24 October 2017

News Flash

‘हे’ आहेत भारताचे १० सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू

 • १०. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची संपत्ती ही अंदाजे ९९ कोटींच्या घरात आहे. बीसीसीआय आणि जाहिरातींमधून सौरवला अंदाजे ७ कोटी रुपये मिळतात. सौरवची खासगी मालमत्ता ही अंदाजे ४५ कोटींच्या घरात असून याव्यतिरीक्त गांगुलीजवळ ५ अलिशान गाड्या आहेत, ज्यांची किंमत ७ कोटींच्या घरात आहेत. याव्यतिरीक्त सौरव गांगुलीकडे अटलॅडीको डी कोलकाता या फुटबॉल संघाची मालकी आहे.

  १०. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची संपत्ती ही अंदाजे ९९ कोटींच्या घरात आहे. बीसीसीआय आणि जाहिरातींमधून सौरवला अंदाजे ७ कोटी रुपये मिळतात. सौरवची खासगी मालमत्ता ही अंदाजे ४५ कोटींच्या घरात असून याव्यतिरीक्त गांगुलीजवळ ५ अलिशान गाड्या आहेत, ज्यांची किंमत ७ कोटींच्या घरात आहेत. याव्यतिरीक्त सौरव गांगुलीकडे अटलॅडीको डी कोलकाता या फुटबॉल संघाची मालकी आहे.

 • ९. गौतम गंभीरची अंदाजे संपत्ती ही १०१.२ कोटींच्या घरात आहे. याव्यतिरीक्त बोर्डाकडून गंभीरला वर्षाला अंदाजे १० कोटींचं मानधन मिळतं. याव्यतिरीक्त जाहीरातींच्या माध्यमातून ५ कोटींचं मानधन मिळतं. गौतम गंभीरची खासगी मालमत्ता ही अंदाजे ८५ कोटींच्या घरात आहे, दिल्लीत राहत असलेल्या गंभीरच्या घराची किंमतही अंदाजे १८ कोटींच्या घरात आहे.

  ९. गौतम गंभीरची अंदाजे संपत्ती ही १०१.२ कोटींच्या घरात आहे. याव्यतिरीक्त बोर्डाकडून गंभीरला वर्षाला अंदाजे १० कोटींचं मानधन मिळतं. याव्यतिरीक्त जाहीरातींच्या माध्यमातून ५ कोटींचं मानधन मिळतं. गौतम गंभीरची खासगी मालमत्ता ही अंदाजे ८५ कोटींच्या घरात आहे, दिल्लीत राहत असलेल्या गंभीरच्या घराची किंमतही अंदाजे १८ कोटींच्या घरात आहे.

 • ८. मुंबईकर रोहीत शर्माची संपत्ती ही अंदाजे १२४.५ कोटींच्या घरात आहे. बीसीसीआय आणि आयपीलएलमध्ये सामने खेळून रोहीतला वर्षाला अंदाजे ११.५ कोटी मिळतात. याव्यतिरीक्त जाहीरातींच्या माध्यमातून रोहीतला अंदाजे ७.५ कोटींची रक्कम मिळते. मुंबईच्या वरळी भागात रोहीत शर्माचं अलिशान घर असून त्याची किंमत अंदाजे ३० कोटींच्या घरात आहे. रोहीतकडेही काही अलिशान गाड्या असून त्याची किंमत ही अंदाजे ५ कोटींच्या घरात आहे.

  ८. मुंबईकर रोहीत शर्माची संपत्ती ही अंदाजे १२४.५ कोटींच्या घरात आहे. बीसीसीआय आणि आयपीलएलमध्ये सामने खेळून रोहीतला वर्षाला अंदाजे ११.५ कोटी मिळतात. याव्यतिरीक्त जाहीरातींच्या माध्यमातून रोहीतला अंदाजे ७.५ कोटींची रक्कम मिळते. मुंबईच्या वरळी भागात रोहीत शर्माचं अलिशान घर असून त्याची किंमत अंदाजे ३० कोटींच्या घरात आहे. रोहीतकडेही काही अलिशान गाड्या असून त्याची किंमत ही अंदाजे ५ कोटींच्या घरात आहे.

 • ७. युवराज सिंह हा बीसीसीआयच्या 'अ' श्रेणीतला खेळाडू असून त्याची अंदाजे संपत्ती ही १४६ कोटी इतकी आहे. याव्यतिरीक्त जाहिरातींच्या माध्यमातूनही युवराजला अंदाजे ७.५ कोटी रुपये मिळतात. याव्यतिरीक्त युवराज सिंहचं चंदीगडला स्वतःचं घर आहे, ज्याची किंमत अंदाजे ४५ कोटींच्या घरात आहे.

  ७. युवराज सिंह हा बीसीसीआयच्या 'अ' श्रेणीतला खेळाडू असून त्याची अंदाजे संपत्ती ही १४६ कोटी इतकी आहे. याव्यतिरीक्त जाहिरातींच्या माध्यमातूनही युवराजला अंदाजे ७.५ कोटी रुपये मिळतात. याव्यतिरीक्त युवराज सिंहचं चंदीगडला स्वतःचं घर आहे, ज्याची किंमत अंदाजे ४५ कोटींच्या घरात आहे.

 • ६. सुरेश रैनाची संपत्ती ही अंदाजे १५० कोटींच्या घरात आहे. आयपीएलमधून रैनाला अंदाजे ९.५ कोटी मिळतात. याव्यतिरीक्त जाहिरातींच्या माध्यमातून ७ कोटी मानधन मिळतं. याव्यतिरीक्त देशभरात रैनाच्या विविध शहरात प्रॉपर्टी आहेत, ज्याची किंमत २७ कोटींच्या घरात आहे. सुरेश रैनाचं गाझियाबादमधलं घर हे जवळपास १८ कोटी किमतीचं आहे.

