विदेशी क्रिकेटपटूंना भारतीय सौंदर्यवतींनी केले ‘क्लिनबोल्ड’

 • आपण आता भारताचेदेखील नागरिक झाल्याचे, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज शॉन टॅटने नुकतेच ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले. भारत सरकारकडून टॅटला 'ऑव्हरसिज सिटिझन ऑफ इंडिया'चा दर्जा प्राप्त झाला आहे. भारतीय मॉडेल माशूम सिंघा आणि शॉनचे २०१४ मध्ये लग्न केले. पतीसोबत अॅडलेडमध्ये राहात असलेल्या माशूमने सध्या मॉडेलिंगला रामराम केला आहे. आयपीएलच्या दहाव्या पर्वाच्या एका पोस्ट मॅच पार्टीत दोघांची भेट झाली आणि येथूनच त्यांच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला. प्रेमाचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पॅरिसमध्ये टॅटने माशूमला लग्नाची मागणी घातली आणि १२ जून २०१४ ला दोघं लग्नबंधनात अडकले. भारतीय सौंदर्यवतींच्या जादूने क्लिनबोल्ड झालेल्या अशाच काही क्रिकेटपटूंचा आढावा पुढच्या स्लाइडस् मधून घेऊ.

  आपण आता भारताचेदेखील नागरिक झाल्याचे, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज शॉन टॅटने नुकतेच ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले. भारत सरकारकडून टॅटला 'ऑव्हरसिज सिटिझन ऑफ इंडिया'चा दर्जा प्राप्त झाला आहे. भारतीय मॉडेल माशूम सिंघा आणि शॉनचे २०१४ मध्ये लग्न केले. पतीसोबत अॅडलेडमध्ये राहात असलेल्या माशूमने सध्या मॉडेलिंगला रामराम केला आहे. आयपीएलच्या दहाव्या पर्वाच्या एका पोस्ट मॅच पार्टीत दोघांची भेट झाली आणि येथूनच त्यांच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला. प्रेमाचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पॅरिसमध्ये टॅटने माशूमला लग्नाची मागणी घातली आणि १२ जून २०१४ ला दोघं लग्नबंधनात अडकले. भारतीय सौंदर्यवतींच्या जादूने क्लिनबोल्ड झालेल्या अशाच काही क्रिकेटपटूंचा आढावा पुढच्या स्लाइडस् मधून घेऊ.

 • शोएब मलिक आणि सानिया मिर्झा - अलिकडच्या काळात लग्नबंधनात अडकलेले स्टार खेळाडू म्हणजे पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा. सानिया आणि शोएबची लग्नवार्ता अद्यापदेखील त्यांच्या चाहत्यांच्या मनात घर करून आहे. पहिल्यांदा सानियाचा साखरपुडा तिचा बालपणीचा मित्र सोहराब मिर्झाशी झाला होता. परंतु, शोएब मलिकच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सानियाने सोहराबसोबतचा साखरपुडा २०१० मध्ये मोडून शोएबशी लग्न केले. त्यांच्या लग्नावेळी खूप हंगामा झाला होता. हैदराबादमधील आयेशा सिद्दीकीने शोएबसोबत आपला विवाह झाला असल्याचा दावा केला होता. प्रथम याचे खंडण करणाऱ्या शोएबच्या कुटुंबियांनी नंतर तलाख झाल्याचा पुरावा सादर केला.

  शोएब मलिक आणि सानिया मिर्झा - अलिकडच्या काळात लग्नबंधनात अडकलेले स्टार खेळाडू म्हणजे पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा. सानिया आणि शोएबची लग्नवार्ता अद्यापदेखील त्यांच्या चाहत्यांच्या मनात घर करून आहे. पहिल्यांदा सानियाचा साखरपुडा तिचा बालपणीचा मित्र सोहराब मिर्झाशी झाला होता. परंतु, शोएब मलिकच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सानियाने सोहराबसोबतचा साखरपुडा २०१० मध्ये मोडून शोएबशी लग्न केले. त्यांच्या लग्नावेळी खूप हंगामा झाला होता. हैदराबादमधील आयेशा सिद्दीकीने शोएबसोबत आपला विवाह झाला असल्याचा दावा केला होता. प्रथम याचे खंडण करणाऱ्या शोएबच्या कुटुंबियांनी नंतर तलाख झाल्याचा पुरावा सादर केला.

