११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या नराधमाच्या पत्नीचे म्हणजेच पीडित मुलीच्या आईचे निधन दोन वर्षांपूर्वी झाले आहे. पीडित मुलगी आणि तिची ९ वर्षांची दुसरी बहिण या दोघीही वडिलांसोबत राहत होत्या. उन्हाळाच्या सुट्टीत म्हणजेच तीन महिन्यांपूर्वी ११ वर्षांच्या मुलीवर तिच्या वडिलांनीच अतिप्रसंग केला. याबाबत कोणालाही काहीही सांगशील तर तुला ठार करेन अशीही धमकी या नराधमाने पीडित मुलीला दिली.

एकदा हा प्रकार घडल्यानंतर त्यानंतर वारंवार घडू लागला. जिवाच्या भीतीने या पीडित मुलीने कोणाकडेही काहीही वाच्यता केली नाही. मात्र एकेदिवशी वेदना असह्य होऊ लागल्याने ती ओरडू लागली. तेव्हा शेजारीच राहणाऱ्या काकूने तिचा आवाज ऐकला. दुसऱ्या दिवशी तू रात्री का ओरडत होतीस अशी विचारणाही केली मात्र या पीडित मुलीने काहीही सांगितले नाही.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
Four Year Old Girl Tortured in Hadapsar Pune
धक्कादायक : खाऊच्या आमिषाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार

मागील आठवड्यात तिने अत्याचार असह्य झाल्याने सगळा प्रकार तिच्या काकूला सांगितला. त्यानंतर काकूने या पीडित मुलीसह पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर तातडीने कारवाई करत नराधम बापाला गजाआड केले. मात्र या घटनेमुळे वडिल आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना समोर आली आहे.