  ६. सुरेश रैनाची संपत्ती ही अंदाजे १५० कोटींच्या घरात आहे. आयपीएलमधून रैनाला अंदाजे ९.५ कोटी मिळतात. याव्यतिरीक्त जाहिरातींच्या माध्यमातून ७ कोटी मानधन मिळतं. याव्यतिरीक्त देशभरात रैनाच्या विविध शहरात प्रॉपर्टी आहेत, ज्याची किंमत २७ कोटींच्या घरात आहे. सुरेश रैनाचं गाझियाबादमधलं घर हे जवळपास १८ कोटी किमतीचं आहे.

 • ५. गेली अनेक वर्ष भारतीय संघात जागा मिळत नसलेल्या युसुफ पठाणची संपत्ती ही अंदाजे २ कोटी ६५ लाखांच्या घरात आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळण्याचे युसुफला चांगले पैसे मिळतात. याव्यतिरीक्त आपला भाऊ इरफान पठाणसोबत युसुफने बडोद्यात क्रिकेट अकादमीची स्थापना केली आहे.

  ५. गेली अनेक वर्ष भारतीय संघात जागा मिळत नसलेल्या युसुफ पठाणची संपत्ती ही अंदाजे २ कोटी ६५ लाखांच्या घरात आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळण्याचे युसुफला चांगले पैसे मिळतात. याव्यतिरीक्त आपला भाऊ इरफान पठाणसोबत युसुफने बडोद्यात क्रिकेट अकादमीची स्थापना केली आहे.

 • ४. विरेंद्र सेहवागची संपत्ती ही २५५ कोटींच्या घरात आहे. बीसीसीआयकडून मिळणारा पगार, आयपीएलची कंत्राटं यामधून सेहवागला मोठी रक्कम मिळते. याव्यतिरीक्त हरियाणात सेहवाग स्वतःची शाळा आणि क्रिकेट अकादमी चालवतो.

  ४. विरेंद्र सेहवागची संपत्ती ही २५५ कोटींच्या घरात आहे. बीसीसीआयकडून मिळणारा पगार, आयपीएलची कंत्राटं यामधून सेहवागला मोठी रक्कम मिळते. याव्यतिरीक्त हरियाणात सेहवाग स्वतःची शाळा आणि क्रिकेट अकादमी चालवतो.

 • ३. २०१७ च्या फोर्ब्स मासिकाच्या यादीत सर्वाधीक मानधन मिळवणाऱ्या खेळाडूच्या यादीत कोहलीचा समावेश करण्यात आला होता. कोहलीची संपत्ती ही अंदाजे ३९० कोटी इतकी आहे. आयपीएलमधून विराट कोहलीला १४ कोटी रुपये मिळतात. याव्यतिरीक्त मुंबई आणि दिल्लीत कोहलीचं स्वतःचं घर आहेत. कोहलीची खासगी संपत्ती ही जवळपास ४२ कोटींच्या घरात आहे.

  ३. २०१७ च्या फोर्ब्स मासिकाच्या यादीत सर्वाधीक मानधन मिळवणाऱ्या खेळाडूच्या यादीत कोहलीचा समावेश करण्यात आला होता. कोहलीची संपत्ती ही अंदाजे ३९० कोटी इतकी आहे. आयपीएलमधून विराट कोहलीला १४ कोटी रुपये मिळतात. याव्यतिरीक्त मुंबई आणि दिल्लीत कोहलीचं स्वतःचं घर आहेत. कोहलीची खासगी संपत्ती ही जवळपास ४२ कोटींच्या घरात आहे.

 • २. महेंद्रसिंह धोनीची संपत्ती ही अंदाजे ७३४ कोटींच्या घरात आहेत. आयपीएलमधून गेल्या दोन वर्षात धोनीने ३० कोटींची कमाई केली आहे. याव्यतिरीक्त धोनीला अलिशान बाईकची आवड आहे. धोनीकडे सध्या २५ कोटींच्या किंमतीच्या अलिशान बाईक आहेत. धोनीची खासगी संपत्ती ही ५२२ कोटींच्या घरात आहे. याव्यतिरीक्त धोनी चेन्नईयन एफ.सी. संघाचा मालक आहे.

  २. महेंद्रसिंह धोनीची संपत्ती ही अंदाजे ७३४ कोटींच्या घरात आहेत. आयपीएलमधून गेल्या दोन वर्षात धोनीने ३० कोटींची कमाई केली आहे. याव्यतिरीक्त धोनीला अलिशान बाईकची आवड आहे. धोनीकडे सध्या २५ कोटींच्या किंमतीच्या अलिशान बाईक आहेत. धोनीची खासगी संपत्ती ही ५२२ कोटींच्या घरात आहे. याव्यतिरीक्त धोनी चेन्नईयन एफ.सी. संघाचा मालक आहे.

 • १. क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही सचिन श्रीमंत खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनची संपत्ती ही अंदाजे १०६६ कोटींच्या घरात आहे. बीसीसीआय आणि जाहीरातींच्या माध्यमातून सचिनला वर्षाकाठी १७ कोटींची रक्कम मिळते. याव्यतिरीक्त सचिनकडे आता २४ ब्रँडच्या जाहिरातींचं कंत्राट आहे.

  १. क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही सचिन श्रीमंत खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनची संपत्ती ही अंदाजे १०६६ कोटींच्या घरात आहे. बीसीसीआय आणि जाहीरातींच्या माध्यमातून सचिनला वर्षाकाठी १७ कोटींची रक्कम मिळते. याव्यतिरीक्त सचिनकडे आता २४ ब्रँडच्या जाहिरातींचं कंत्राट आहे.

अन्य फोटो गॅलरी