 • मोहसिन खान आणि रिना रॉय - नव्वदच्या दशकात पाकिस्तानी क्रिकेट संघातील सर्वात देखणा क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोहसिन खानने दोन्ही देशातील परस्परविरोधी संबंधांना मागे सारत अभिनेत्री रिना रॉयशी १९८३ मध्ये लग्न केले आणि ते मुंबईत आले. रिना रॉय तेव्हा बॉलिवूडच्या आघाडीच्या नायिकांपैकी एक होती. मोहसिन खाननेदेखील 'बंटवारा' आणि रेखासोबतच्या 'मॅडम एक्स'सारख्या जवळजवळ १३ चित्रपटांमधून अभिनय केला. रिना आणि मोहसिन यांची एक मुलगीसुद्धा आहे. मोहसिन आणि रिना फार काळ लग्नबंधनात टिकले नाही आणि दोघांचा तलाख झाला. नंतर मोहसिन पाकिस्तानात निघून गेला, तर रिना आपल्या मुलीसोबत भारतातच राहिली.

  मोहसिन खान आणि रिना रॉय - नव्वदच्या दशकात पाकिस्तानी क्रिकेट संघातील सर्वात देखणा क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोहसिन खानने दोन्ही देशातील परस्परविरोधी संबंधांना मागे सारत अभिनेत्री रिना रॉयशी १९८३ मध्ये लग्न केले आणि ते मुंबईत आले. रिना रॉय तेव्हा बॉलिवूडच्या आघाडीच्या नायिकांपैकी एक होती. मोहसिन खाननेदेखील 'बंटवारा' आणि रेखासोबतच्या 'मॅडम एक्स'सारख्या जवळजवळ १३ चित्रपटांमधून अभिनय केला. रिना आणि मोहसिन यांची एक मुलगीसुद्धा आहे. मोहसिन आणि रिना फार काळ लग्नबंधनात टिकले नाही आणि दोघांचा तलाख झाला. नंतर मोहसिन पाकिस्तानात निघून गेला, तर रिना आपल्या मुलीसोबत भारतातच राहिली.

 • ग्लेन टर्नर आणि सुखविंदर कौर गिल - न्यूझीलंडचा माजी कप्तान ग्लेन टर्नरने १९७३ मध्ये सुखविंदर कौर गिलशी लग्न केले. लग्नानंतर सुखविंदर काही काळासाठी राजकारणातदेखील सक्रिय होत्या. जवळजवळ एक दशकापर्यंत त्या ड्यूनेडिन शहराच्या मेयर होत्या. न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी ओपनर म्हणून ख्याती असलेले ग्लेन टर्नर पाहाताच क्षणी सुखविंदर कौर गिलच्या प्रेमात पडले होते. जुलै १९७३ मध्ये दोघांनी लग्न केले. सुखी टर्नर नावाने प्रसिद्ध असलेल्या सुखविंदर न्यूझीलंडमध्ये भारतीय समुदायाच्या मोठ्या नेते आहेत. ग्लेन आणि सुखविंदर दाम्पत्यास दोन मुलं आहेत.

  ग्लेन टर्नर आणि सुखविंदर कौर गिल - न्यूझीलंडचा माजी कप्तान ग्लेन टर्नरने १९७३ मध्ये सुखविंदर कौर गिलशी लग्न केले. लग्नानंतर सुखविंदर काही काळासाठी राजकारणातदेखील सक्रिय होत्या. जवळजवळ एक दशकापर्यंत त्या ड्यूनेडिन शहराच्या मेयर होत्या. न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी ओपनर म्हणून ख्याती असलेले ग्लेन टर्नर पाहाताच क्षणी सुखविंदर कौर गिलच्या प्रेमात पडले होते. जुलै १९७३ मध्ये दोघांनी लग्न केले. सुखी टर्नर नावाने प्रसिद्ध असलेल्या सुखविंदर न्यूझीलंडमध्ये भारतीय समुदायाच्या मोठ्या नेते आहेत. ग्लेन आणि सुखविंदर दाम्पत्यास दोन मुलं आहेत.

