हिरवा रंग लावून विक्रीस आणलेली तब्बल अकराशे किलो परवल भाजी अन्न व औषध प्रशासनाने जप्त केली आहे. ही भाजी कोलकात्याहून आझाद हिंद एक्स्प्रेसने आणली जात होती.
अन्न विभागाचे सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी ही माहिती दिली. परवल ही भाजी तोंडल्यासारखी दिसत असून हॉटेल्समधील जेवणात या भाजीला विशेष मागणी असते. केकरे म्हणाले, ‘‘नियमानुसार कोणत्याही भाजीला रंग लावून विकण्यावर बंदी आहे. परवल भाजीचा ११२० किलोंचा साठा विभागाने जप्त केला आहे. तपासणीसाठी भाजीचा नमुना घेऊन उर्वरित साठा नष्ट करण्यात आला. या भाजीची किंमत २२ हजार ४०० रुपये होती.’’