24 October 2017

News Flash

कॅप्टन कूलचे ‘अवतार’

 • भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज वाढदिवस असून तो वयाच्या ३७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. धोनीच्या काळात भारतीय संघाने यशाची अनेक नवनवीन शिखरे सर केली. धोनीचा मैदानावरील संयम आणि अचूक निर्णय क्षमतेमुळे त्याला कॅप्टन कूल म्हणून ओळखले जाते. २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर गेली दशकभर धोनी भारतीय संघाचा अविभाज्य भाग राहिला आहे.

  भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज वाढदिवस असून तो वयाच्या ३७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. धोनीच्या काळात भारतीय संघाने यशाची अनेक नवनवीन शिखरे सर केली. धोनीचा मैदानावरील संयम आणि अचूक निर्णय क्षमतेमुळे त्याला कॅप्टन कूल म्हणून ओळखले जाते. २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर गेली दशकभर धोनी भारतीय संघाचा अविभाज्य भाग राहिला आहे.

 • महेंद्रसिंग धोनी मुलगी झिवा हिच्यासोबत.

  महेंद्रसिंग धोनी मुलगी झिवा हिच्यासोबत.

 • क्रिकेटपटू होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीला लष्करी अधिकारी व्हायची इच्छा होती. काही वर्षांपूर्वी त्याची ही इच्छा पूर्ण झाली होती. १ नोव्हेंबर २०११ रोजी भारतीय लष्कराने त्याला लेफ्टनंट कर्नल पद देऊन गौरवले होते.

  क्रिकेटपटू होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीला लष्करी अधिकारी व्हायची इच्छा होती. काही वर्षांपूर्वी त्याची ही इच्छा पूर्ण झाली होती. १ नोव्हेंबर २०११ रोजी भारतीय लष्कराने त्याला लेफ्टनंट कर्नल पद देऊन गौरवले होते.

 • प्रसिद्धी मिळूनही धोनीचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले आहेत. मध्यंतरी विजय हजारे करंडकादरम्यान त्याने झारखंडच्या संघाबरोबर ट्रेनने प्रवास करून याचा प्रत्यय दिला.

  प्रसिद्धी मिळूनही धोनीचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले आहेत. मध्यंतरी विजय हजारे करंडकादरम्यान त्याने झारखंडच्या संघाबरोबर ट्रेनने प्रवास करून याचा प्रत्यय दिला.

 • महेंद्रसिंग धोनीने ४ जुलै २०१० रोजी साक्षी सिंग हिच्याशी विवाह केला.

  महेंद्रसिंग धोनीने ४ जुलै २०१० रोजी साक्षी सिंग हिच्याशी विवाह केला.

 • धोनीने आपल्या करिअरप्रमाणेच वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यालाही तितकेच प्राधान्य दिले आहे. महेंद्रसिंग धोनी त्याची बहीण जयंती, भाऊ नरेंद्र आणि वडील पान सिंग यांच्यासोबत.

  धोनीने आपल्या करिअरप्रमाणेच वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यालाही तितकेच प्राधान्य दिले आहे. महेंद्रसिंग धोनी त्याची बहीण जयंती, भाऊ नरेंद्र आणि वडील पान सिंग यांच्यासोबत.

 • क्रिकेटप्रमाणेच महेंद्रसिंग धोनीला मोटारबाईक आणि प्राणी पाळण्याची प्रचंड हौस आहे. त्यामुळेच धोनीकडे अनेक महागड्या बाईक्स आहेत. तसेच त्याच्या घरात तीन कुत्रे आहेत. या कुत्र्यांसोबतची छायाचित्रे त्याने अनेकदा सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

  क्रिकेटप्रमाणेच महेंद्रसिंग धोनीला मोटारबाईक आणि प्राणी पाळण्याची प्रचंड हौस आहे. त्यामुळेच धोनीकडे अनेक महागड्या बाईक्स आहेत. तसेच त्याच्या घरात तीन कुत्रे आहेत. या कुत्र्यांसोबतची छायाचित्रे त्याने अनेकदा सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

 • धोनीने आपल्या करिअरप्रमाणेच वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यालाही तितकेच प्राधान्य दिले आहे.

  धोनीने आपल्या करिअरप्रमाणेच वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यालाही तितकेच प्राधान्य दिले आहे.

 • खेळाडू, कर्णधार आणि अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर महेंद्रसिंग धोनी स्वत:साठी वेगळा वेळ काढणे नेहमीच पसंत करतो.

  खेळाडू, कर्णधार आणि अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर महेंद्रसिंग धोनी स्वत:साठी वेगळा वेळ काढणे नेहमीच पसंत करतो.

अन्य फोटो गॅलरी