 • मुथैया मुरलीधरन आणि माधिमलार राममूर्ती - कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा श्रीलंकेचा प्रसिद्ध स्पिनर मुथैया मुरलीधरनने चैन्नईच्या माधिमलार राममूर्तीशी २१ मार्च २००५ रोजी लग्न केले. तामिळ कुटुंबातील मुरलीधरन २००६ मध्ये पिता झाला. माधिमलार ही चेन्नईतील मलार हॉस्पिटल ग्रुपचे मालक डॉ. एस. रामामूर्ती आणि डॉ. नित्या रामामूर्ती यांची कन्या आहे. मुरलीधरन आणि माधिमलार श्रीलंकेत राहत असून, त्यांना एक मुलगा आहे.

  मुथैया मुरलीधरन आणि माधिमलार राममूर्ती - कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा श्रीलंकेचा प्रसिद्ध स्पिनर मुथैया मुरलीधरनने चैन्नईच्या माधिमलार राममूर्तीशी २१ मार्च २००५ रोजी लग्न केले. तामिळ कुटुंबातील मुरलीधरन २००६ मध्ये पिता झाला. माधिमलार ही चेन्नईतील मलार हॉस्पिटल ग्रुपचे मालक डॉ. एस. रामामूर्ती आणि डॉ. नित्या रामामूर्ती यांची कन्या आहे. मुरलीधरन आणि माधिमलार श्रीलंकेत राहत असून, त्यांना एक मुलगा आहे.

 • माइक ब्रेअरली आणि माना साराभाई - इंग्लंडचे माजी कप्तान माइक ब्रेअरली १९७६-७७ मध्ये जेव्हा भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांची माना साराभाईंशी भेट झाली. माना या प्रसिद्ध व्यावसायिक गौतम साराभाईंची कन्या आणि देशाच्या स्पेस प्रोग्रॅमचे जनक विक्रम साराभाईंच्या नात होय. इंग्लड क्रिकेट संघाच्या या कर्तबगार कर्णधाराचा मानावर जीव जडला. त्यांना काही करून मानाशी लग्न करायचे होते. यासाठी मानाच्या वडिलांनी ब्रेअरलीसमोर गुजराती भाषा आणि संस्कृती शकण्याची अट ठेवली. ब्रेअरलीदेखील हार मानण्यातले नव्हते. त्याकाळचे प्रसिद्ध गुजराती कवी ध्रुव सरूप यांच्याकडे गुजराती भाषा शिकून ब्रेअरलींनी मानाला आपली जीवनसाथी बनवली. दोघे लंडनमध्ये वास्तव्यास असून, त्यांना देन मुलं आहेत.

  माइक ब्रेअरली आणि माना साराभाई - इंग्लंडचे माजी कप्तान माइक ब्रेअरली १९७६-७७ मध्ये जेव्हा भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांची माना साराभाईंशी भेट झाली. माना या प्रसिद्ध व्यावसायिक गौतम साराभाईंची कन्या आणि देशाच्या स्पेस प्रोग्रॅमचे जनक विक्रम साराभाईंच्या नात होय. इंग्लड क्रिकेट संघाच्या या कर्तबगार कर्णधाराचा मानावर जीव जडला. त्यांना काही करून मानाशी लग्न करायचे होते. यासाठी मानाच्या वडिलांनी ब्रेअरलीसमोर गुजराती भाषा आणि संस्कृती शकण्याची अट ठेवली. ब्रेअरलीदेखील हार मानण्यातले नव्हते. त्याकाळचे प्रसिद्ध गुजराती कवी ध्रुव सरूप यांच्याकडे गुजराती भाषा शिकून ब्रेअरलींनी मानाला आपली जीवनसाथी बनवली. दोघे लंडनमध्ये वास्तव्यास असून, त्यांना देन मुलं आहेत.

