23 October 2017

News Flash

‘काळाकोट’वाले दर्शन देण्यास सज्ज

 • येत्या १७ तारखेपासून मुंबईकरांना भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनच्या दर्शनाचा आनंद लुटता येणार आहे. (छाया - दिलीप कागडा)

  येत्या १७ तारखेपासून मुंबईकरांना भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनच्या दर्शनाचा आनंद लुटता येणार आहे. (छाया - दिलीप कागडा)

 • जोडीदारासोबत फिरणे, मनसोक्त डुंबणे, पोहोण्याची शर्यत लावणे अशा क्रीडा करणाऱ्या या पेंग्विनना आता मुंबईची हवा मानवू लागली असून कोकण किनारपट्टीवर मिळणारे बोंबिल हे त्यांचे आवडते खाद्य बनले आहे. (छाया - दिलीप कागडा)

  जोडीदारासोबत फिरणे, मनसोक्त डुंबणे, पोहोण्याची शर्यत लावणे अशा क्रीडा करणाऱ्या या पेंग्विनना आता मुंबईची हवा मानवू लागली असून कोकण किनारपट्टीवर मिळणारे बोंबिल हे त्यांचे आवडते खाद्य बनले आहे. (छाया - दिलीप कागडा)

 • पेंग्विनना पाहता येईल, असे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय हे भारतातील एकमेव आहे.

  पेंग्विनना पाहता येईल, असे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय हे भारतातील एकमेव आहे.

 • साधारण दोन वर्षांनंतर पेंग्विन वयात येतात. एकदा जोडीदार निवडला की ते त्याची आयुष्यभर सोबत करतात. दुर्दैवाने जोडीदाराचा मृत्यू झाला तर ते त्यानंतर एकटे राहतात. (छाया - प्रशांत नाडकर)

  साधारण दोन वर्षांनंतर पेंग्विन वयात येतात. एकदा जोडीदार निवडला की ते त्याची आयुष्यभर सोबत करतात. दुर्दैवाने जोडीदाराचा मृत्यू झाला तर ते त्यानंतर एकटे राहतात. (छाया - प्रशांत नाडकर)

 • वर्षांतून साधरणत: दोन वेळा अंडी घातली जातात. अंडी ३५ दिवस उबवल्यानंतर त्यातून पिले बाहेर येतात. सर्व परिस्थिती अनुकूल असेल तर दोन्ही पिले जिवंत राहतात. पेंग्विन साधारण १५ ते १८ वर्षे जगतात. (छाया - पीटीआय)

  वर्षांतून साधरणत: दोन वेळा अंडी घातली जातात. अंडी ३५ दिवस उबवल्यानंतर त्यातून पिले बाहेर येतात. सर्व परिस्थिती अनुकूल असेल तर दोन्ही पिले जिवंत राहतात. पेंग्विन साधारण १५ ते १८ वर्षे जगतात. (छाया - पीटीआय)

 • एका पेंग्विनच्या मृत्यूमुळे उठलेले काहूर आणि पेंग्विनच्या दर्शनगृहाच्या उभारणीतील विलंबामुळे पेंग्विन दर्शन लांबणीवर पडले होते.

  एका पेंग्विनच्या मृत्यूमुळे उठलेले काहूर आणि पेंग्विनच्या दर्शनगृहाच्या उभारणीतील विलंबामुळे पेंग्विन दर्शन लांबणीवर पडले होते.

अन्य फोटो गॅलरी