 • सर विवियन रिचर्डस आणि नीना गुप्ता - एक काळ होता जेव्हा वेस्ट इंडिजचे तडाखेबाज फलंदाज विवियन रिचर्डस आणि बॉलिवूडची अभिनेत्री नीना गुप्ताच्या प्रेमाच्या मथळ्यांनी त्यावेळची वृत्तपत्रे आणि मासिके भरलेली असतं. पहिल्यापासूनच विवाहित असलेल्या रिचर्डस यांनी नीनाशी लग्न केले नाही. असे असले तरी त्यांनी नीनावरील आपले प्रेम कधीही लपविले नाही. दोघांना मसाबा नावाची मुलगी असून, ती एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. लग्नाशिवाय मातृत्व प्राप्त केलेल्या नीनाला त्याकाळी अनेक टिकांना सामोरे जावे लागले होते. परंतु ती कधीही डगमगली नाही. विवियन आणि नीनामध्ये आता दुरावा निर्माण झाला आहे.

  सर विवियन रिचर्डस आणि नीना गुप्ता - एक काळ होता जेव्हा वेस्ट इंडिजचे तडाखेबाज फलंदाज विवियन रिचर्डस आणि बॉलिवूडची अभिनेत्री नीना गुप्ताच्या प्रेमाच्या मथळ्यांनी त्यावेळची वृत्तपत्रे आणि मासिके भरलेली असतं. पहिल्यापासूनच विवाहित असलेल्या रिचर्डस यांनी नीनाशी लग्न केले नाही. असे असले तरी त्यांनी नीनावरील आपले प्रेम कधीही लपविले नाही. दोघांना मसाबा नावाची मुलगी असून, ती एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. लग्नाशिवाय मातृत्व प्राप्त केलेल्या नीनाला त्याकाळी अनेक टिकांना सामोरे जावे लागले होते. परंतु ती कधीही डगमगली नाही. विवियन आणि नीनामध्ये आता दुरावा निर्माण झाला आहे.

 • जहीर अब्बास आणि रीटा लूथरा - पाकिस्तानचे महान फलंदाज जहीर अब्बास यांचेदेखील भारताशी फार जवळचे नाते आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०० शतकं ठोकणारे जहीर अब्बस रीटा लूथराच्या प्रेमात क्लिनबोल्ड झाले होते. इंग्लडमध्ये ग्लोसेस्टर शायरकडून खेळताना त्यांची रीटा लूथरा यांच्याशी भेट झाली. त्यावेळी रीटा इंग्लंडमध्ये शिकत होत्या. एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या रीटा आणि जहीर अब्बास यांनी १९८८ मध्ये लग्न केले. दोघांचेही वडील एकमेकांचे चांगले मित्र असल्याने त्यांच्या लग्नात कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. पहिल्यांदा फैसलाबाद येथे राहणाऱ्या या जोडप्याने नंतर कराचीत स्थलांतर केले.

  जहीर अब्बास आणि रीटा लूथरा - पाकिस्तानचे महान फलंदाज जहीर अब्बास यांचेदेखील भारताशी फार जवळचे नाते आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०० शतकं ठोकणारे जहीर अब्बस रीटा लूथराच्या प्रेमात क्लिनबोल्ड झाले होते. इंग्लडमध्ये ग्लोसेस्टर शायरकडून खेळताना त्यांची रीटा लूथरा यांच्याशी भेट झाली. त्यावेळी रीटा इंग्लंडमध्ये शिकत होत्या. एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या रीटा आणि जहीर अब्बास यांनी १९८८ मध्ये लग्न केले. दोघांचेही वडील एकमेकांचे चांगले मित्र असल्याने त्यांच्या लग्नात कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. पहिल्यांदा फैसलाबाद येथे राहणाऱ्या या जोडप्याने नंतर कराचीत स्थलांतर केले.

अन्य फोटो गॅलरी